एक्स्प्लोर

आधी जादू की झप्पी नंतर प्रेमाची पप्पी; कॅडबरी देत उदयनराजे शिवेंद्रराजेंना म्हणाले, I LOVE U

Satara Lok Sabha Election 2024 Results : सातारा लोकसभेचे खासदार उदयनराजे भोसले आणि त्यांचे बंधू शिवेंद्रराजे भोसले यांच्याचील बंधूप्रेमाची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे.

सातारा : लोकसभा निवडणुकीत विजय मिळवल्यावर सातारा लोकसभेचे नवनिर्वाचित खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांनी आमदार शिवेंद्रराजे भोसले यांची भेट घेतली. उदयनराजे यांनी शिवेंद्रराजेंच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. यावेळी उदयनराजेंनी शिवेंद्र राजेंना कॅडबरी भेट दिली. उदयनराजेंनी शिवेंद्रराजेंना जी कॅडबरी दिली, त्या कॅडबरीवर I love you असं लिहिलं होतं. इतकंच नाही तर बाईट झाल्यावर उदयनराजेंनी शिवेंद्रराजेंची पप्पी घेतली आहे. या दोघांमधील बंधूप्रेम सध्या चर्चेचा विषय बनला आहे.

उदयनराजे आणि शिवेंद्रराजे बंधूप्रेम

निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर उदयनराजे भोसले बुधवारी आमदार शिवेंद्रराजेंच्या निवासस्थानी पोहाचले. उदयनराजे शिवेंद्रराजेंच्या घरी पोहोचले. उदयनराजेंना साताऱ्यातूनच मताधिक्य मिळाल्यामुळे उदयनराजेंचा विजय झाला आहे. त्यामुळे शिवेंद्रराजेंचे आभार माणण्यासाठीच उदयनराजे सुरूची बंगल्यावर पोहोचले. उदयनराजेंनी दोघांमधील कटूता निवडणूकीअगोदरच संपवली होती. 

आधी जादू की झप्पी नंतर घेतली पप्पी

उदयनराजे भोसले म्हणाले की, या निवडणुकीत पतंग जरी मी असलो तरी, माझा मांजा (शिवेंद्रराजे) चांगला होता, असंही उदयनराजे भोसले म्हणाले. महत्त्वाचं म्हणजे उदयनराजे भोसले यांनी शिवेंद्रराजे भोसलेंची पप्पी घेतली. त्यानंतर आता पुन्हा एकदा दोघा भावांमधील प्रेम दिसून आलं आहे.

शिवेंद्रराजे नसते तर, निवडणूक अवघड झाली असती

उदयनराजे भोसले यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना म्हटलं आहे की, या जिल्ह्यातल्या सगळ्या मतदारसंघातून मनापासून काम केलं, त्यामुळं हे शक्य होऊ शकलं. आकडेवारी पाहिली तर निश्चित हे सांगेन शिवेंद्रराजे नसते तर, ही निवडणूक अवघड झाली असती. भविष्य काळात जेवढे आमदार, नेते असतील या सगळ्यांना विचारात घेऊनच वाटचाल होईल.

भविष्यात जिल्ह्यासाठी कुठेही कमी पडणार नाही

कधी-कधी प्रश्न पडतो, एवढी काम केल्यावर आज जो कौल लोकांनी दिला ते बघून प्रश्न पडतो, येवढ्या मोठ्या प्रमाणात विरोधात कौल दिला, तो नेमका कशामुळे दिला. एवढंच सांगेन की, भविष्यकाळात या जिल्ह्याकरिता जे-जे करावं लागेल, त्यात कुठेही कमी पडणार नाही. माझ्याकडून काही त्रृटी राहिल्या असतील, त्या भविष्यकाळात भरून काढेन. 

शिवेंद्रराजेंना पुन्हा आमदार म्हणून निवडून आणणार

सातारा आणि जावळी याचा लीड कमी करण्याचं काम झालं, शिवेंद्रराजे आणि त्यांचे सहकारी यांनी धावपळ केली म्हणून मी निवडून आलो, याची जाणीव आहे. पुढील काळात आमदारकीची निवडणूक असेल, त्यात जीव तोडून काम करणार आणि हेच पुन्हा आमदार दिसणार. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kalyan Accident: आईसोबत शाळेतून घरी जाताना भरधाव ट्रक आला अन्.... कल्याणमधील अपघातात आई आणि मुलाचा मृत्यू
मोठी बातमी: कल्याणमध्ये KDMCच्या कचऱ्याच्या ट्रकने मायलेकाला उडवलं, दोघांचाही जागीच मृत्यू
Kedar Jadhav : टीम इंडियाचा मराठमोळा खेळाडू BJP मध्ये करणार प्रवेश? 'त्या' भेटीमुळे राजकीय वर्तुळात रंगली चर्चा
टीम इंडियाचा मराठमोळा खेळाडू BJP मध्ये करणार प्रवेश? 'त्या' भेटीमुळे राजकीय वर्तुळात रंगली चर्चा
Gold Silver Rate: गुड न्यूज, सोने अन् चांदीचे दर घसरले, MCX वर काय घडलं? जाणून घ्या विविध शहरातील सोने दर
गुड न्यूज, सोने अन् चांदीचे दर घसरले, MCX वर काय घडलं? जाणून घ्या विविध शहरातील सोने दर
बारामतीचा नादच खुळा... AI च्या माध्यमातून ऊस शेती, सत्या नाडेलांकडून ADT चं कौतुक; शरद पवारांचं खास ट्विट
बारामतीचा नादच खुळा... AI च्या माध्यमातून ऊस शेती, सत्या नाडेलांकडून ADT चं कौतुक; शरद पवारांचं खास ट्विट
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Jitendra Awhad PC :10 वर्षात झालेल्या खुनांपैकी 80 टक्के खून कराडनं केले, जितेंद्र आव्हाड यांचा दावा8-Year-Old Dies Of Cardiac Arrest : 8 वर्षीय मुलीचा ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू, शिक्षिकेला वही दाखवत असताना आला झटकाABP Majha Marathi News Headlines 1PM TOP Headlines 1 PM 08 January 2025 दुपारी १ च्या हेडलाईन्सBhandara Tiger : झाडाझुडपात अडकलेल्या वाघासह फोटोसेशन,थरकाप उडवणारा VIDEO

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kalyan Accident: आईसोबत शाळेतून घरी जाताना भरधाव ट्रक आला अन्.... कल्याणमधील अपघातात आई आणि मुलाचा मृत्यू
मोठी बातमी: कल्याणमध्ये KDMCच्या कचऱ्याच्या ट्रकने मायलेकाला उडवलं, दोघांचाही जागीच मृत्यू
Kedar Jadhav : टीम इंडियाचा मराठमोळा खेळाडू BJP मध्ये करणार प्रवेश? 'त्या' भेटीमुळे राजकीय वर्तुळात रंगली चर्चा
टीम इंडियाचा मराठमोळा खेळाडू BJP मध्ये करणार प्रवेश? 'त्या' भेटीमुळे राजकीय वर्तुळात रंगली चर्चा
Gold Silver Rate: गुड न्यूज, सोने अन् चांदीचे दर घसरले, MCX वर काय घडलं? जाणून घ्या विविध शहरातील सोने दर
गुड न्यूज, सोने अन् चांदीचे दर घसरले, MCX वर काय घडलं? जाणून घ्या विविध शहरातील सोने दर
बारामतीचा नादच खुळा... AI च्या माध्यमातून ऊस शेती, सत्या नाडेलांकडून ADT चं कौतुक; शरद पवारांचं खास ट्विट
बारामतीचा नादच खुळा... AI च्या माध्यमातून ऊस शेती, सत्या नाडेलांकडून ADT चं कौतुक; शरद पवारांचं खास ट्विट
Beed Crime: बीड शहर पोलीस मुख्यालयातील पोलीस कर्मचाऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या, चर्चांना उधाण
मोठी बातमी: बीड पोलीस दलातील कर्मचाऱ्याची आवळ्याच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या
Kolhapur News : मर्जीविरोधात भाचीचा पळून जात गावातील मुलाशी लग्न, बदनामीच्या रागातून मामाने रिसेप्शनच्या जेवणात विष कालवलं!
कोल्हापूर : मर्जीविरोधात भाचीचा पळून जात गावातील मुलाशी लग्न, बदनामीच्या रागातून मामाने रिसेप्शनच्या जेवणात विष कालवलं!
Beed Crime: वाल्मिक कराडचा पाय आणखी खोलात, पोलिसांनी विष्णू चाटेचं व्हॉईस सॅम्पल घेतलं; खंडणी प्रकरणाच्या तपासाला वेग
वाल्मिक कराडचा पाय आणखी खोलात, खंडणीप्रकरणात पोलिसांनी विष्णू चाटेचं व्हॉईस सॅम्पल घेतलं
एका चुकीनं तुमचं पीएफ खातं रिकामं होऊ शकतं, EPFO कडून खातेदारांना इशारा, तोतया अधिकाऱ्यांपासून सावध राहण्याच्या सूचना
एका चुकीनं तुमचं पीएफ खातं रिकामं होऊ शकतं, EPFO कडून खातेदारांना इशारा, तोतया अधिकाऱ्यांपासून सावध राहण्याच्या सूचना
Embed widget