Udayanraje Bhosale : जाती-जातींमध्ये भेद निर्माण करणाऱ्या विकृतींना बळी पडू नका, उदयनराजे भोसले यांचे आवाहन
Udayanraje Bhosale, सातारा : "आधीचे पूर्वज समाजाचा विचार करत होते. मात्र अलीकडच्या काळातील काही विकृती पाहायला मिळते. समाजाच्या नावाखाली वेगवेगळ्या कारणातून व्यक्ती केंद्रित लोक स्वतःचे हित साधण्यासाठी वेगवेगळ्या जाती धर्मातील समाजांमध्ये दरार निर्माण करण्याचे काम करत आहेत, अशा गोष्टींना बळी पडू नका."
Udayanraje Bhosale, सातारा : "आधीचे पूर्वज समाजाचा विचार करत होते. मात्र अलीकडच्या काळातील काही विकृती पाहायला मिळते. समाजाच्या नावाखाली वेगवेगळ्या कारणातून व्यक्ती केंद्रित लोक स्वतःचे हित साधण्यासाठी वेगवेगळ्या जाती धर्मातील समाजांमध्ये दरार निर्माण करण्याचे काम करत आहेत, अशा गोष्टींना बळी पडू नका. आपण यांना बळी पडलो तर भारताचे तुकडे व्हायला वेळ लागणार नाही", असे साताऱ्याचे भाजप खासदार उदयनराजे भोसले म्हणाले. फलटण तालुक्यातील साखरवाडी जवळच्या पिंपळवाडी येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण उदयनराजे भोसले यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाला श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर उपस्थित होते.
पिंपळवाडी-साखरवाडी(फलटण)येथील छत्रपती शिवाजी महाराज उत्सव समितीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण करण्यात आले
— Chhatrapati Udayanraje Bhonsle (@Chh_Udayanraje) August 22, 2024
याप्रसंगी विधान प.मा.सभापती रामराजे नाईकनिंबाळकर,समितीचे अध्यक्ष संजीवराजे नाईकनिंबाळकर,आ.दीपकचव्हाण,सुनीलकाटकर व इतर मान्यवर उपस्थित होते pic.twitter.com/EHzYEVH7Vx
प्रतापगड किल्ला विकास प्राधिकरणची स्थापना, खासदार उदयनराजे भोसले असणार अध्यक्ष
महाराष्ट्र सरकारकडून बुधवारी मोठा निर्णय घेण्यात आलाय. राज्य सरकारने प्रतापगड किल्ला विकास प्राधिकरणाची स्थापना केलीये. भाजपचे सातारचे खासदार उदयनराजे भोसले यांच्या अध्यक्षतेखाली प्रतापगड किल्ला विकास प्राधिकरण स्थापना करण्यात आली आहे. तसेच प्रतापगड किल्ला विकास प्राधिकरणावर सह-अध्यक्ष म्हणून साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई आणि विशेष निमंत्रित सदस्य म्हणून विजय नायडू यांचा देखील समावेश असणार आहे. राज्य सरकारकडून याबाबतचा अधिकृत निर्णय जारी करण्यात आला आहे.
ऐतिहासिक महत्त्व असलेल्या किल्ल्याच्या विकासासाठी प्राधिकरण तयार करण्यात आले
सातारा जिल्ह्यात असलेल्या प्रतापगडाच्या विकासासाठी हे प्राधिकरण स्थापन करण्यात आली आहे. प्रतापगड किल्लाचे बांधकाम 1656 साली छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदेशावरुन करण्यात आले होते. प्रतापगडाच्या पायथ्याशी 10 नोव्हेंबर 1659 रोजी छत्रपती शिवाजी महाराजांनी आदिलशाही सरदार अफजलखानाचा वध केला होता. ही एक इतिहासातील मोठी घटना आहे. अशा या ऐतिहासिक महत्त्व असलेल्या किल्ल्याच्या विकासासाठी प्राधिकरण तयार करण्यात आले आहे.
इतर महत्वाच्या बातम्या