एक्स्प्लोर

Navneet Rana: खळबळजनक! नवनीत राणांना पुन्हा धमकीचे पत्र, तीन दिवसांत दुसर्‍यांदा हैदराबादमधून धमकी

Navneet Rana: भाजपच्या माजी खासदार नवनीत राणा यांना आज पुन्हा एका धमकीचे पत्र मिळाले आहे. धक्कादायक बाब म्हणजे तीन दिवसांपूर्वीच याच व्यक्तींने पत्राद्वारे नवनीत राणा यांना धमकी दिली होती.

Maharashtra Politics अमरावती : भाजपच्या माजी खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांना आज पुन्हा एका धमकीचे पत्र मिळाले आहे. धक्कादायक बाब म्हणजे तीन दिवसांपूर्वीच याच व्यक्तींने पत्राद्वारे नवनीत राणा यांना धमकी दिली होती.दरम्यान नवनीत राणा (Navneet Rana) आणि आमदार रवि राणा (Ravi Rana) यांच्या घरी हैदराबादहून धमकीचे पत्र आल्याने सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे. आमिर नामक इसमाच्या नावाचा उल्लेख पत्रात असून नवनीत राणा यांना सामूहिक अत्याचार करण्याची धमकी या पत्रातून देण्यात आलीय. तसेच, राणा दाम्पत्याच्या अमरावतील येथील घरासमोर गाय कापण्याची देखील धमकी पत्रातून देण्यात आली आहे. तर, पत्रात पाकिस्तान जिंदाबाद, असाही उल्लेख होता. तीन दिवसापूर्वीच हे धमकीचे पत्र आले असताना आज (सोमवार) पुन्हा अशाच पद्धतीचे पत्र आल्याने मोठी खळबळ उडाली आहे.

दरम्यान, या प्रकरणाच्या तपासासाठी अमरावती पोलीस हैदराबादमध्ये दाखल झाले असताना आज परत दुसरं धमकीचं पत्र नवनीत राणा (Navneet Rana) आणि  आमदार रवि राणा यांच्या घरी आले आहे. हे प्रकरण उजेडात येताच अमरावती पोलीस नवनीत राणा यांच्या घरी दाखल झाले आहे. तर पोलीस या प्रकरणाचा आता अधिक तपास करत आहे. तर मिळालेल्या माहितीनुसार या प्रकरणी राजापेठ पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली जाणार असल्याची माहिती पुढे आली आहे.

तीन दिवसात धमकीचं दुसरं पत्र

राज्यातील विधानसभा निवडणुकांची घोषणा पुढील काही दिवसांतच होणार आहे. त्यामुळे, सर्वच राजकीय पक्ष कामाला लागले असून आपल्या मतदारसंघात निवडणुकांची तयारी करत आहेत. नवनीत राणा यांचा लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यामुळे आता विधानसभेला त्या मैदानात उतरणार का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. मात्र, त्यांचे पती आमदार रवि राणा यांनी विधानसभेची तयारी सुरू केली आहे. त्यादृष्टीने नवनीत राणा यांचाही प्रचार सुरू आहे. मात्र, एकीकडे निवडणुकांसाठीची तयारी सुरू असतानाच त्यांना पत्राद्वारे धमकी देण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. दरम्यान, नवनीत राणा यांनी हिंदू शेरणी म्हणून स्वत:ची ओळख पुढे केली आहे. विशेष म्हणजे लोकसभा निवडणुकीत त्यांनी हैदराबादला जाऊन भाजपच्या प्रचारार्थ भाषणंही केले होते. अशातच नवनीत राणा (Navneet Rana) आणि  आमदार रवि राणा यांच्या घरी हैदराबादहून धमकीचे पत्र आल्याने सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे.

हैदराबादवरुन पत्र आल्याचा उल्लेख  

विशेष बाब म्हणजे तीन दिवसापूर्वी नवनीत राणा यांना पाठविण्यात आलेल्या धमकी पत्राद्वारे संबंधित व्यक्तीने राणा दाम्पत्याकडे 10 करोड रूपयाच्या खंडणीची मागणी केली असून खंडणी दिली तरच पिच्छा सोडणार असल्याचा उल्लेख पत्रात केला होता. या पत्रात नवनीत राणा यांचे पति रवी राणा यांच्या विषयी वादग्रस्त शब्दांचा वापर करण्यात आला असून मी हैदराबादचा आहे, असेही त्याने सांगितले. तसेच, मी कोणत्याही पार्टीचा नाही. माझा भाऊ वसिम ह्याने दुबईतून तुम्हाला कॉल केला होता. मात्र, तुम्ही तो फोन उचलला नाही, असे म्हणत संबंधिताने या पत्रात दुबाईतील भावाचा फोन नबंरही उल्लेख केला आहे. दरम्यान, हे पत्र संबंधित आमिर नावाच्या इसमाने आपल्या पत्नीच्या हाताने लिहिले असल्याचा दावा पत्रातून करण्यात आला आहे. याप्रकरणी, रवी राणा यांचे स्वीय सहाय्यक विनोद गुहे यांच्या तक्रारीवरुन पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आलाय.तर आता परत आलेल्या पत्राचाही तपास पोलीस करत आहेत 

हेही वाचा  

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Atul Parchure Passes Away : अभिनेते अतुल परचुरे यांचं निधन, 57व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Atul Parchure Passes Away : अभिनेते अतुल परचुरे यांचं निधन, 57व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
MNS activist killed : कट मारल्यामुळे बाचाबाची, रिक्षाचालक अन् फेरीवाल्यांनी मिळून मनसे कार्यकर्त्याला संपवल्याचा दावा, मालाड पूर्वेत आत्तापर्यंत काय घडलं?
कट मारल्यामुळे बाचाबाची, रिक्षाचालक अन् फेरीवाल्यांनी मिळून मनसे कार्यकर्त्याला संपवल्याचा दावा, मालाड पूर्वेत आत्तापर्यंत काय घडलं?
World War II Bomb : जर्मनीत सापडला दुसऱ्या महायुद्धातील बॉम्ब! 5 हजार लोकांना सुरक्षितस्थळी नेलं, निकामी करण्यास किती तास लागले?
जर्मनीत सापडला दुसऱ्या महायुद्धातील बॉम्ब! 5 हजार लोकांना सुरक्षितस्थळी नेलं, निकामी करण्यास किती तास लागले?
Sharad Pawar : आज महाराष्ट्र पुन्हा उभा करायचा आहे, 48 पैकी 31 जागा जिंकल्यानंतर यांना बहिण आठवली; शरद पवारांचा हल्लाबोल
आज महाराष्ट्र पुन्हा उभा करायचा आहे, 48 पैकी 31 जागा जिंकल्यानंतर यांना बहिण आठवली; शरद पवारांचा हल्लाबोल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Headlines 8 08 PM TOP Headlines 08 PM 14 October 2024Atul Parchure Passes Away : अभिनेते अतुल परचुरे यांचं निधन, 57व्या वर्षी घेतला अखेरचा श्वासABP Majha Marathi News Headlines 08 PM TOP Headlines 08 PM 14 October 2024ABP Majha Marathi News Headlines 7AM TOP Headlines 7 AM 13 October 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Atul Parchure Passes Away : अभिनेते अतुल परचुरे यांचं निधन, 57व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Atul Parchure Passes Away : अभिनेते अतुल परचुरे यांचं निधन, 57व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
MNS activist killed : कट मारल्यामुळे बाचाबाची, रिक्षाचालक अन् फेरीवाल्यांनी मिळून मनसे कार्यकर्त्याला संपवल्याचा दावा, मालाड पूर्वेत आत्तापर्यंत काय घडलं?
कट मारल्यामुळे बाचाबाची, रिक्षाचालक अन् फेरीवाल्यांनी मिळून मनसे कार्यकर्त्याला संपवल्याचा दावा, मालाड पूर्वेत आत्तापर्यंत काय घडलं?
World War II Bomb : जर्मनीत सापडला दुसऱ्या महायुद्धातील बॉम्ब! 5 हजार लोकांना सुरक्षितस्थळी नेलं, निकामी करण्यास किती तास लागले?
जर्मनीत सापडला दुसऱ्या महायुद्धातील बॉम्ब! 5 हजार लोकांना सुरक्षितस्थळी नेलं, निकामी करण्यास किती तास लागले?
Sharad Pawar : आज महाराष्ट्र पुन्हा उभा करायचा आहे, 48 पैकी 31 जागा जिंकल्यानंतर यांना बहिण आठवली; शरद पवारांचा हल्लाबोल
आज महाराष्ट्र पुन्हा उभा करायचा आहे, 48 पैकी 31 जागा जिंकल्यानंतर यांना बहिण आठवली; शरद पवारांचा हल्लाबोल
Sanjivraje Naik Nimbalkar : साम, दाम, दंड भेद वापरण्याचे दिल्लीतील नेत्यांनी सांगितले, पण दिल्लीसमोर झुकणारे आम्ही नाही; संजीवराजेंचा एल्गार
साम, दाम, दंड भेद वापरण्याचे दिल्लीतील नेत्यांनी सांगितले, पण दिल्लीसमोर झुकणारे आम्ही नाही; संजीवराजेंचा एल्गार
आनंदाची बातमी! पुणेकरांना आणखी दोन नव्या मेट्रो मिळणार, मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय, जाणून घ्या कसा असेल मार्ग?
आनंदाची बातमी! पुणेकरांना आणखी दोन नव्या मेट्रो मिळणार, मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय, जाणून घ्या कसा असेल मार्ग?
Nobel In Economic Sciences : अमेरिका आणि ब्रिटनमधील तीन शास्त्रज्ञांना अर्थशास्त्रातील 'नोबेल'; राजकीय संस्थांचा समाजावरील परिणाम जगाला दाखवला
अमेरिका आणि ब्रिटनमधील तीन शास्त्रज्ञांना अर्थशास्त्रातील 'नोबेल'; राजकीय संस्थांचा समाजावरील परिणाम जगाला दाखवला
मुंबईहून उड्डाण करणाऱ्या तीन फ्लाइटमध्ये बॉम्बची धमकी; एअर इंडियाचे विमान दिल्लीकडे वळवले, इंडिगोच्या 2 विमानांचीही तपासणी
मुंबईहून उड्डाण करणाऱ्या तीन फ्लाइटमध्ये बॉम्बची धमकी; एअर इंडियाचे विमान दिल्लीकडे वळवले, इंडिगोच्या 2 विमानांचीही तपासणी
Embed widget