Maharashtra Government Collapse: 'हे दिवस ही निघून जातील', मुख्यमंत्रीच्या राजीनाम्यानंतर संजय राऊत यांचं ट्वीट
Maharashtra Government Collapse: महाराष्ट्रात मोठे राजकीय भुंकप घडले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.
Maharashtra Government Collapse: महाराष्ट्रात मोठे राजकीय भुंकप घडले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्यानंतर शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी ट्वीट करत म्हटलं आहे की, न्यायदेवतेला सन्मान होईल. फायर टेस्ट (Fire Test), ही अग्निपरीक्षेची वेळ आहे. हे दिवस पण निघून जाईल.
दगाबाजीचा अंत चांगला होत नाही: संजय राऊत
संजय राऊत ट्वीट करून म्हणाले आहेत की, मुख्यमंत्री अत्यंत ग्रेसफुली पायउतार झाले. आपण एक संवेदनशील सुसंस्कृत मुख्यमंत्री गमावला आहे, असं ते म्हणाले आहेत. बंडखोर आमदारांना उद्देशून ते म्हणाले आहेत की, दगाबाजीचा अंत चांगला होत नाही, असे इतिहास सांगतो. ठाकरे जिंकले जनमानस देखिल जिंकेल. भव्य विजयाची ही सुरुवात आहे, लाठ्या खाऊ, तुरुंगात जाऊ, पण बाळासाहेबांची शिवसेना धगधगत ठेऊ.
न्याय देवता का सन्मान होगा!
— Sanjay Raut (@rautsanjay61) June 29, 2022
🔥 फायर टेस्ट fire test
अग्नीपरिक्षा की घडी हैं.
ये दीन भी निकल जायंगे..
जय महाराष्ट्र! pic.twitter.com/OPNyKTWV0O
त्यांनी आणखी एक ट्वीट करत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे आभार मानले आहेत. ते ट्वीट करून लिहिलं आहे की, ''मी शरद पवार यांचे आभार मानतो. त्यांनी शिवसेना प्रमुखांच्या मुलास सांभाळून घेतले. मार्गदर्शन केलं. स्वतःचे लोक दगाबाजी करत असताना शरद पवार उद्धव ठाकरे यांच्या मागे ठामपणे उभे राहिले. काँग्रेस नेत्यांनी देखील सदैव समन्वयाची भूमिका घेतली. सत्ता येते सत्ता जाते.'' हे ट्वीट करताना त्यांनी शरद पवार यांचा एक फोटोही ट्वीट केलं आहे. ज्यावर लिहिलं आहे की, आज बाळासाहेब नाहीत, ते असते तर सगळं आलबेल झालं असतं. आज त्यांच्या मुलावर संकट कोसळलं आहे. आधार देणं माझं कर्तव्य आहे.
मी शरद पवार यांचे आभार मानतो.त्यांनी शिवसेना प्रमुखांच्या मुलास सांभाळून घेतले.मार्गदर्शन केलं.स्वतःचे लोक दगाबाजी करत असताना शरद पवार उद्धवजीचया मागे ठामपणे उभे राहिले.काँग्रेस नेत्यांनी देखील सदैव समन्वयाची भूमिका घेतली.सत्ता येते सत्ता जाते.
— Sanjay Raut (@rautsanjay61) June 29, 2022
अमरपट्टा घेऊन कोणीच आलेले नाही! pic.twitter.com/j45C3WRTq8