तिसरी आघाडी नाही, आता मुख्य आघाडी स्थापन होईल, नितीश कुमार यांचं सूचक वक्तव्य
Nitish Kumar : बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार हे चार दिवसीय दिल्ली दौऱ्यावर आहेत. नितीश कुमार हे 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी तिसरी आघाडी निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याची चर्चा होती.
Nitish Kumar : बिहारचे (Bihar) मुख्यमंत्री नितीश कुमार (Nitish Kumar) हे चार दिवसीय दिल्ली दौऱ्यावर आहेत. नितीश कुमार हे 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha Elections 2024) तिसरी आघाडी (Third Front) निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याची चर्चा होती. मात्र आता त्यांनी तिसर्या आघाडीची शक्यता फेटाळून लावली असून, त्याच्या जागी मुख्य आघाडी स्थापन केली जाईल, असं म्हटलं आहे. पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले आहेत की, "तिसरी आघाडी नाही. तर आता मुख्य आघाडी बनेल." पत्रकार परिषदेत नितीश कुमार म्हणाले, "आम्ही निर्णय घेतला आणि बिहारचे पक्ष एकत्र आले. ज्या राज्यांमध्ये विरोधी पक्ष आहेत, तिथे त्यांची बैठक झाल्यास देशात वातावरण निर्माण होण्यास सुरु होईल आणि हे 2024 साठी चांगले ठरेल.''
नितीश कुमार म्हणाले की, "अनेक पक्षाच्या नेत्यांकडून चर्चेसाठी मला फोन येत होते. म्हणून मी या संदर्भात दिल्लीत आलो. सोनिया गांधी यांनाही एकदा भेटेन. सर्वांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला. आमच्या बाजूने 2024 ची निवडणूक खूप चांगली ठरणार आहे. मात्र त्यांच्या ही बाजूने एकतर्फी असेल. तिसरी आघाडी नाही, तर मुख्य आघाडी बनणार आहे.” हरियाणातील निवडणूक प्रचाराला जाण्याबाबत नितीश कुमार यांना पत्रकारांनी विचारले असताते म्हणाले, “हरयाणातील रॅलीत मी सहभागी होणार आहे. आधीही जात आलो आहे.
नितीश कुमार यांनी माजी पंतप्रधान दिवंगत अटल बिहारी वाजपेयी यांचे नाव घेत पुन्हा भाजला लक्ष केलं आहे. नितीश कुमार म्हणाले आहेत की, अटल बिहारी वाजपेयींच्या सहा वर्षात अनेक कामे झाली आणि भाजप सरकारच्या सध्याच्या कार्यकाळात एकही नवीन काम झाले नाही. प्रत्येक गोष्टीला नावं ठेवणं आणि काम न करता प्रचार करणं, काम न करता फक्त प्रसिद्धी करायची, ही काही लोकांची सवय झाली आहे.
विरोधी पक्षांच्या एकजुटीबाबत नितीश कुमरे म्हणाले, "काँग्रेस असो, डावे असोत किंवा इतर पक्ष, सगळे महत्त्वाचे आहेत. सगळ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. सर्वांनी सहमती दर्शवली तर खूप चांगले वातावरण निर्माण होऊ शकते. यानंतर अनेक पक्षांचे लोक एकत्र बसतील. आम्ही हे सुरू ठेवू.” ते म्हणाले की, त्यांना पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा फोन आला होता. भाजपवर हल्लाबोल करताना नितीश म्हणाले, "या लोकांची इच्छा होती की प्रत्येक घरातील नळाचे श्रेय केंद्राकडे जावे. आम्ही 2016 पासून प्रत्येक घरातील नळावर काम करत आहोत, जे या लोकांनी नंतर आणले. आमच्यामुळे त्यांचा पाठिंबा वाढला आणि हे लोक आमचा पराभव करत होते.