एक्स्प्लोर

Thane Lok Sabha : ठाण्याचा तिढा कायम असताना प्रताप सरनाईक यांचं पत्र व्हायरल, निवडणूक लढवणार असल्याचा पत्रात उल्लेख

Thane Lok Sabha : ठाण्याच्या जागेसाठी शिवसेना शिंदे गटाकडून रविंद्र फाटकांच्या नावाबाबत शिंदे स्वत: आग्रही होते. मात्र, सर्वसामान्य नाव म्हणून सरनाईकांच्या नावाचाही अंतिम निर्णय होऊ शकतो. 

ठाणे :  शिवसेनेच्या (Shiv Sena) प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांना ठाणे लोकसभा मतदारसंघाची (Thane Lok Sabha Election)  उमेदवारी मिळणार का अशी चर्चा सध्या रंगली आहे. कारण ठाण्याच्या जागेचा तिढा कायम असताना प्रताप सरनाईक यांचे एक पत्र वायरल झाले आहे, ज्यात प्रताप सरनाईक लोकसभा लढवणार असल्याचं स्वतः सरनाईक यांनी म्हटलं आहे. एकीकडे रत्नागिरी-सिंधुदुर्ग आणि ठाण्याच्या जागेवर उमेदवाराची घोषणा झालेली नाही. ठाण्याच्या जागेसाठी शिवसेना शिंदे गटाकडून रविंद्र फाटकांच्या नावाबाबत शिंदे स्वत: आग्रही होते. मात्र, सर्वसामान्य नाव म्हणून सरनाईकांच्या नावाचाही अंतिम निर्णय होऊ शकतो. 

ठाण्याच्या जागेचा तिढा अजूनही कायम असताना प्रताप सरनाईक यांचे एक पत्र व्हायरल  झाले आहे. प्रताप सरनाईक लोकसभा लढवणार असल्याचे स्वतः सरनाईक यांनी म्हटले आहे. नवी मुंबई, ठाणे, मिरा भाईंदर या क्षेत्रात असलेल्या गुन्ह्यांची माहिती या पत्राद्वारे सरनाईक यांनी मागितली आहे. निवडणूक लढवण्यासाठी गुन्ह्यांची माहिती देणं बंधनकारक आहे.  हे पत्र 29 मार्चचे आहे, त्यानंतर बऱ्याच घडामोडी घडून गेल्या आहेत, मात्र ठाण्याची जागा सेनेला सुटली असल्याची चर्चा आहे, तर रत्नागिरीचा जागा ही भाजपला सुटल्याची चर्चा आहे. त्यामुळे या दोन्ही जागेचा तिढा खरच  सुटला का हा प्रश्न आहे. 

शिंदे गटाकडून रविंद्र फाटकांच्या नावाबाबत शिंदे स्वत: आग्रही

मिळालेल्या माहितीनुसार अजुनही सिंधुदुर्गच्या जागेवर उमेदवाराची घोषणा झालेली नाही कारण इकडे ठाण्याचा निर्णय झालेला नाही. ठाण्याच्या जागेसाठी शिंदे गटाकडून रविंद्र फाटकांच्या नावाबाबत शिंदे स्वत: आग्रही होते. मात्र, सर्वमान्य नाव म्हणून सरनाईकांच्या नावाचाही अंतिम निर्णय होऊ शकतो. 

ठाणे लोकसभा मतदारसंघ युतीत कुणाच्या पदरात पडणार?

 ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी एकनाथ शिंदे आग्रही आहेत. ठाणे मतदारसंघ शिंदे यांचा बालेकिल्ला आहे. याच मतदारसंघातून शिंदे गटाचे प्रताप सरनाईक, माजी महापौर नरेश मस्के आणि माजी विधान परिषदेचे रवींद्र फाटक यांच्या नावाची चर्चा आहे. सोबतच भाजप नेत्यांनी या जागेवर दावा केला असून, भाजपचे काही वरिष्ठ नेते सुद्धा यासाठी प्रचंड आग्रही असल्याची चर्चा आहे. तर, भाजपकडून डॉ. संजीव नाईक यांच्या नावाची चर्चा आहे. त्यामुळे ठाणे लोकसभा मतदारसंघ युतीत कुणाच्या पदरात पडणार हे पाहणे महत्वाचे असणार आहे.  

हे ही वाचा :

उत्तर-मध्य मुंबईसाठी भाजप नव्या चेहऱ्याच्या शोधात, माधुरी दीक्षितने नकार दिल्यानंतर उज्ज्वल निकम यांच्या नावाची चर्चा

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Bhiwandi Mahangarpalika Election 2026: भिवंडीत चक्रावणारं राजकारण, भाजपमध्ये फूट पडली, 9 नगरसेवक थेट एकनाथ शिंदेंच्या भेटीला, नेमकं काय घडलं?
भिवंडीत चक्रावणारं राजकारण, भाजपमध्ये फूट पडली, 9 नगरसेवक थेट एकनाथ शिंदेंच्या भेटीला, नेमकं काय घडलं?
Maharashtra Live Blog Updates: आग्र्याच्या किल्ल्यात साजरी होणार शिवजयंती; मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांसह राज्यातील अनेक नेत्यांची उपस्थिती
Maharashtra Live Blog Updates: आग्र्याच्या किल्ल्यात साजरी होणार शिवजयंती; मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांसह राज्यातील अनेक नेत्यांची उपस्थिती
Devendra Fadnavis: अजितदादांचं शिवनेरीवर प्रचंड प्रेम होतं, त्यांच्या इच्छेनुसार पुण्यातील सर्व गड, किल्ले अतिक्रमणमुक्त झालेत: देवेंद्र फडणवीस
अजितदादांचं शिवनेरीवर प्रचंड प्रेम होतं, त्यांच्या इच्छेनुसार पुण्यातील सर्व गड, किल्ले अतिक्रमणमुक्त झालेत: देवेंद्र फडणवीस
Sunetra Pawar Shivneri Fort Speech: जिथे दादा उभे होते, तिथे उभे राहताना...., सुनेत्रा पवार फडणवीस-शिंदेंसमोर भावूक; शिवनेरीच्या साक्षीने रयतेला पहिला शब्द VIDEO
जिथे दादा उभे होते, तिथे उभे राहताना...., सुनेत्रा पवार फडणवीस-शिंदेंसमोर भावूक; शिवनेरीच्या साक्षीने रयतेला पहिला शब्द VIDEO

व्हिडीओ

Sanjay Raut On Eknath shinde : शिंदेंनी बाळासाहेबांच्या शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसला
Jalgaon Child Special Report : खेळता खेळता 3 वर्षांच्या मुलीचं डोकं अडकलं भांड्यात
Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti 2026 शिवजयंतीनिमित्त राज्यभरात उत्साह, ठिकठिकाणी विविध कार्यक्रम
Bhigwan Kidnapping Case : अपहरण झालेल्या तरुणीचा जबरदस्तीने व्हिडीओ बनवला, पडळकरांचा मोठा दावा
Bhiwandi Mahapalika भाजपने महापौरपदाचा उमेदवार बदलला,नारायण चौधरींऐवजी स्नेहा मेहुल पाटील यांना संधी

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sundar Pichai: AI अब्जावधी लोकांचं आयुष्य सुधारू शकतो, सर्वांना उपयुक्त बनवण्यासाठी आपल्याला धाडसी पावलं उचलावी लागतील; AI भीतीवर गुगल सीईओ सुंदर पिचाईंनी कोणता कानमंत्र दिला?
AI अब्जावधी लोकांचं आयुष्य सुधारू शकतो, सर्वांना उपयुक्त बनवण्यासाठी आपल्याला धाडसी पावलं उचलावी लागतील; AI भीतीवर गुगल सीईओ सुंदर पिचाईंनी कोणता कानमंत्र दिला?
Bhiwandi Mahangarpalika Election 2026: भिवंडीत चक्रावणारं राजकारण, भाजपमध्ये फूट पडली, 9 नगरसेवक थेट एकनाथ शिंदेंच्या भेटीला, नेमकं काय घडलं?
भिवंडीत चक्रावणारं राजकारण, भाजपमध्ये फूट पडली, 9 नगरसेवक थेट एकनाथ शिंदेंच्या भेटीला, नेमकं काय घडलं?
Galgotias University AI Summit Dog:आधी भारताचं जगासमोर नाक कापलं अन् नंतर गलगोटिया युनिव्हर्सिटीच्या प्राध्यापक धडधडीत खोटंही बोलल्या, आता म्हणाल्या, 'तो AI कुत्रा...'
आधी भारताचं जगासमोर नाक कापलं अन् नंतर गलगोटिया युनिव्हर्सिटीच्या प्राध्यापक धडधडीत खोटंही बोलल्या, आता म्हणाल्या, 'तो AI कुत्रा...'
Rohit Pawar and Sunetra Pawar: सुनेत्रा पवारांना राष्ट्रीय अध्यक्ष करण्यासाठी 35 आमदारांचा पाठिंबा, सह्या न करणारे 'ते' आमदार कोण?
सुनेत्रा पवारांना राष्ट्रीय अध्यक्ष करण्यासाठी 35 आमदारांचा पाठिंबा, सह्या न करणारे 'ते' आमदार कोण?
Pune Municipal Corporation: दूषित अन् अपुरा पाणीपुरवठा; नागरिकांच्या जीवाशी खेळ, नगरसेवकांनी प्रशासनाला धरले धारेवर, पाणीपुरवठ्याबाबत क्षेत्रीय कार्यालयनिहाय बैठका घेण्याचे महापौरांचे आदेश
दूषित अन् अपुरा पाणीपुरवठा; नागरिकांच्या जीवाशी खेळ, नगरसेवकांनी प्रशासनाला धरले धारेवर, पाणीपुरवठ्याबाबत क्षेत्रीय कार्यालयनिहाय बैठका घेण्याचे महापौरांचे आदेश
'स्तन पकडणे, पायजम्याची नाडी ओढणं अत्याचार नाही' म्हणणाऱ्या अलाहाबाद हायकोर्टाचा निर्णय सुप्रीम कोर्टाकडून रद्दबातल; 'पायजम्याची नाडी ओढणे हा अत्याचाराचाच प्रयत्न'
'स्तन पकडणे, पायजम्याची नाडी ओढणं अत्याचार नाही' म्हणणाऱ्या अलाहाबाद हायकोर्टाचा निर्णय सुप्रीम कोर्टाकडून रद्दबातल; 'पायजम्याची नाडी ओढणे हा अत्याचाराचाच प्रयत्न'
Mantralaya Bribery Sting Operation: '50 घेऊन ये आणि तुझं काम करून जा', मंत्रालयातील झिरवळांच्या कार्यालयातील लाचखोरीचं स्टिंग ऑपरेशन, पाहा संपूर्ण VIDEO समोर
'50 घेऊन ये आणि तुझं काम करून जा', मंत्रालयातील झिरवळांच्या कार्यालयातील लाचखोरीचं स्टिंग ऑपरेशन, पाहा संपूर्ण VIDEO समोर
Abhishek Sharma Jersey T20 World Cup 2026: पहिले अर्शदीप, मग मोहम्मद सिराजची जर्सी घालून अभिषेक शर्मा मैदानात उतरला; नेमकं कारण आलं समोर!
पहिले अर्शदीप, मग मोहम्मद सिराजची जर्सी घालून अभिषेक शर्मा मैदानात उतरला; नेमकं कारण आलं समोर!
Embed widget