(Source: ECI/ABP News/ABP Majha)
उत्तर-मध्य मुंबईसाठी भाजप नव्या चेहऱ्याच्या शोधात, माधुरी दीक्षितने नकार दिल्यानंतर उज्ज्वल निकम यांच्या नावाची चर्चा
North Central Mumbai: उज्ज्वल निकम यांच्या नावाची चाचपणी सुरु असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे ओळखीचा आणि प्रसिद्ध चेहरा या मतदारसंघातून असावा अशी इच्छा केंद्रीय नेतृत्वाची आहे.
मुंबई : आगामी लोकसभेसाठी (Lok Sabha Election 2024) सर्वच पक्षांमध्ये चुरस दिसून येत आहे. अशातच भाजपच्या (BJP) गोटातून अत्यंत मोठी बातमी समोर येत आहे. लोकसभेसाठी भाजपने (BJP) मुंबईतल्या जागांवर आपले उमेदवार जाहीर केले. परंतु विद्यमान खासदार पूनम महाजन (Poonam Mahajan) यांच्या उत्तर-पश्चिम लोकसभा मतदारसंघाबद्दल अद्याप निर्णय झालेला नव्हता. या जागेवरुन आशिष शेलार (Ashish Shelar) लढणार अशी चर्चा होती. मात्र आशिष शेलार इच्छुक नसल्याने भाजपकडून उज्ज्वल निकम यांच्या नावाची चाचपणी सुरु आहे.
उत्तर मध्य मुंबई (North Central Mumbai) लोकसभा मतदारसंघासाठी (Lok Sabha Election) ज्येष्ठ सरकारी वकील उज्ज्वल निकम (Ujjwal Nikam) यांच्या नावाची चर्चा आहे. पूनम महाजन यांना मतदार संघात होत असलेला विरोध यामुळे भाजप नव्या चेहऱ्याच्या शोधात आहे. पक्षाने आशिष शेलार यांना या लोकसभा मतदार संघातून विचारणा केली मात्र त्यांनी नकार दिल्याची माहिती समोर येत आहे. याचमुळे उज्ज्वल निकम यांच्या नावाची चाचपणी सुरु असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे ओळखीचा आणि प्रसिद्ध चेहरा या मतदारसंघातून असावा अशी इच्छा केंद्रीय नेतृत्वाची आहे.
भाजपकडून त्यांच्या नावाची चाचपणी सुरू आहे. उज्जवल निकम हे प्रसिद्ध सराकरी वकिल आहेत. या अगोदर माधुरी दीक्षित यांना देखील विचारणा करण्यात आली होती. मात्र त्यांनी देखील लढण्यास स्पष्ट नकार दिला. त्यानंतर उज्जवल निकम यांच्या नावाची भाजप चाचपणी करत आहे. कारण भाजपला मुंबईतील सहाच्या सहा जागा महायुतीला जिंकण्याचा आहे. त्यामुळे प्रसिद्ध चेहराच या मतदारसंघातून दिला जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.
उमेदवाराच्या नावाबाबत गुप्तता
उज्ज्वल निकम यांच्याकडून कोणतेही स्पष्टीकरण दिले आहे. भाजपच्या नेत्यांनी देखील या विषयावर मौन बाळगले आहे. मुंबईच्या दोन जागांचा पेड अजून कायम आहे. त्यामुळे ऐनवेळी उमेदवार देण्यात येणार आहे. त्यामुळे नावाबाबात कमालीची गुप्तता पाळण्यात आली आहे. सध्या भाजपच्या पूनम महाजन उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून खासदार आहेत. मात्र पक्ष त्यांचे तिकीट रद्द करण्याची शक्यता आहे 2014 च्या मोदी लाटेपासून भाजपने या जागेवरून सलग दोन निवडणुका जिंकल्या आहेत. त्यापूर्वी ही जागा काँग्रेसच्या ताब्यात होती. जळगावमधून उज्ज्वल निकम यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता होती .
हे ही वाचा :