(Source: ECI/ABP News/ABP Majha)
एकीकडे अंबादास दानवेंचं विमानतळाबाहेर आंदोलन; तर दुसरीकडे ठाकरे गटाचे आमदार नरेंद्र मोदींच्या स्वागतला!
Maharashtra Politics: पंतप्रधान नरेंद्र मोदी एका कार्यक्रमासाठी जळगावमध्ये दाखल झाले होते.
Maharashtra Politics: राज्य सरकारच्यावतीने 'लखपती दीदी संमेलन' आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) देखील जळगावमध्ये दाखल झाले होते. रविवारी सकाळी छत्रपती संभाजीनगर विमानतळावर नरेंद्र मोदींचं आगमन झालं होतं. त्यानंतर हेलिकॉप्टरने जळगावकडे हेलिकॉप्टरने नरेंद्र मोदी नियोजित कार्यक्रमासाठी रवाना झाला.
नरेंद्र मोदींचं (Narendra Modi) छत्रपती संभाजीनगर विमानतळावर जोरदार स्वागत करण्यात आले. यावेळी पालकमंत्री अब्दुल सत्तार, गृहनिर्माण मंत्री अतुल सावे, खासदार संदीपान भुमरे, खासदार भागवत कराड, आमदार संजय शिरसाट, आमदार प्रशांत बंब, आमदार पंकजा मुंडे यांच्यासह राज्य सरकारचे अनेक अधिकारी उपस्थित होते. विशेष म्हणजे ठाकरे गटाचे आमदार उदयसिंह राजपूत (Udaysingh Rajput) देखील नरेंद्र मोदींच्या स्वागतासाठी विमानतळावर उपस्थित होते.
प्रधानमंत्री @narendramodi आज महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असून छत्रपती संभाजीनगर विमानतळावर त्यांचे आगमन झाले. यावेळी लोकप्रतिनिधी व प्रशासनाच्यावतीने त्यांचे स्वागत करण्यात आले.
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) August 25, 2024
जळगाव येथे होणाऱ्या #लखपतीदीदी संमेलन कार्यक्रमास प्रधानमंत्री उपस्थित राहणार आहेत. pic.twitter.com/H1XlUc1HoT
अंबादास दानवेंचं विमानतळाबाहेर आंदोलन-
ठाकरे गटाचे कन्नडचे आमदार उदयसिंह राजपूत नरेंद्र मोदींच्या स्वागताला आले होते. एकीकडे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आणि ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांचं विमानतळाबाहेर आंदोलन सुरु होते. दुसरीकडे उदयसिंह राजपुत नरेंद्र मोदींच्या स्वागाताला गेल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
महाराष्ट्राचे खूप मोठे योगदान-
लखपती दीदी संमेलनात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रातील महिलांचे बचत गटाच्या माध्यमातून सुरु असलेल्या कामाचे कौतुक केले. गेल्या दोन महिन्यात देशात 11 लाख लखपती दीदी झाल्या त्यात एकट्या महाराष्ट्रातील 1 लाख दीदी असल्याचे नरेंद्र मोदींनी सांगितले. आज भारत विकसित राष्ट्र होत आहे, त्यात महाराष्ट्राचे योगदान खूप मोठे आहे. मोठ्या प्रमाणात गुंतवणूकदार महाराष्ट्राकडे आकर्षित होत असल्याचं देखील नरेंद्र मोदी यावेळी म्हणाले. 'युरोप खंडातील पोलंड दौऱ्यावर असताना तिथे महाराष्ट्राच्या संस्कृतीचे आपल्याला अनोखे दर्शन घडल्याचे देखील नरेंद्र मोदींनी सांगितले.
मोदी यांनी कायमच राज्याला भक्कम साथ दिली- मुख्यमंत्री
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कायमच राज्याला भक्कम साथ दिली असून, 76 हजार कोटींच्या वाढवण बंदर विकासाला सहाय्य केले. तसेच मुंबई आणि पुण्यातील मेट्रो प्रकल्पांना देखील मंजुरी दिली असल्याचे सांगितले. मात्र कांदा, कापूस, दूध, सोयाबीन यांना चांगला दर मिळण्याच्या दृष्टीने त्यांनी लक्ष घालावे आणि राज्यातील सिंचन प्रकल्पांना मदत करावी अशी अपेक्षा यावेळी व्यक्त केली. नेपाळ येथे झालेल्या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या जळगाव जिल्ह्यातील यात्रेकरूंच्या कुटूंबियांना पाच लाख रुपयांची मदत केली जाईल अशी घोषणाही एकनाथ शिंदेंनी केली.