एक्स्प्लोर

गृहमंत्र्यांकडून शून्य अपेक्षा, आता लेकीबाळी अंबाबाईच्याच भरोशावर, पुण्यातील घटनेनंतर सुषमा अंधारे संतापल्या!

Sushma Andhare : पुण्यातील लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणावरून शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधलाय. 

पुणे : गेल्या काही दिवसांपासून राज्यात लैंगिक अत्याचाराच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. आता पुण्यात दोन अल्पवयीन मुलींवर स्कुल बस ड्रायव्हरने लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली. यामुळे राज्यभरात संताप व्यक्त केला जात आहे. आता पुण्यातील लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणावरून शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर निशाणा साधलाय. 

सुषमा अंधारे म्हणाल्या की, बदलापूर घटनेनंतर तब्बल 12 अशा घटना राज्यात घडल्या आहेत. स्त्री शक्तीचा महिमा सांगणारा आज नवरात्रीचा पहिला दिवस आहे. याच पहिल्या दिवशी अशी घटना घडते. माझ्या गृहमंत्र्यांकडून शून्य अपेक्षा आहेत. त्यांना कुठल्याही प्रकारचा आवाहन किंवा विनंती करावीशी वाटत नाही, असे त्यांनी म्हटले आहे. 

आता लेकीबाळी अंबाबाईच्याच भरोशावर

गृहमंत्र्यांचा राजीनामा सुद्धा मागावा असे वाटत नाही. कारण पंधरा-वीस दिवस बाकी आहेत. अंबाबाईला प्रार्थना करते की, आता लेकीबाळी या तुझ्याच भरोशावर आहेत. राज्य सरकार तुझ्या लेकीबाळीला अजिबात सुरक्षा देऊ शकत नाही, असे म्हणत सुषमा अंधारे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे.  

बचत करण्याच्या नादात निवडतात खाजगी बसेसचा पर्याय 

त्या पुढे म्हणाल्या की, काही बसेस स्कूलकडून असतात तर काही खाजगी असतात. खाजगी बसेसचा खर्च हजार पाचशे रुपये कमी असतो. त्यामुळे बचत करण्याच्या नादात खाजगी बसेसचा पर्याय अनेक जण निवडतात. बऱ्याच विद्यार्थ्यांना सोडताना लेडीज स्टाफ नसतात. बसेस खाजगी असल्यामुळे पालक फारसे बोलत नाहीत, असेही सुषमा अंधारे यांनी म्हटले आहे. 

पुण्यातील संतापजनक घटना

स्कुल बस ड्रायव्हरने आठ वर्षांच्या दोन मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना पुण्यातील वानवडी भागात घडली आहे. याप्रकरणी वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून 45 वर्षांच्या स्कुल बस ड्रायव्हरला अटक करण्यात आली आहे. 30 सप्टेंबरला हा स्कुल बस ड्रायवर विद्यार्थ्यांना घेऊन शाळेत पोहचला. शाळा सुटल्यावर मुलींना पुन्हा घरी  सोडताना त्याने आठ वर्षांच्या दोन पिडित मुलींना ड्रायव्हरच्या केबीनमधे बोलावले आणि त्यांच्यासोबत अश्लील चाळे केले. एका पिडीत मुलीने याबाबत पालकांना याबाबतची माहिती दिल्यावर ड्रायव्हरला अटक करण्यात आली.

आणखी वाचा 

मोठी बातमी : चैतन्य महाराजांना बेड्या, सोशल मीडियावर उपदेशाचे डोस देणारे महाराज पिंपरी पोलिसांच्या कचाट्यात!

Pune Crime: जागेच्या वादातून बिल्डरचा तुफान राडा! पुण्यातील रहिवाश्यांना दंडुक्याने मारहाण, अश्लील शिवीगाळ, अखेर बिल्डरला बेड्या

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Eknath Shinde - Vinod Tawde : आधी कुजबूज, नंतर टाळी दिली! शिंदे-तावडेंमध्ये काय चर्चा?
Eknath Shinde - Vinod Tawde : आधी कुजबूज, नंतर टाळी दिली! शिंदे-तावडेंमध्ये काय चर्चा?
पेट्रोलचा टँकर पलटी झाला, फोंडा घाटाचा रस्ता सरसर वणव्यासारखा पेटत गेला अन्...
पेट्रोलचा टँकर पलटी झाला, फोंडा घाटाचा रस्ता सरसर वणव्यासारखा पेटत गेला अन्...
Devendra Fadnavis Chief Minister : देवेंद्र फडणवीसांची झंझावाती कारकीर्द, कमबॅकची कहाणी माझा वर
Devendra Fadnavis Chief Minister : देवेंद्र फडणवीसांची झंझावाती कारकीर्द, कमबॅकची कहाणी माझा वर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 डिसेंबर 2024 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 डिसेंबर 2024 | बुधवार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Zero Hour : शपथविधीआधी देवेंद्र फडणवीसांसमोर सर्वात मोठी आव्हानं, एकनाथ शिंदेच्या नाराजीचा अर्थ काय?Special Report on Devendra Fadnavis : सर्वसमावेशक अनुमोदन, देवेंद्र फडणवीस भाजप विधिमंडळ पक्षनेतेपदीSudhir Mungantiwar on Oath Ceremony : उद्या फक्त 3 जण शपथ घेतील, सुधीर मुनगंटीवारांची मोठी माहितीEknath Shinde - Vinod Tawde : आधी कुजबूज, नंतर टाळी दिली! शिंदे-तावडेंमध्ये काय चर्चा?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Eknath Shinde - Vinod Tawde : आधी कुजबूज, नंतर टाळी दिली! शिंदे-तावडेंमध्ये काय चर्चा?
Eknath Shinde - Vinod Tawde : आधी कुजबूज, नंतर टाळी दिली! शिंदे-तावडेंमध्ये काय चर्चा?
पेट्रोलचा टँकर पलटी झाला, फोंडा घाटाचा रस्ता सरसर वणव्यासारखा पेटत गेला अन्...
पेट्रोलचा टँकर पलटी झाला, फोंडा घाटाचा रस्ता सरसर वणव्यासारखा पेटत गेला अन्...
Devendra Fadnavis Chief Minister : देवेंद्र फडणवीसांची झंझावाती कारकीर्द, कमबॅकची कहाणी माझा वर
Devendra Fadnavis Chief Minister : देवेंद्र फडणवीसांची झंझावाती कारकीर्द, कमबॅकची कहाणी माझा वर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 डिसेंबर 2024 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 डिसेंबर 2024 | बुधवार
Maharashtra CM : शपथ विधिबाबत एकनाथ शिंदेंचा सस्पेन्स कायम; समजूत काढण्यासाठी शिवसेनेचे आमदार वर्षावर
शपथ विधिबाबत एकनाथ शिंदेंचा सस्पेन्स कायम; समजूत काढण्यासाठी शिवसेनेचे आमदार वर्षावर
Eknath Shinde : देवेंद्र फडणवीस यांची विनंती अन् उपमुख्यमंत्रिपदाबाबतचा प्रश्न, एकनाथ शिंदे पत्रकार परिषदेत काय म्हणाले?
देवेंद्रजींनी मुख्यमंत्री व्हावं असं पाठिंब्याचं पत्र सेनेनं दिलं, एकनाथ शिंदेंनी सांगितला अडीच वर्षांपूर्वीचा प्रसंग
Devendra Fadnavis : Eknath Shinde मंत्रिमंडळात राहणार नाही? फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Devendra Fadnavis : Eknath Shinde मंत्रिमंडळात राहणार नाही? फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Rahul Narwekar : राहुल नार्वेकर पुन्हा विधानसभा अध्यक्ष होणार, सूत्रांची माहिती, विशेष अधिवेशनाच्या तारखा समोर
राहुल नार्वेकर पुन्हा विधानसभा अध्यक्ष होणार, सूत्रांची माहिती, विशेष अधिवेशनाच्या तारखा समोर
Embed widget