एक्स्प्लोर

Pune Crime: जागेच्या वादातून बिल्डरचा तुफान राडा! पुण्यातील रहिवाश्यांना दंडुक्याने मारहाण, अश्लील शिवीगाळ, अखेर बिल्डरला बेड्या

Pune Crime: एका बिल्डरने (Builder) रहिवाशांना चक्क दंडुक्याने मारहाण केली. त्याचबरोबर महिलांसमोर अश्लील शिवीगाळ केली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहेत.

पुणे: गेल्या काही दिवसांमध्ये सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुणे शहरात मोठ्या प्रमाणावर गुन्हे घडतानाचे चित्र दिसून येत आहे. कोयता गँगची दहशत, गुंडगिरी, धमकावणे यासारख्या घटना मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहेत. अशातच काल पुणे शहरातील सुस येथे बिल्डरने तुफान राडा घातल्याची घटना समोर आली होती. एका बिल्डरने (Builder) रहिवाशांना चक्क दंडुक्याने मारहाण केली. त्याचबरोबर महिलांसमोर अश्लील शिवीगाळ केली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहेत. सुस येथील लगतच्या सोसायटी धारकांसोबत सुरु असलेल्या जमिनीच्या वादातून हा धक्कादायक प्रकार घडल्याची प्राथमिक माहिती आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल झाल्यानंतर आता पोलिसांनी कारवाई केल्याची माहिती समोर आली आहे. 

तुफान राडा घालणारा बिल्डर यशवंत निम्हणला पोलिसांनी अटक केली आहे, हिंजवडी पोलिसांनी मारहाण आणि अश्लील शिवीगाळ प्रकरणी कारवाई केल्याची माहिती समोर आली आहे. सुस येथील तीर्थ टॉवर्सच्या रहिवाश्यांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केलेला आहे.  

तीर्थ टॉवर्सचे रहिवाशी आणि बिल्डर यशवंत निम्हण यांच्यातील वाद नेमका कशावरून?

तीर्थ डेव्हलपर्स या बिल्डरने तीर्थ टॉवर्समध्ये इमारती उभारल्या. तिथं घरं घेताना या बिल्डरने रहिवाश्यांसाठी वेगवेगळ्या सोयी-सुविधा देणार असल्याचं दाखवलं. त्यात गोल्फ कोर्टचा समावेश होता, तसेच इंटर्नल रोड ही दिला. मात्र कालांतराने बिल्डर यशवंत निम्हण यांनी या गोल्फ कोर्ट आणि इंटर्नल रोडवर दावा सांगितला. त्यामुळं तीर्थ डेव्हलपर्स आणि निम्हण यांनी संगनमत केल्याचा आरोप रहिवाशी करतात. गेली पाच वर्षांपासून हा वाद सुरु असून न्यायालयात सुनावणी ही चालू आहे. मात्र निम्हण वेळोवेळी तीर्थ टॉवर्सच्या समोर येऊन राडा घालतात, असं इथल्या रहिवाश्यांचा आरोप आहे. 2 ऑक्टोबरला निम्हण बिल्डरने घातलेला राडा हा त्यापैकीच एक आहे.

नेमकं काय घडलं?

सुस येथील लगतच्या सोसायटी धारकांसोबत सुरु असलेल्या जमिनीच्या वादातून हा धक्कादायक प्रकार घडल्याची प्राथमिक माहिती आहे. बिल्डरने केलेल्या मारहाणीप्रकरणावरुन रात्री उशिरापर्यंत हिंजवडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती. सुस येथील तीर्थ टॉवर्सच्या लगत यशवंत निम्हण या बिल्डरची साईट सुरू आहे. मात्र, खासगी रस्त्याची जागा नेमकी कोणाची, यावरून न्यायालयात सुनावणी सुरू आहे. अशातच आज बिल्डर जेसीबी घेऊन तीर्थ टॉवर्स बाहेर पोहचले. मग तीर्थ टॉवर्सचे रहिवाशी बाहेर आले अन् वादाला तोंड फुटले. त्यावेळी, बिल्डर निम्हण यांनी थेट दंडुक्याने काहींना मारहाण केली, अगदी महिलांदेखत अश्लील शिवीगाळ ही केली. नंतर हिंजवडी पोलिसांना या राड्याची कल्पना दिली गेली. पोलीस घटनास्थळी येताच प्रकरण थंडावले. नंतर बिल्डरला घेऊन पोलीस येत असताना रहिवाशांनी गाडीची डिकी तपासण्याचा आग्रह धरला. पोलिसांनी डिकी तपासली असता लाकडी दांडके आणि बॅट्स आढळल्या आहेत. 

सोशल मिडियावर व्हिडिओ व्हायरल

बिल्डर निम्हण याने रहिवाशांवर लाठीहल्ला केला आणि अश्लील भाषा वापरून महिलांना शिवीगाळ केली. बिल्डरच्या आक्रमक वर्तनाचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. व्हायरल व्हिडिओनंतर आता पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Saif Ali Khan Attacked: तैमूर-जेहच्या नॅनीसोबत चोराची बाचाबाची, सैफच्या पाठीत मागून धारदार शस्त्र खुपसलं, प्रतिकार करुन चोराला पळवलं
करिना अन् लहानग्या मुलांच्या सुरक्षेसाठी सैफ चोराला भिडला, पाठीत वार झाला पण शेवटपर्यंत लढला
Saif Ali Khan : रात्रीच्या 2 वाजता सैफ अली खानच्या घरात काय घडलं? जाणून घ्या इनसाइड स्टोरी
रात्रीच्या 2 वाजता सैफ अली खानच्या घरात काय घडलं? जाणून घ्या इनसाइड स्टोरी
Saif Ali Khan : सैफ अली खानच्या मानेवर खोल जखम, लिलावती रुग्णालयातील डॉक्टरांकडून प्रकृतीबाबत महत्त्वाची अपडेट
सैफ अली खानच्या मानेवर खोल जखम, लिलावती रुग्णालयातील डॉक्टरांकडून प्रकृतीबाबत महत्त्वाची अपडेट
Saif Ali Khan Attack Full Story : सपासप वार, मानेला मोठी जखम; सैफवरील हल्ल्याचा पूर्ण घटनाक्रम
Saif Ali Khan Attack Full Story : सपासप वार, मानेला मोठी जखम; सैफवरील हल्ल्याचा पूर्ण घटनाक्रम
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Saif Ali Khan Attacked : सैफवर प्राणघातक हल्ला, मानेवर 10 सेंटीमीटरची जखम,पाठीतही वारABP Majha Marathi News Headlines 9AM TOP Headlines 09 AM 16 January 2025 सकाळी ९ च्या हेडलाईन्स-Supriya Sule Saif ALi Khan : सैफ अली खानवर चाकू हल्ला, सुप्रिया सुळेंचा करिश्मा कपूरला फोनSaif Ali Khan Attack Full Story : सपासप वार, मानेला मोठी जखम; सैफवरील हल्ल्याचा पूर्ण घटनाक्रम

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Saif Ali Khan Attacked: तैमूर-जेहच्या नॅनीसोबत चोराची बाचाबाची, सैफच्या पाठीत मागून धारदार शस्त्र खुपसलं, प्रतिकार करुन चोराला पळवलं
करिना अन् लहानग्या मुलांच्या सुरक्षेसाठी सैफ चोराला भिडला, पाठीत वार झाला पण शेवटपर्यंत लढला
Saif Ali Khan : रात्रीच्या 2 वाजता सैफ अली खानच्या घरात काय घडलं? जाणून घ्या इनसाइड स्टोरी
रात्रीच्या 2 वाजता सैफ अली खानच्या घरात काय घडलं? जाणून घ्या इनसाइड स्टोरी
Saif Ali Khan : सैफ अली खानच्या मानेवर खोल जखम, लिलावती रुग्णालयातील डॉक्टरांकडून प्रकृतीबाबत महत्त्वाची अपडेट
सैफ अली खानच्या मानेवर खोल जखम, लिलावती रुग्णालयातील डॉक्टरांकडून प्रकृतीबाबत महत्त्वाची अपडेट
Saif Ali Khan Attack Full Story : सपासप वार, मानेला मोठी जखम; सैफवरील हल्ल्याचा पूर्ण घटनाक्रम
Saif Ali Khan Attack Full Story : सपासप वार, मानेला मोठी जखम; सैफवरील हल्ल्याचा पूर्ण घटनाक्रम
सैफ अली खानवर चाकू हल्ला, गृहविभाग काम करतोय का? वर्षा गायकवाड यांचा थेट सवाल
एखादी व्यक्ती घरात घुसते चाकू हल्ला करते, कायदा सुव्यवस्था कुठेय? वर्षा गायकवाडांचा सवाल
सैफ अली खानच्या मानेवर खोल जखम, धारदार पातं पाठीत रुतून राहिलं, डॉक्टरांकडून तातडीची शस्त्रक्रिया
सैफ अली खानच्या मानेवर खोल जखम, धारदार पातं पाठीत रुतून राहिलं, डॉक्टरांकडून तातडीची शस्त्रक्रिया
Saif Ali Khan Attacked in Mumbai: सैफ अली खानवर मुंबईत चोराकडून धारदार शस्त्राने वार; सुप्रिया सुळेंनी पुण्यातून लगेच फोन फिरवला, म्हणाल्या....
सैफ अली खानवर मुंबईत चोराकडून धारदार शस्त्राने वार; सुप्रिया सुळेंनी पुण्यातून लगेच फोन फिरवला, म्हणाल्या....
PM Kisan : पीएम किसानचे आतापर्यंत 36000 रुपये मिळाले, 19 व्या हप्त्याचे 2000 कधी येणार?शेतकऱ्यांचं लक्ष लागलं
पीएम किसानचे आतापर्यंत 36000 रुपये मिळाले, 19 व्या हप्त्याचे 2 हजार कधी येणार,शेतकऱ्यांचं लक्ष लागलं
Embed widget