Sushma Andhare on Sada Sarvankar : सदा सरवणकरांनी रश्मी ठाकरेंवर आरोप करताच सुषमा अंधारे संतापल्या, म्हणाल्या...
Sushma Andhare on Sada Sarvankar : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शिवसेनेचे आमदार सदा सरवणकर (Sada Sarvankar) यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्यावर टीका केली होती.
Sushma Andhare on Sada Sarvankar : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शिवसेनेचे आमदार सदा सरवणकर (Sada Sarvankar) यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्यावर टीका केली होती. रश्मी ठाकरे भोळ्या दिसतात पण कपटी आहेत, असं सदा सरवणकर (Sada Sarvankar) यांनी म्हटलं होतं. शिवाय रश्मी ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंना मातोश्रीवर कोंडून ठेवलं होतं. नवऱ्याला घरात कोंडून मुलाला राजकारणात पुढे आणण्याचा त्यांच्या प्लॅन होता, असे सनसनाटी आरोपही सरवणकर यांनी केले. दरम्यान सरवणकरांच्या आरोपांना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.
सुषमा अंधारे काय म्हणाल्या?
आमदार सदा सरवणकरांना प्रत्तुत्तर देताना सुषमा अंधारे (Sushma Andhare) म्हणाल्या, आधी हिंदूत्व, मग निधीचं कारण, त्यानंतर राष्ट्रवादीशी युती केली. त्यानंतर आमचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आजाराचे नाटक करत आहेत. आता सदा सरवणकरांचा आणखी एक जावई शोध समोर आलाय. ते म्हणाले ठाकरेंना मुलाला मुख्यमंत्री करायचे होते. माणसाने किती खालची पातळी गाठावी? त्याला काही मर्यादा असतात, असंही अंधारे (Sushma Andhare) म्हणाल्या.
मेंदू अजूनही 5 ते 7 वर्षांच्या मुलासारखा काम करतो
पुढे बोलताना सुषमा अंधारे (Sushma Andhare) म्हणाल्या, सदा सरवणकर किंवा त्यांच्यासारखे कोणी लोक असतील कदाचित यांना कुटुंब नावाची व्याख्या समजत नसेल. शिवाय, त्यांना भारतीय संस्कृतीचा परिचयही नसेल. भारतीय संस्कृतीतील कोणत्याही महिलेच्या आयुष्यात मुलाच्या आधी नवरा असतो. सदा सरवणकरांसारख्या लोकांबद्दल आणि त्यांच्या बौद्धिक क्षमतेबद्दल आपण अपार करुणा व्यक्त करावी. आता त्यांचं वय कदाचित 50 -60 असेलही पण त्यांचा मेंदू अजूनही 5 ते 7 वर्षांच्या मुलासारखा काम करतो. त्यांच्या मेंदूची वाढ व्हावी, एवढेच आपण बोलू शकतो, असंही अंधारे (Sushma Andhare) यांनी सांगितले.
ठाकरेंचा आरोप, फडणवीसांचे प्रत्युत्तर
देवेंद्र फडणवीस मला म्हणाले होते की, आदित्यला मुख्यमंत्रिपदासाठी तयार करतो आणि मी दिल्लीला जातो, असा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला होता. दरम्यान ठाकरेंच्या आरोपांना देवेंद्र फडणवीसांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं. उद्धव ठाकरे भ्रमिष्ठ झाले आहेत, त्यांना वेड लागलय, अशी टीका फडणवीस यांनी केली होती.
इतर महत्वाच्या बातम्या