Ahmednagar : निलेश लंके पाठांतर करुन माझ्यासारखं फाडफाड इंग्रजी बोलले तर नगरमधून उमेदवारी मागे घेईन: सुजय विखे
Sujay Vikhe Vs Nilesh Lanke : अहमदनगरमध्ये भाजपच्या सुजय विखे पाटील यांच्यासमोर राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या निलेश लंके यांचं आव्हान आहे. दोन्ही उमेदवार एकमेकांवर जोरदार टीका करताना दिसत आहेत.
![Ahmednagar : निलेश लंके पाठांतर करुन माझ्यासारखं फाडफाड इंग्रजी बोलले तर नगरमधून उमेदवारी मागे घेईन: सुजय विखे Sujay Vikhe Patil challenge to nilesh lanke to talk in english language bjp vs ncp sharad pawar south ahmednagar lok sabha election marathi update Ahmednagar : निलेश लंके पाठांतर करुन माझ्यासारखं फाडफाड इंग्रजी बोलले तर नगरमधून उमेदवारी मागे घेईन: सुजय विखे](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/04/02/efa52d2d7a2e7015753b4a26825c5902171207990740393_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
अहमदनगर : लोकसभेच्या रणधुमाळीत विरोधी उमेदवाराचं खच्चीकरण करण्यासाठी अनेकदा वेगवेगळं आव्हान दिलं जातं, त्याच्यातून राजकीय कलगीतुराही रंगतोय आणि कालांतराने विषयही संपवला जातो. दक्षिण अहमदनगर लोकसभा मतदासंघामध्ये (Ahmednagar Lok Sabha Constituency) मात्र भाजपचे उमेदवार सुजय विखे (Sujay Vikhe Patil) यांनी राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाच्या निलेश लंके यांना एक आव्हान दिलं आणि त्याची चर्चा सर्वत्र रंगलीय. मी जेवढी इंग्रजी बोलतो तेवढी इंग्रजी निलेश लंके (Nilesh Lanke) यांनी पाठ करून जरी बोलली तरी मी अर्ज भरणार नाही असं जाहीर आव्हान सुजय विखे पाटलांनी दिलंय.
अहमदनगर येथे प्रचाराच्या सुरुवातीलाच दोन्ही बाजूचे उमेदवार एकमेकांना आव्हान देताना पाहायला मिळत आहे. मी जेवढी इंग्रजी बोलतो तेवढी इंग्रजी समोरच्या उमेदवाराने पाठ करून जरी बोलून दाखवली तरी मी उमेदवारी अर्ज भरणार नाही असं खुलं आव्हान भाजपचे उमेदवार सुजय विखेंनी निलेश लंके यांना दिलं आहे.
अहमदनगर शहरातील राष्ट्रवादी कार्यकर्ता मेळाव्यात सुजय विखे बोलत होते. मेळाव्याच्या सुरुवातीला सुजय विखेंनी संसदेत इंग्रजीत केलेल्या भाषणाचा एक व्हिडीओ दाखवण्यात आला. याचा आधार घेत सुजय विखेंनी निलेश लंकेंनी इंग्रजी बोलण्याचं आव्हान दिलं. महिनाभरात जरी त्यांनी हे इंग्रजीतील भाषण पाठ करून म्हणून दाखवावं असं सुजय विखेंनी म्हटले आहे.
अहमदनगर लोकसभा मतदारसंघ हा राज्यातील एक लक्षवेधी मतदारसंघ. त्या ठिकाणी राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाने पारनेरचे आमदार निलेश लंकेंना उमेदवारी दिली आणि या निवडणुकीत अधिकच रंगत आली. त्यानंतर दोन्ही बाजूंनी आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या जात आहेत. सुजय विखेंनी गेल्या 10 वर्षांमध्ये नगरच्या विकासासाठी काहीच केलं नाही असा आरोप करत निलेश लंकेंनी प्रचाराची वात पेटवली.
किमान दोन लाख मतांनी जिंकणार, निलेश लंकेंचा दावा
अहमदनगरची जागा ही आपण किमान दोन लाखांच्या मताधिक्क्याने जिंकणार असा दावा निलेश लंके यांनी केला. सुजय विखेंवर टीका करताना ते म्हणाले की, "राजकारणातून सत्ता मिळवायची आणि सत्तेतून संपत्ती कमवायची असा वृत्तीचे काहीजण असतात पण आम्ही दुसऱ्या पद्धतीने काम करणारे कार्यकर्ते आहोत. आम्ही राजकारणातून सत्ता मिळवतो आणि सत्तेच्या माध्यमातून जनतेचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करतो. निवडणुकीचा निकाल ठरलेला आहे, किमान दोन लाखांनी आपण विजयी होणार."
ही बातमी वाचा:
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)