Sudhir Mungantiwar: ''थोडंसं बेसावध राहिलो'', फेक नॅरिटीव्हवरुन मुंनगंटीवारांचा विरोधकांवर निशाणा, विधानसभेचं रणशिंग फुंकणार, म्हणाले..
Sudhir Mungantiwar: गृहमंत्री अमित शहांच्या या दौऱ्यातून विधानसभा निवडणुकीचा शंखनाद होणार असल्याचं सुधीर मुनगंटीवार म्हणाले.
Sudhir Mungantiwar: विधानसभा निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर अमित शहा आज छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावर असून या दौऱ्यातून निवडणूकीचा शंखनाथद करणार असल्याचं वनमंत्री सुधीर मुनगंटीवर म्हणाले. लोकसभेत आम्ही थोडे बेसावध राहिलो तर काँग्रेस महाविकास आघाडीनं फेक नॅरेटीव्ह सेट केलं. आरक्षण, सोयाबीन, कापूस, जातीय विचार असं खोटं नॅरिटीव्ह सेट करतात. अशी टीका वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विरोधकांनी केली.
निवडणुकीत हार जीत चालत राहते. त्याची चिंता पक्ष कधीच करत नाही. राज्याच्या सुख समृद्धीच्या दृष्टीने महाविकास आघाडीच्या हातात हे राज्य गेलं तर वाट लावतील ते या राज्याची.. असं वनमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणालेत. गृहमंत्री अमित शहा यांचा आज पासून दोन दिवस महाराष्ट्र दौरा सुरू होत आहे. नागपूर व छत्रपती संभाजीनगर येथे गृहमंत्र्यांची आज हजेरी असेल. या दौऱ्यातून विधानसभा निवडणुकीचा शंखनाद होणार असल्याचं सुधीर मुनगंटीवार म्हणाले.
फेक नॅरेटीव्हवरून विरोधकांवर मुनगंटीवारांचा हल्लाबोल
लोकसभेत आम्ही थोडेसे बेसावध राहिलो तर काँग्रेस व त्यांचे मित्र पक्ष महाविकास आघाडीने खोटं नॅरिटीव्ह सेट केलं. आरक्षण हटवणार, सोयाबीन कापूस, जातीय पद्धतीचा विचार असं हे नरटीव्ह आहे. आधी काँग्रेस व त्यांचे मित्र पक्ष पैसे देऊन निवडणुका जिंकायचे. निवडणुका जिंकण्यासाठी हे काहीही करू शकतात. आता त्यांनी जातीचा आधार घेतलाय. अशी टीका त्यांनी विरोधकांवर केली.
आमचा जाहीरनामा, कार्यकर्त्यांनी पूर्ण शक्तीने स्थिर सरकारसाठी लढायचं. आमचे त्यांचे दोन वर्ष आठ महिने आणि आमचा कार्यकाल याची तुलना करा. त्यांच्या काळात केंद्र सरकार मदत करत नाही एवढंच ते बोलत होते. महाविकास आघाडीच्या हातात हे राज्य गेलं तर ते वाट लावतील या राज्याची. त्यांच्याकडे कोणतही नियोजन नाही. माचिसचे डबे घेऊन कुठे आग लावता येईल एवढाच ते विचार करतात.
बलात्काराविषयी यांच्या मनात प्रेम
बदलापुरात जातील आणि म्हणतील बलात्काराला ताबडतोब फाशी द्या. आता त्या बलात्काऱ्याचं वकीलपत्र घेऊन कसं बोलतात. बलात्काराने दुष्ट बुद्धीनं पोलिसांवर हमला केल्यावर त्याच्याबद्दल यांच्या मनात किती प्रेम निर्माण झालंय. ते काय काय आक्षेप घेतायत हे समजून घेण्याची अपेक्षाय. असं मुनगंटीवार म्हणाले.
विदर्भाकडे महायुतीचे लक्ष
विदर्भाकडे महायुतीचे लक्ष आहे. 2014 मध्ये आपण एकूण 62 पैकी 44 जागा होत्या. मागच्या निवडणुकीत त्या थोड्या कमी झाल्या. महायुतीत कुठल्याही प्रकारचा वाद नसल्याचं सुधीर मुनगंटीवार म्हणाले.
हेही वाचा:
Sanjay Raut : एका शिंदेचा एन्काऊंटर झालाय, दुसऱ्या शिंदेचा एन्काऊंटर जनता करेल : संजय राऊत