Chhagan Bhujbal: छगन भुजबळांच्या मेळाव्याला शरद पवारांचा खास मोहरा उपस्थित, प्रेस कॉन्फरन्सवेळीही मागे उभा दिसला, भेटीवर नेमकं काय म्हणाले?
Chhagan Bhujbal: महायुतीच्या सरकारमध्ये मंत्रिमंडळात भुजबळ यांना मंत्रीपद न मिळाल्याने ते नाराज आहेत. दोन दिवसांपासून नागपूर अधिवेशन अर्धवट सोडून ते नाशिकला गेले आहेत.
नाशिक: राज्याच्या मंत्रीमंडळ विस्तारात अनेक नव्या चेहऱ्यांना संधी मिळाली. तर काही बड्या नेत्यांना डच्चू देण्यात आला आहे. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांच्या पक्षांचे नेते छगन भुजबळ यांना मंत्रीमंडळात स्थान न मिळाल्याने ते नाराज झाले आहेत. त्यानंतर आता राज्यभरातून भुजबळ समर्थक आपला रोष आणि नाराजी व्यक्त करत आहेत. ते आपल्या मतदारसंघात बैठका घेत आहेत. पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्या गाठीभेटी सुरू आहेत. अशातच आज छगन भुजबळ यांच्या भेटीला आज शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष राजा राजापूरकर गेल्याचे दिसून आले आहे.
महायुतीच्या सरकारमध्ये मंत्रिमंडळात भुजबळ यांना मंत्रीपद न मिळाल्याने ते नाराज आहेत. दोन दिवसांपासून नागपूर अधिवेशन अर्धवट सोडून ते नाशिकला गेले आहेत. भुजबळ यांना मंत्रिपद डावलल्याने त्यांच्यावर अन्याय झाला आहे. डाग असणाऱ्या नेत्यांना मंत्रिपद नको असे म्हणत असतील तर अजित पवार यांच्यावर ही 70 हजार कोटींची भ्रष्टाचारचे आरोप झालेत. तरीही ते उपमुख्यमंत्री पदी आहेत. भुजबळ ओबीसी नेते आहेत म्हणून त्यांना डावलले असा आरोप राजापूर यांनी केला आहे. दरम्यान शरद पवार गटाचे राजापूरकर भुजबळांच्या भेटीला आल्याने चर्चना उधाण आलं आहे. मात्र, मी नाशकातच असल्यामुळे छगन भुजबळ यांची भेट घेण्यासाठी आलो असा खुलासा त्यांनी केला आहे.
अजित पवारांच्या प्रतिमेला जोडे मारु नये- छगन भुजबळ
छगन भुजबळ यांनी बुधवारी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी म्हटले की, तुमच्याद्वारे मला लोकांपर्यंत एवढंच पोहोचवायचे आहे की, कोणीही अजित पवारांच्या प्रतिमेला जोडे मारु नयेत किंवा त्यांच्याविषयी आक्षेपार्ह भाषा वापरु नये. यापुढे जो कोणी हे करेल, तो समता परिषदेचा सभासद नाही, असे मानले जाईल. यावेळी भुजबळांना तटकरे यांच्या वक्तव्याविषयी विचारणा करण्यात आली. त्यावर छगन भुजबळ यांनी मौन बाळगणे पसंत केले.
सुनील तटकरेंचा निर्वाणीचा इशारा
छगन भुजबळ यांना मंत्रिपद न मिळाल्यामुळे राज्याच्या अनेक भागांमध्ये त्यांच्या समर्थकांकडून आंदोलन करण्यात आले होते. यावेळी अजित पवारांच्या प्रतिमेला जोडे मारण्यात आले होते. याविषयी सुनील तटकरे यांनी नाराजी व्यक्त केली. जोडे मारो आंदोलन बिलकुल सहन केले जाणार नाही. जे कार्यकर्ते असं करत आहेत, त्यांचा अहवाल मागितला आहे. पक्षाकडून अशा कुठल्याही गोष्टी सहन केल्या जाणार नाहीत. हा भुजबळ यांच्यासाठी इशारा नाही, तर जे पदाधिकारी अस करत आहेत त्यांना सूचना आहेत, असे सुनील तटकरे यांनी म्हटले