Cm Uddhav Thackeray: मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यासाठी राणेंचा स्टेज तोडला
Nitesh Rane: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज अचानक चंद्रभागा शिंदे या 92 वर्षांच्या महिला शिवसैनिकाच्या घरी भेट दिली.
Nitesh Rane: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज अचानक चंद्रभागा शिंदे या 92 वर्षांच्या महिला शिवसैनिकाच्या घरी भेट दिली. मात्र मुख्यमंत्र्यांच्या या अचानक घडलेल्या कार्यक्रमामुळे भाजपची नियोजित असलेली पोलखोल सभा रद्द करावी लागली. ज्या ठिकाणी चंद्रभागा शिंदे राहतात त्याच बिल्डिंगच्या खाली भाजपची आज पोलखोल सभा आयोजित करण्यात आली होती. त्यासाठी स्टेज देखील उभारण्यात आला होता. मात्र मुख्यमंत्र्यांच्या गाड्या जाण्यासाठी हा स्टेज तोडवा लागला.
मुख्यमंत्री येऊन गेल्यानंतर देखील या सभेला परवानगी नसल्याचे कारण देत पोलिसांनी उद्या ही सभा घ्या, असे आवाहन केले. या सभेला भाजप नेते नितेश राणे आणि कालिदास कोळंबकर संबोधित करणार होते. सभा अचानक रद्द झाल्याचे दिसताच भाजप कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या विरोधात घोषणाबाजी सुरू केली. मात्र नितेश राणे यांनी सभेच्या ठिकाणी येऊन पोलखोल सभेला मुख्यमंत्री आणि सरकार घाबरत असल्याचे सांगितले. तसेच सोमवारी दणक्यात ही सभा घेऊ, असेही त्यांनी जाहीर केले.
यावर बोलताना भाजप नेते आणि आमदार नितेश राणे म्हणाले आहेत की, शिवसेनेने कधी नाही तर आमची दखल घेतली, इथल्या नगरसेविकेने मुख्यमंत्री यांना विनवणी केली की, काही पण करून आज इथे या, पण आमच्यामुळे एका आजीला घर मिळाले, यात समाधान आहे. ते फ्रीमध्ये आमच्या कार्यकर्त्यांना चार्ज करुन गेले आहेत. ते म्हणाले, आजची सभा उद्या होईल ऑन दणक्यात होईल, यावरून हे कळले आहे की, शिवसेना आमच्या पोलखोल सभेला किती घाबरते ते.
महत्वाच्या बातम्या
- Chandrakant Khaire : किरीट सोमय्या म्हणजे शक्ती कपूर ; चंद्रकांत खैरेंचा हल्लाबोल
- Kirit Somaiya PC : माझ्यावर झालेला हल्ला ठाकरे सरकारकडून स्पॉन्सर्ड : किरीट सोमय्या
- Kirit Somaiya : मुंबईत राडा सुरूच, शिवसैनिकांच्या हल्ल्यामध्ये किरीट सोमय्या जखमी
- Treason: राजद्रोह म्हणजे नेमकं काय? कधी दाखल केला जाऊ शकतो गुन्हा, जाणून घ्या