Chandrakant Khaire : किरीट सोमय्या म्हणजे शक्ती कपूर ; चंद्रकांत खैरेंचा हल्लाबोल
Chandrakant Khaire : भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) म्हणजे शक्ती कपूर आहेत, अशी टीका शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी केली आहे.
Chandrakant Khaire On leader Kirit Somaiya : भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या गाडीवर काल रात्री शिवसैनिकांनी हल्ला केला आहे. या हल्ल्यात आपल्याला दुखापत झाल्याचे सोमय्या यांनी म्हटले होते. त्यानंतर शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी सोमय्या यांच्यावर टीका केली आहे. किरीट सोमय्या हे केवळ डायलॉगबाजी करत असून ते शक्ती कपूर आहेत अशी टीका खैरे यांनी केली आहे.
खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांना अटक केल्यानंतर त्यांना भेटण्यासाठी जात असताना शिवसैनिकांनी किरीट सोमय्या यांच्या गाडीवर काल रात्री हल्ला केला. शिवसैनिकांनी किरीट सोमय्या यांच्या गाडीवर बाटल्या आणि चपला फेकल्या होत्या. या हल्ल्यानंतर सोमय्या यांच्यासह भाजपमधील अनेक नेत्यांनी शिवसेना आणि महाविकास आघाडी सरकारवर कडाडून टीका केली आहे. भाजप नेत्यांच्या या टीकेनंतर आता चंद्रकांत खैरे यांनी सोमय्या यांच्यावर चांगलाच निशाणा साधला आहे.
"किरीट सोमय्या यांच्यावर हल्ला झाला तर त्यांना दहा ठिकाणी फिरायची गरज काय? असा सवाल उपस्थित करत सोमय्या यांना स्टंटबाजी करायची सवय असल्याची टीका खैरे यांनी केली.
दरम्यान, चंद्रकांत खैरे यांनी यावेळी विकास कामांच्या श्रेयावरून अर्थराज्यमंत्री भागवत कराड यांच्यावरही टीका केली आहे. भागवत कराड हे अजून नवीन आहेत, त्यांना काय कळतं? अशी टीका खैरे यांनी केलीय.
राणा दाम्पत्याला भेटायला किरीट सोमय्या आल्याचं समजल्यानंतर शिवसैनिकांनी घोषणाबाजी सुरू केली. त्यावेळी पोलीस स्टेशनमधून परत जात असताना किरीट सोमय्या यांना शिवसैनिकांच्या रोषाला सामोरं जावं लागलं. शिवसैनिकांनी किरीट सोमय्यांच्या गाडीवर बाटल्या आणि चपला फेकल्या. यामध्ये किरीट सोमय्यांच्या गाडीची काच फुटल्याचं सांगितलं जातंय.
महत्वाच्या बातम्या
Kirit Somaiya PC : माझ्यावर झालेला हल्ला ठाकरे सरकारकडून स्पॉन्सर्ड : किरीट सोमय्या
Kirit Somaiya : मुंबईत राडा सुरूच, शिवसैनिकांच्या हल्ल्यामध्ये किरीट सोमय्या जखमी