Solapur Lok Sabha: सोलापूरमध्ये मोठा ट्विस्ट, लोकसभेसाठी तयार आहात का?, देवेंद्र फडणवीसांचा जुन्या खासदाराला फोन
Solapur Lok Sabha: लोकसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर सर्वपक्षीयांकडून उमेदवारी चाचपणी सुरु आहे. सोलापूर लोकसभा मतदारसंघात भाजपकडून उमेदवार बदलण्याच्या हालचाली सुरु आहेत.
Solapur Lok Sabha Election 2024 : सोलापूर : सोलापूर (Solapur) लोकसभेसाठी (Solapur Lok Sabha Election 2024) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा (Devendra Fadnavis) शरद बनसोडे (Sharad Bansode) यांना फोन गेल्याचा दावा खुद्द शरद बनसोडे यांनी केला आहे. सोलापूर लोकसभेसाठी तयार आहात का? देवेंद्र फडणवीसांकडून फोनवर शरद बनसोडे यांना विचारणा करण्यात आली आहे. भाजप आमदारांच्या बैठकीनंतर फडणवीसांनी फोन केल्याचा दावा शरद बनसोडे यांनी केला आहे.
लोकसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर सर्वपक्षीयांकडून उमेदवारी चाचपणी सुरु आहे. सोलापूर लोकसभा मतदारसंघात भाजपकडून उमेदवार बदलण्याच्या हालचाली सुरु आहेत. माजी खासदार शरद बनसोडे यांनी पुन्हा एकदा आपला पत्ता टाकून, उमेदवारीसाठी इच्छा व्यक्त केली. महत्त्वाचं म्हणजे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्याला फोन करुन माहिती घेतल्याचा दावा, शरद बनसोडे यांनी एबीपी माझाशी बोलताना केला.
शरद बनसोडे हे 2014 मध्ये भाजपच्या तिकीटावर निवडून खासदार झाले होते. त्यांनी त्यावेळी तत्कालिन केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे (Union Home Minister Sushil Kumar Shinde) यांचा पराभव केला होता. यानंतर 2019 च्या निवडणुकीत भाजपने (BJP) शरद बनसोडे यांचं तिकीट कापून जयसिद्धेश्वर स्वामी (Jaisidhesvar Swami) यांना तिकीट दिलं होतं. एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला राहिलेल्या सोलापूर लोकसभा मतदारसंघांमध्ये भाजपनं मागील दोन निवडणुकांमध्ये बाजी मारली आहे.
देवेंद्र फडणवीसांचा शरद बनसोडेंना उमेदवारीसाठी फोन?
सोलापूर लोकसभा उमेदवारीसाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा माजी खासदार शरद बनसोडे यांना फोन गेल्याचा दावा खुद्द बनसोडेंनीच केल्यामुळे सोलापुरच्या राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. सोलापूर लोकसभेसाठी आपण तयार आहात का? अशी विचारणा केल्याचा दावा बनसोडे यांनी केला आहे. शरद बनसोडे 2014 साली सुशिलकुमार शिंदे यांचा पराभव करत निवडून आले होते.
दरम्यान, 2019 ला त्यांची उमेदवारी कापण्यानं ते नाराज होते. स्वातंत्र्यवीर सावरकर विचार मंचच्या माध्यमातून शरद बनसोडे यांनी जिल्हाभरात मोठं संघटन बांधलं आहे. रविवारी सागर बंगल्यावर सोलापूर जिल्ह्यातील भाजप आमदारांच्या बैठकीनंतर फडणवीसांनी त्यांना फोन केल्याचा दावा शरद बनसोडे यांनी केला आहे. त्यामुळे सोलापुरातून उमेदवारी नक्की कोणाला मिळणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
माढामध्ये कोणाच्या नावाची चर्चा?
सोलापूर लोकसभेसाठी राम सातपुते आणि अमर साबळेंच्या नावाची चर्चा आहे.. याच जागेवर देवेंद्र फडणवीस हे साबळे यांच्यासोबत चर्चा करत आहेत. आज दिल्लीत होणाऱ्या महाराष्ट्र कोअर कमिटीच्या बैठकीत राज्यातील काही जागांवर चर्चा होणार आहे. त्या आधी देवेंद्र फडणवीस हे भाजपच्या इच्छुक उमेदवारांशी सागरवर बोलत आहेत.
आगामी लोकसभेसाठी माढाची जागा इंडिया आघाडीतून आम्हांला द्या, शेकापचे आमदार जयंत पाटील यांची मागणी केली आहे. गणपतराव देशमुख यांचे नातू डाॅ. अनिकेत देशमुख यांना उमेदवारी द्यावी. शरद पवार यांची भेट घेत केली मागणी, शेकापचे नेते जयंत पाटील यांनी केली मागणी. डॉ. अनिकेत देशमुख यांनी 2019 ला विधानसभा निवडणूक लढवली होती. माढा लोकसभेसाठी रासपचे महादेव जानकर आग्रही असताना शेकापकडून मागणी करण्यात आली आहे. महादेव जानकर हे गणपत राव गायकवाड यांच्या नातवाला विरोध करणार नाहीत, असं वक्तव्य जयंत पाटील यांनी केलं आहे. मात्र, मविआ जे ठरवेल त्याला आमचा पाठिंबा असेल शेकापचे आमदार जयंत पाटील यांची भुमिका