Shrinivas Pawar : अरोरांच्या एजन्सीने अजितदादांना सावध केलं? श्रीनिवास पवारांनी सांगितलं सांभाळून बोलण्यामागचं राज'कारण'
Shrinivas Pawar on Ajit Pawar : अजित पवारांना एजन्सीने सावध केले आहे. अजित पवार फार जपून बोलत आहेत. हा दादा माझ्यासाठी नवीन असल्याचे श्रीनिवास पाटील यांनी म्हटले आहे.
बारामती : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटीनंतर अजित पवार (Ajit Pawar) आणि त्यांचे कुटुंब एकीकडे झाले, तर बाकी पवारांनी शरद पवारांना (Sharad Pawar) समर्थन दिले. संपूर्ण पवार कुंटूब लोकसभा निवडणुकीत शरद पवारांच्या सोबत उभे राहिले होते. त्यानंतर आता आगामी विधानसभा निवडणुकीत देखील अजित पवारांचे भाऊ आणि इतर कुटुंब शरद पवारांच्या बाजून असल्याचे चित्र दिसून येते. आता युगेंद्र पवार (Yugendra Pawar) यांचे वडील आणि अजित पवारांचे सख्खे भाऊ श्रीनिवास पवार (Shrinivas Pawar) यांनी याबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
एकदा एक बाजू घेतली होती तीच माझी भूमिका आहे. लोकसभा निवडणुकीवेळी शाब्दिक देवाणघेवाण झाली त्यामुळे मी साहेबांसोबत आहे. शरद पवारांवर बोललेलं मला मनाला लागलं. साहेबांमुळे आमचे आयुष्य घडत गेले. साहेबांवर बोलले गेलं. त्यामुळे आता पुलाखालून वाहून गेले आहे. त्यामुळे आम्ही साहेबांच्या बाजूने आहोत. युगेंद्र पवार देखील साहेबांच्या बाजूने आहेत. उद्या तिकीट मिळेल की नाही ते साहेब ठरवतील. तिकडे भाऊ आणि इकडे मुलगा आहे. मला साहेबांचे विचार आवडतात, कुणीही उमेदवार असेल तरी मी साहेबांच्या उमेदवाराचा प्रचार करणार, असं यावेळी श्रीनिवास पवार यांनी म्हटलं आहे.
अजितदादा एजन्सी सांगते तसे बोलतात
ते पुढे म्हणाले की, माझं आणि अजित पवारांचं अधूनमधून बोलणं होतं. आमच्यात वितुष्ट आलं असं म्हणता येणार नाही. तो माझा भाऊ आहे नात्यात अंतर नाही. पण बोलणं कमी झालं आहे. दादाचे भाषण मी ऐकतो. दादा आता विचार करून बोलत नाहीत हे आजपर्यंत बघितले, आता ती एजन्सी सांगते तसे बोलतात. दादा उभा राहणार का? हे आपल्याला फॉर्म भरताना कळेल. मी पण त्याच विचाराची वाट बघतोय, असंही ते यावेळी म्हणालेत.
बारामतीकर साहेबांना कधीही सोडणार नाहीत
दादा एकदा नाहीतर दोन वेळा बोलला आहे की, मी वेगळा विचार करू शकतो. बारामती वेगळा मतदार संघ आहे. तो शरद पवारांना कळतो. तो दुसऱ्या कुणाला कळणार नाही. दिवाळीत आम्ही सगळे एकत्र असू. विधानसभेत काय होईल ते बघू. दादा विधानसभेबाबत बोलले, सगळे पवार माझ्या प्रचारात असतील हे फार गमतीशीर बोलले आहेत. त्याच्यामुळे मला देखील बघायचं आहे की, नेमके कुठले पवार त्यांच्या प्रचारात आहेत आणि नक्की उमेदवार कोण आहे? बारामती विधानसभा मतदारसंघात दादा उभे राहतील असे मला वाटते. बारामतीकर साहेबांना कधी विसरणार नाही. बारामतीकर साहेबांना कधीही सोडणार नाहीत. हे तुम्हाला या निवडणुकीत दिसेल, असा विश्वास देखील त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे.
...तर प्रत्येक पक्ष वेगवेगळे रंग घेईन
लोकसभेत लोकांमध्ये भीती होती. लोक बाहेर पडत नव्हती. बारामती विधानसभेत मतांमध्ये वाढ होईल हे निश्चित आहे. अजित पवारांना एजन्सीने सावध केले आहे. अजित पवार फार जपून बोलत आहेत. हा दादा माझ्यासाठी नवीन आहे. रंगसंगती बदलून जर फायदा होत असता तर प्रत्येक पक्ष वेगवेगळे रंग घेईन, असं मला वाटतं असंही त्यांनी यावेळी म्हटलं आहे.
आणखी वाचा