एक्स्प्लोर

Ajit Pawar: 'चार दिवस सासूचे, तसे चार दिवस...', अजितदादांनी वयावरून पुन्हा शरद पवारांवर डागली तोफ, निवडणुकीबाबतही मोठं वक्तव्य

Ajit Pawar: उपमुख्यमंत्री अजित पवारांनी काल पुण्यातील एका कार्यक्रमात शरद पवार यांच्या वयावर आणि निवृत्तीवरून पुन्हा एकदा हल्लाबोल केला आहे. सुनेने म्हातारी होईपर्यंत फक्त बघतच बसायचं का?, असा सवाल यावेळी अजित पवारांनी केला आहे.

पुणे: निवडणुकीच्या अनुषंगाने  राजकीय पक्षांनी मोठी तयारी सुरू केली आहे, दौरे, सभा, भेटीगाठी यांना वेग आला अआहे, अशातच काल पुणे जिल्ह्याच्या दौऱ्यावर असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष अजित पवारांनी पुन्हा एकदा शरद पवारांना वयावरून टोला लगावत डिवचलं आहे. चार दिवस सासूचे तसे चार दिवस सुनेचेही असतात की नाही? का त्या सुनेने म्हातारी होईपर्यंत फक्त बघतचं राहायचं. असा प्रश्न उपस्थित करत, अजित पवारांनी पुन्हा एकदा शरद पवारांवर निशाणा साधला. पुण्याच्या मावळ विधानसभेत विविध विकास कामांच्या लोकार्पण सोहळ्यात अजित पवारांनी शरद पवारांपासून दूर होण्याचं कारण सांगितलं. काळानुरूप बदल स्वीकारले जातात. वडील सत्तरी पार केल्यावर आपल्या डोळ्यांदेखत मुलावर जबाबदारी सोपवतो. मात्र, काहीजण ऐकतच नाहीत. एवढा हट्टीपणा कशाला, असं म्हणत अजित पवारांनी शरद पवारांना उद्देशून वक्तव्य केलं आहे.

अजित पवारांकडून निवडणुकीचे संकेत

यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवारांनी येत्या आठ ते दहा दिवसांत आचारसंहिता लागू होईल आणि पस्तीस दिवसांनी मतदान होईल, असं म्हणत विधानसभा निवडणुकीचे संकेत दिले आहेत. आता समज-गैरसमज दूर करा, उमेदवारी मागण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. मात्र ज्यावेळी उमेदवार जाहीर होईल तेव्हा हेवेदावे बाजूला ठेवून महायुतीचा धर्म पाळा, असं आवाहन ही अजित पवारांनी यावेळी नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना केलं आहे

अजित पवारांनी शेळकेंचे कान टोचले

प्रत्येक जण मरायलाचं आलेला आहे. मावळचे आमदार सुनील शेळकेंनी इतर इच्छुक उमेदवारांना असा इशारा थेट अजित पवारांदेखत दिला. मग अजित दादांनी सर्वांदेखत त्यांच्या शैलीतचं शेळकेंचे कान टोचले. विधानसभा निवडणुक लढण्यास इच्छुक असणाऱ्या उमेदवारांनी मावळवासीयांवर दहशत निर्माण केली तर लक्षात ठेवावं. असं म्हणत शेळकेंनी प्रत्येक जण मरायलाचं आलेला आहे, असा इशारा दिला. आज सुनीलची गाडी जरा जास्तचं गरम होती. पण जरा सबुरीने घ्यायचं असतं, आपल्याला सर्वांची गरज असते. उगीचं काहीही बोलून साध्य होत नसतं, असं म्हणत अजित दादांनी शेळकेंचे कान टोचले.

काय म्हणाले होते सुनील शेळके?

मावळचे आमदार सुनील शेळके (Sunil Shelke) यांनी शुक्रवारी एका कार्यक्रमात बोलताना व्यासपीठावरुन आपल्या संभाव्य स्पर्धकांना धमकीवजा इशारा दिला. 'प्रत्येकजण मरायला आलाय' हे त्यांचे वाक्य सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे. सुनील शेळकेंच्या या वक्तव्यानंतर अजित पवार (Ajita Pawar) यांनी त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला. मात्र, सुनील शेळके यांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

मावळमध्ये महायुतीचा उमेदवार अद्याप जाहीर झालेला नाही. तिन्ही पक्षांमध्ये मावळच्या मतदारसंघासाठी (Maval Vidhan Sabha) रस्सीखेच सुरु आहे. याच मु्द्द्यावरुन सुनील शेळके यांनी भाष्य करताना म्हटले की, मला माहिती आहे की, येत्या काही दिवसांमध्ये विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होईल. अनेकजण मावळमधून लढण्यास इच्छूक आहेत. पण महायुतीचा उमेदवार कोण, हे मलादेखील माहिती नाही. पण अनेकजण तयारी करत आहेत. प्रत्येकाला संविधानाने निवडणूक लढवण्याचा अधिकार दिला आहे. जनतेला पटलं तर तुम्हालाही आमदार, खासदार करतील. पण तुम्ही तुमची इच्छा व्यक्त करताना मावळच्या जनतेला दहशतीखाली, दडपणाखाली आणू नका. मावळच्या जनतेला दहशतीखाली आणण्याचा प्रयत्न कराल तर दादा तुमच्यासमोर सांगतो की, सुनील शेळके हा अन्याय सहन करणार नाही. प्रत्येकजण मरायला आला आहे. जर तुम्हाला दादागिरी आणि दहशत करायची असेल तर सुनील शेळकेवर करा. माझ्या जनतेवर आणि सहकाऱ्यांवर दादागिरी करायची नाही, असे सुनील शेळके यांनी म्हटले.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur Uttar Vidhan Sabha : 'यांना' तुडवल्याशिवाय राहणार नाही! कोल्हापूर दक्षिण उत्तरच्या वादात राजेश क्षीरसागरांनी कोणाला इशारा दिला?
'यांना' तुडवल्याशिवाय राहणार नाही! कोल्हापूर दक्षिण उत्तरच्या वादात राजेश क्षीरसागरांनी कोणाला इशारा दिला?
Vastu Tips : रोजच्या जीवनातील 'या' 10 चुका आताच टाळा; गरिबीला मिळेल आमंत्रण, घरात टिकणार नाही पैसा
रोजच्या जीवनातील 'या' 10 चुका आताच टाळा; गरिबीला मिळेल आमंत्रण, घरात टिकणार नाही पैसा
नाशिकच्या ब्रह्मगिरी पर्वत परिसरातून 10 मुस्लीम तरुण पोलिसांच्या ताब्यात, त्र्यंबकेश्वरमध्ये एकच खळबळ, नेमकं प्रकार काय?
नाशिकच्या ब्रह्मगिरी पर्वत परिसरातून 10 मुस्लीम तरुण पोलिसांच्या ताब्यात, त्र्यंबकेश्वरमध्ये एकच खळबळ, नेमकं प्रकार काय?
Weekly Lucky Zodiacs : पुढचे 7 दिवस 5 राशींसाठी ठरणार चमत्कारी; नशीब सोन्यासारखं उजळणार, होणार अपार धनलाभ
पुढचे 7 दिवस 5 राशींसाठी ठरणार चमत्कारी; नशीब सोन्यासारखं उजळणार, होणार अपार धनलाभ
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

9 Second News : 9 AM : नऊ सेकंदात बातम्यांचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर : 07 Oct 2024 : ABP MajhaUnderground Mumbai Metro Line 3:मोदींच्या हस्ते भुयारी मेट्रोचं उद्घाटन,मेट्रो 3 मुंबईकरांच्या सेवेतHarshvardhan Patil : हर्षवर्धन पाटलांच्या हाती तुतारी; पवार, सुप्रिया सुळेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेशRamraje Nimbalkar : येत्या दोन ते तीन दिवसांत रामराजे निंबाळकर Ajit Pawar यांना भेटणार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur Uttar Vidhan Sabha : 'यांना' तुडवल्याशिवाय राहणार नाही! कोल्हापूर दक्षिण उत्तरच्या वादात राजेश क्षीरसागरांनी कोणाला इशारा दिला?
'यांना' तुडवल्याशिवाय राहणार नाही! कोल्हापूर दक्षिण उत्तरच्या वादात राजेश क्षीरसागरांनी कोणाला इशारा दिला?
Vastu Tips : रोजच्या जीवनातील 'या' 10 चुका आताच टाळा; गरिबीला मिळेल आमंत्रण, घरात टिकणार नाही पैसा
रोजच्या जीवनातील 'या' 10 चुका आताच टाळा; गरिबीला मिळेल आमंत्रण, घरात टिकणार नाही पैसा
नाशिकच्या ब्रह्मगिरी पर्वत परिसरातून 10 मुस्लीम तरुण पोलिसांच्या ताब्यात, त्र्यंबकेश्वरमध्ये एकच खळबळ, नेमकं प्रकार काय?
नाशिकच्या ब्रह्मगिरी पर्वत परिसरातून 10 मुस्लीम तरुण पोलिसांच्या ताब्यात, त्र्यंबकेश्वरमध्ये एकच खळबळ, नेमकं प्रकार काय?
Weekly Lucky Zodiacs : पुढचे 7 दिवस 5 राशींसाठी ठरणार चमत्कारी; नशीब सोन्यासारखं उजळणार, होणार अपार धनलाभ
पुढचे 7 दिवस 5 राशींसाठी ठरणार चमत्कारी; नशीब सोन्यासारखं उजळणार, होणार अपार धनलाभ
Uttamrao Jankar: हर्षवर्धन पाटलांच्या प्रवेशावेळीही झापूक झुपूकचा गजर, शरद पवारांसमोर जानकरांची फटकेबाजी, भरणेंना म्हणाले, हा तर उंदीरमामा
हर्षवर्धन पाटलांच्या प्रवेशावेळीही झापूक झुपूकचा गजर, शरद पवारांसमोर जानकरांची फटकेबाजी, भरणेंना म्हणाले, हा तर उंदीरमामा
Satara News : साताऱ्यात पहिल्यांदा शरद पवार गटाचा बॅनर काढण्याचा प्रयत्न, नंतर अजित पवार गटाने जेसीबी समोर आणून लावला!
साताऱ्यात पहिल्यांदा शरद पवार गटाचा बॅनर काढण्याचा प्रयत्न, नंतर अजित पवार गटाने जेसीबी समोर आणून लावला!
Kolhapur Uttar Vidhan Sabha : उत्तर तर आम्ही जिंकणारच आहोत, मात्र दक्षिणचा आमदार आम्हीच ठरवणार; क्षीरसागर, महाडिक आमनेसामने
उत्तर तर आम्ही जिंकणारच आहोत, मात्र दक्षिणचा आमदार आम्हीच ठरवणार; क्षीरसागर, महाडिक आमनेसामने
Ajit Pawar: अजित पवारांची शक्कल यशस्वी ठरली, लाडक्या बहि‍णींशी थेट कनेक्ट, 15 लाख महिलांचे फोन
अजित पवारांची शक्कल यशस्वी ठरली, लाडक्या बहि‍णींशी थेट कनेक्ट, 15 लाख महिलांचे फोन
Embed widget