एक्स्प्लोर

Sanjay Gaikwad and Eknath Shinde: शिवसेनेच्या बॅनरवरुन एकनाथ शिंदेच गायब, संजय गायकवाडांचा भगव्या शालीतला एकच मोठा फोटो, नाराजीच्या चर्चांना उधाण

Sanjay Gaikwad and Eknath Shinde: शिंदे गटात सध्या नाराजीची मोठी लाट असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. आमदार निवासात कर्मचाऱ्याला मारहाण करणारे संजय गायकवाड एकनाथ शिंदेंवर नाराज

Sanjay Gaikwad and Eknath Shinde: काही दिवसांपूर्वी मुंबईच्या आमदार निवासातील कँटिनच्या कर्मचाऱ्याला मारहाण केल्यामुळे प्रसिद्धीच्या झोतात आलेले शिंदे गटाचे बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) हे सध्या पक्षात नाराज असल्याची चर्चा रंगली आहे. यासाठी बुलढाण्यातील चिखली येथे होत असलेल्या शिंदे गटाचा (Shinde Camp) संवाद मेळाव्यातील एक बॅनर कारणीभूत ठरला आहे. या बॅनरवर संजय गायकवाड यांचा स्वत:चा भगवी शाल परिधान केलेला आणि त्यांच्या मुलाचा फोटो आहे. या दोघांशिवाय बॅनरवर कोणालाही स्थान देण्यात आलेले नाही. शिवसेनेचे प्रेरणास्थान असलेले बाळासाहेब ठाकरे आणि पक्षप्रमुख एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनाही या बॅनरवर स्थान मिळालेले नाही. त्यामुळे आता राजकीय वर्तुळात संजय गायकवाड यांच्या नाराजीची जोरदार चर्चा रंगली आहे. 

संजय गायकवाड यांची एकनाथ शिंदे यांनी नुकतीच जिल्हा संघटकपदी पक्षाने नियुक्ती केली. त्यानंतर त्यांनी रविवारी चिखली शहरात पहिल्यांदाच शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा संवाद मेळावा घेतला होता. या संवाद मेळाव्यात स्टेजवरील बॅनरवर फक्त संजय गायकवाड आणि त्यांचा मुलगा मृत्युंजय गायकवाड यांचाच फोटो लावण्यात आला होता. बॅनरवर ना पक्षाचे नाव, ना पक्षाच चिन्ह.... इतकंच काय तर बाळासाहेबांचा किंवा एकनाथ शिंदे यांचाही फोटो नव्हता तर शिवसेना हे नाव सुद्धा बॅनरवर नसल्याने संजय गायकवाड हे नाराज तर नाहीत ना...?  कारण पक्षाच्या मेळाव्यात वरिष्ठ नेत्यांचे फोटो, पक्षाचे नाव व चिन्ह हे बॅनरवर असावं असा नियमच आहे. मात्र, कालच्या या मेळाव्यातील बॅनर मुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या असून संजय गायकवाड हे नाराज तर नाहीत ना, याबाबत आम्ही त्यांना विचारलं असता त्यांनी सरळ उत्तर देण्याचे टाळले. एकनाथ शिंदे आणि बाळासाहेब ठाकरे हे आमच्या काळजातच आहेत, असे उत्तर देत गायकवाड यांनी वेळ मारुन नेली. 

Shivsena Mumbai News: मुंबईत कार्यकारिणीची घोषणा न झाल्याने शिंदे गटाचे पदाधिकारी संभ्रमात 

महापालिका निवडणूक तोंडावर असताना वर्ष झालं तरीही शिंदे गटाकडून मुंबईच्या कार्यकारणीची घोषणा झालेली नाही. त्यामुळे सध्या मुंबईतील शिंदे गटाचे पदाधिकारी संभ्रमात पडले आहेत. गेल्या वर्षभरात मुंबईत पदाधिकाऱ्यांची कुठलीही बैठक पार पडलेली नाही. जुनी कार्यकरणी रद्द करून नवीन कार्यकरणीसाठी मुलाखती होऊन आणि अहवाल देऊन आठ महिने उलटले आहेत. मात्र, तरीही नवीन कार्यकारिणीची अद्याप घोषणाच झाली नसून पक्षातील एकूणच कार्यपद्धतीवर पदाधिकाऱ्यांमध्ये संभ्रम पसरला आहे. 

माजी नगरसेवकांच्या बैठकीत कामाला लागण्याच्या सूचना देण्यात आल्या असल्या, तरी पदाधिकारी पक्षाकडून मिळणाऱ्या पदाकडे लक्ष ठेवून आहेत. मुंबईतील नेत्यांवरही अद्याप कोणतीही जबाबदारी देण्यात आलेली नाही. कुठल्याही उत्सवाच्या बॅनरवर बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे, एकनाथ शिंदे यांच्यानंतर कुटुंबियांचेच फोटो प्रामुख्याने दिसतात, अशी खंत पदाधिकाऱ्यांमध्ये आहे. एकीकडे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येत असताना, शिंदेंच्या शिवसेनेकडून मात्र पालिका निवडणुकीचा संथ कारभार सुरू असल्याची कुजबुज पक्षाच्या अंतर्गत वर्तुळात रंगली आहे.

आणखी वाचा

रायगडचं पालकमंत्रिपद कोणाला?; एकनाथ शिंदेंनी दिल्लीत मुद्दा मांडताच अमित शाहांनी स्पष्ट सांगितले, म्हणाले...

 बालरोग तज्ञ म्हणून कार्यरत , M.J. ( mass com ) नंतर गेल्या तीन वर्षापासून एबीपी माझा साठी कार्यरत.
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Vidhan Parishad Election: पुणे पदवीधरची जागा भाजपला सोडावी लागल्याने शिवसेनेत नाराजी; पदाधिकाऱ्यांनी घेतली एकनाथ शिंदेंनी भेट, बैठकीत नेमकं काय घडलं?
पुणे पदवीधरची जागा भाजपला सोडावी लागल्याने शिवसेनेत नाराजी; पदाधिकाऱ्यांनी घेतली एकनाथ शिंदेंनी भेट, बैठकीत नेमकं काय घडलं?
Maharashtra Live News Updates: महाराष्ट्रात दुष्काळाच्या झळा; राज्य सरकार घेणार मोठा निर्णय
Maharashtra Live News Updates: महाराष्ट्रात दुष्काळाच्या झळा; राज्य सरकार घेणार मोठा निर्णय
मंदिर सोडून देवच दर्शन देण्यासाठी आले, असा मुख्यमंत्री पुन्हा कधी भेटणे नाही, भाजप आमदाराचं जोरदार भाषण
मंदिर सोडून देवच दर्शन देण्यासाठी आले, असा मुख्यमंत्री पुन्हा कधी भेटणे नाही, भाजप आमदाराचं जोरदार भाषण
राज्यात दुष्काळी परिस्थिती, आंदोलनाची दखल घेण्याची गरज नाही, विरोधक वैफल्यग्रस्त झालेत, निलम गोऱ्हेंचा हल्लाबोल, उद्धव ठाकरेंवरही टीका 
राज्यात दुष्काळी परिस्थिती, आंदोलनाची दखल घेण्याची गरज नाही, विरोधक वैफल्यग्रस्त झालेत, निलम गोऱ्हेंचा हल्लाबोल, उद्धव ठाकरेंवरही टीका 

व्हिडीओ

Shivsena Pune Election : पुणे पदवीधरची जागा भाजपला सोडल्यानं शिवसेनेत नाराजी
CJP Delhi : सीजेपीच्या दोन नेत्यांना न्यायालयीन कोठडी | Saurabh Das Ashutosh Ranka Judicial Custody
Rahul Gandhi Special Report : राहुल गांधींनी धक्का दिल्याचा महिला पत्रकाराचा आरोप; भाजपाचा हल्लाबोल
BJP Vs India Aghadi Special Report : इंडिया आघाडीच्या मोर्चावरून राजकीय वाद, दोन गुन्हे दाखल
Shetitil Navdurga | Bharti Nirgude | घरात संकट होतं, पण शेतात तिची हिंमत पिकत होती!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Imperial Heritage Nalasopara Fire: घरात आग लागली, चारजण इमारतीच्या 14 मजल्यावर 45 मिनिटं लटकले, नालासोपाऱ्यातील थरकाप उडवणारा VIDEO
घरात आग लागली, चारजण इमारतीच्या 14 मजल्यावर 45 मिनिटं लटकले, नालासोपाऱ्यातील थरकाप उडवणारा VIDEO
Maharashtra Vidhan Parishad Election: पुणे पदवीधरची जागा भाजपला सोडावी लागल्याने शिवसेनेत नाराजी; पदाधिकाऱ्यांनी घेतली एकनाथ शिंदेंनी भेट, बैठकीत नेमकं काय घडलं?
पुणे पदवीधरची जागा भाजपला सोडावी लागल्याने शिवसेनेत नाराजी; पदाधिकाऱ्यांनी घेतली एकनाथ शिंदेंनी भेट, बैठकीत नेमकं काय घडलं?
Emraan Hashmi Gunmaaster G9 Stunt SUV Flips Viral Video: इमरान हाश्मीची SUV हवेतच पलटली, गरगर गिरक्या घेऊन व्हॅनवर आदळली; VIRAL VIDEO नं काळजाचा ठोका चुकला, लाडका अभिनेता सुखरुप तर आहे ना? चाहत्यांना चिंता
इमरान हाश्मीची SUV हवेतच पलटली, गरगर गिरक्या घेऊन व्हॅनवर आदळली; VIRAL VIDEO नं काळजाचा ठोका चुकला, लाडका अभिनेता सुखरुप तर आहे ना? चाहत्यांना चिंता
PHOTO : MPSC आंदोलन गाजवणारा विवेकानंद पाटील कोल्हापुरात, मूळ गावी जंगी स्वागत
MPSC आंदोलन गाजवणारा विवेकानंद पाटील कोल्हापुरात, मूळ गावी जंगी स्वागत
सोशल मीडियावर बेडशीटची विक्री, सायबर फसवणुकीचा नवा फंडा; 1 कोटीची फसवणूक, दोन घटनांत तिघांना अटक
सोशल मीडियावर बेडशीटची विक्री, सायबर फसवणुकीचा नवा फंडा; 1 कोटीची फसवणूक, दोन घटनांत तिघांना अटक
काम आपण करतो, पण ज्ञानेश कुमारांच्या कृपेने दुसरेच निवडून येतात; शर्मिला ठाकरेंचा निवडणूक आयुक्तांवर हल्लाबोल
काम आपण करतो, पण ज्ञानेश कुमारांच्या कृपेने दुसरेच निवडून येतात; शर्मिला ठाकरेंचा निवडणूक आयुक्तांवर हल्लाबोल
'चीन लडाखला केंद्रशासित प्रदेश म्हणून मान्यता देत नाही..' लडाखमधील 28 ठिकाणांवर दावा; गोगरा-हॉट स्प्रिंगचाही समावेश, जिथं 2020 मध्ये दोन्ही देशांच्या सैन्यांमध्ये घनघोर संघर्ष
'चीन लडाखला केंद्रशासित प्रदेश म्हणून मान्यता देत नाही..' लडाखमधील 28 ठिकाणांवर दावा; गोगरा-हॉट स्प्रिंगचाही समावेश, जिथं 2020 मध्ये दोन्ही देशांच्या सैन्यांमध्ये घनघोर संघर्ष
L Murugan Resignation : मोठी बातमी! मोदींच्या कॅबिनेटमधील मंत्र्याचा राजीनामा, राज्यसभेचे खासदारपदही सोडलं, विरोधकांनी घेरलं असताना दिल्लीत मोठी घडामोड
मोठी बातमी! मोदींच्या कॅबिनेटमधील मंत्र्याचा राजीनामा, राज्यसभेचे खासदारपदही सोडलं, विरोधकांनी घेरलं असताना दिल्लीत मोठी घडामोड
Embed widget