काँग्रेस-राष्ट्रवादी संपुष्टात, शिवसेना ठाकरे गटही पुढच्या निवडणुकीपर्यंत राहणार नाही, भाजप नेते रावसाहेब दानवेंचं वक्तव्य
द्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेनाही (Shivsena) पुढच्या निवडणुकीपर्यंत राहत नाही असं वक्तव्य माजी केंद्रीय मंत्री आणि भाजपचे नेते रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी केलं आहे.
Raosaheb Danve : काँग्रेस (Congress ) संपुष्टात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट (NCP) संपलेला आहे. तसेच उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेनाही (Shivsena) पुढच्या निवडणुकीपर्यंत राहत नाही असं वक्तव्य माजी केंद्रीय मंत्री आणि भाजपचे नेते रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी केलं आहे. जालना येथील मजबूत संघटन ऑनलाईन कार्यकर्ता संमेलनात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना दानवे बोलत होते. काँग्रेस आणि राष्ट्रवादीची मोठी ताकद होती. परंतू, त्यांच्या वागण्यामुळं, व्यवहारामुळं त्यांच्या विचारापासून लोक दूर गेल्याचे दानवे म्हणाले.
दरम्यान एक काळ असा होता शिवसेनेचे 3 आमदार आणि भाजपचा मी एकटा आमदार होतो. मात्र, आज काळ असा आहे की भाजपचे 3 आमदार तर शिवसेनेचे 2 आमदार असं देखील रावसाहेब दानवे यांनी म्हटलं आहे. शिवाय राष्ट्रवादी शरद पवार गटाचे कोणी आहेत का आता?असा सवालही दानवे यांनी कार्यकर्त्यांना विचारला.
गेल्या काही दिवसापूर्वीच रावसाहेब दानवे यांनी शिवसेना आणि संजय राऊत यांच्यावर टीका केली होती. उद्धव ठाकरेंनी संजय राऊतांना सांभाळावं नाहीतर ते आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यात भांडण लावू शकतात, अशी टीका भाजपने नेते रावसाहेब दानवे यांनी केली. त्यांच्यामुळेच पक्षाची वाताहात झाली असून, त्यांच्यामुळेच युती तुटल्याचे दानवे म्हणाले. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये राज्य पातळीवरील सर्वच पक्षांनी कधी कधी स्थानिक पातळीवरती निर्णय घेण्याचे आदेश दिलेले आहेत. त्यामुळं वरच्या सूचना जशा येतील तशा सूचना पाळणाऱ्यांपैकी आम्ही असल्याचे दानवे म्हणाले.
महत्वाच्या बातम्या:
संजय राऊतांना सांभाळा, नाहीतर ते उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंमध्येच भांडण लावतील, रावसाहेब दानवेंचा हल्लाबोल























