शिवसेना ठाकरे गट भिवंडी पूर्व विधानसभा मतदारसंघासाठी आग्रही; पदाधिकाऱ्यांचा थेट राजीनामा देत बंड करण्याचा इशारा
Bhiwandi: विधानसभा निवडणुकांचे पडघम वाजत असताना शिवसेना उबाठा पक्ष भिवंडी पूर्व विधानसभा मतदार संघासाठी आग्रही असून माजी आमदार रुपेश म्हात्रे यांच्या साठी शिवसैनिक शिवसेना पदाधिकारी आक्रमक झाले आहेत.
Bhiwandi : विधानसभा निवडणुकांचे पडघम वाजत असताना शिवसेना उबाठा पक्ष (Shiv Sena Thackeray) भिवंडी पूर्व विधानसभा मतदार संघासाठी (Maharashtra Vidhan Sabha Election 2024) आग्रही असून माजी आमदार रुपेश म्हात्रे यांच्या साठी शिवसैनिक शिवसेना पदाधिकारी आक्रमक झाले आहेत. भिवंडी जिल्हा मध्यवर्ती शाखेत आयोजित बैठकीत जिल्हा प्रमुख शहर जिल्हाप्रमुख यांसह मोठ्या संख्येने महिला युवासेना पदाधिकारी शिवसैनिक उपस्थित होते. या बैठकीत भिवंडी पूर्व शिवाय संपूर्ण भिवंडी लोकसभा मतदारसंघातून आलेल्या पदाधिकाऱ्यांनी रुपेश म्हात्रे यांची उमेदवारी उध्दव ठाकरे यांनी जाहीर करावी, अशी एकमुखी मागणी करीत यासाठी मातोश्री वरील पक्ष प्रमुखांना एक संधी द्या, नाहीतर रुपेश म्हात्रे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करून त्यांना निवडून आणा. नुसती भाषण करून काही होत नाही तसे केले तर पक्ष संपेल, पक्ष नेतृत्वाने पक्ष कमकुवत करायला घेतला असा त्याचा अर्थ होईल. म्हणून सर्वांनी एकदा मातोश्रीवर जाऊन आपली भूमिका मांडून सामूहिक राजीनामे देऊ. तसेच रुपेश म्हात्रे यांनी अपक्ष म्हणून निवडणुकीत उतरावे अशी मागणी केली आहे.
पदाधिकाऱ्यांचा थेट राजीनामा देत बंड करण्याचा इशारा
पक्ष आमच्या मागणीकडे ठामपणे दुर्लक्ष करीत आहे. हा शब्दप्रयोग जरी बरोबर असला तरी आमच्या मागणीकडे पक्ष प्रमुख दुर्लक्ष करतात, असा त्याचा अर्थ होत नाही. भिवंडी पूर्व विधानसभा शिवसेना ठाकरे गटाकडे यावी यासाठी आमचे युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. रुपेश म्हात्रे दुर्दैवाने 2019 मध्ये काही मतांनी हरले. म्हणून ही जागा समाजवादी पक्षाच्या वाट्याला जात असेल तर ते चुकीचे आहे. समाजवादी पक्षाने परस्पर पाच उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे. त्यामुळे त्यांचा महाविकास आघाडी सोबत संबंध नाही. अशा परिस्थितीत रुपेश म्हात्रे यांची भिवंडी पूर्व विधानसभा मतदार संघातून उमेदवारी जाहीर होईल, असा विश्वास जिल्हाप्रमुख विश्वास थळे यांनी व्यक्त केला आहे.
श्रीकांत शिंदे यांनी घेतला भिवंडी ग्रामीण भिवंडी पूर्व विधानसभेचा आढावा
विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजायला सुरुवात झाली असून महायुती आणि महाविकास आघाडीतील जागा वाटपाचे निश्चित होत असतानाच शिवसेना शिंदे गटाकडून भिवंडी ग्रामीण व भिवंडी पूर्व या विधानसभा मतदारसंघातील तयारीचा आढावा घेण्यासाठी शिवसेना लोकसभेतील घटनेते खासदार श्रीकांत शिंदे यांच्या बैठकीचे आयोजन भिवंडीत करण्यात आले होते. यावेळी भिवंडी पूर्व,भिवंडी ग्रामीण या विधानसभा मतदार संघातील शेकडो पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या बैठकीत पक्षाच्या कामासोबतच महाराष्ट्र शासनाच्या लोक कल्याणकारी योजनांचा मतदारांपर्यंत कोणता प्रचार आणि प्रसार केला याची झाडाझडती सुद्धा खासदार श्रीकांत शिंदे यांनी या बैठकीत घेतली.
या जनसंवाद यात्रा बैठकीमध्ये भिवंडी पूर्व व भिवंडी ग्रामीण या विधानसभा मतदारसंघात कशा पद्धतीने निवडणूक पूर्व पदाधिकाऱ्यांची तयारी सुरू आहे याचा आढावा घेतला. पक्ष बांधणी कशा पद्धतीने केले आहे कशा पद्धतीने वार्डए रचना आहे त्यासोबतच सरकारच्या लोककल्याणकारी योजना कशा पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचलेला आहे त्याचा आढावा या बैठकीत घेत असताना कोणाला कोणती जबाबदारी द्यायची कशा पद्धतीने प्रचार यंत्रणा राबवायची या बाबत आढावा घेण्यात आला आहे.
हे ही वाचा