एक्स्प्लोर

Rais Shaikh: मुंबईतील पाच टोलनाक्यांप्रमाणे हलक्या वाहनांना पूर्ण राज्यात टोलमाफी द्या;आमदार रईस शेख यांची मागणी

मुंबई शहरात प्रवेश करणाऱ्या पाच टोल नाक्यांवर हलक्या वाहनांना आजपासून जशी पूर्ण टोलमाफी दिली, तशी टोलमाफी संपूर्ण राज्यात लागू करावी, अशी मागणी आमदार रईस शेख (Rais Shaikh) यांनी केली आहे.

Rais Shaikh on Toll Free For Light Vehicles: मुंबई शहरात प्रवेश करणाऱ्या पाच टोल नाक्यांवर हलक्या वाहनांना आजपासून जशी पूर्ण टोलमाफी दिली (Mumbai Toll Waiver), तशी टोलमाफी संपूर्ण राज्यात लागू करावी, अशी मागणी भिवंडी पूर्वचे समाजवादी पक्षाचे आमदार रईस शेख (Rais Shaikh) यांनी केली आहे. तसेच नाशिक महामार्गाची टोल कंपनी दुरुस्ती करत नसल्याने पडघा टोलनाका बंद करण्याची मागणीही रईस शेख यांनी केली आहे.

यासंदर्भात आमदार रईस शेख म्हणाले की, मुंबई एन्ट्री पाँइंटचे जे पाच मुख्य मार्ग आहेत, त्यांची दुरुस्ती टोल कंपन्यांकडून वेळेत कधीच होत नाही. तरीसुद्धा आजपर्यंत या पाचही मार्गावर वाहनांना टोल भरावा लागतो आहे. ही जनतेची लूट आहे. त्यासदंर्भात मी वेळोवेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांना पत्र पाठवून टोल रस्त्यांची दुरुस्ती होत नसल्याचे निदर्शनास आणून दिले होते. नियमबाह्य टोल वसुलीचा प्रकार राज्यात सर्वत्र आहे. उदाहरण नाशिक महामार्गाचे घ्या. या महामार्गावर टोल कंपनी रस्त्याची दुरुस्ती करत नाही. तरीसुद्धा पडघा येथे टोल वसूल केला जात आहे. राज्यात अनेक जिल्ह्यात टोल कंपन्यांची अशी लूट सुरु आहे. ही सामान्यांची वाटमारी आहे. ती शासन कधी थांबवणार आहे, असा सवाल आमदार रईस शेख यांनी महायुती सरकारला केला आहे.

कडक लक्ष ठेवल्यास राज्यातले 50 टक्के टोल बंद होतील- रईस शेख

टोलवसुलीची माहिती संकेतस्थळावरून दिली पाहिजे, असे परिपत्रक केंद्र सरकारने 2013 साली काढले आहे. मात्र, केंद्र सरकारच्या आदेशाला सर्व टोल कंपन्या आणि राज्यांनी केराची टोपली दाखवली आहे. रस्त्याचा खर्च निघूनही शेकडो टोल सुरु आहेत, असा आरोप आमदार रईस शेख यांनी केला. सरकारने टोल कंपन्यांवर कडक लक्ष ठेवल्यास राज्यातले 50 टक्के टोल बंद होतील, असे आमदार रईस शेख म्हणाले.

मुंबई टोलमुक्त करा - रईस शेख

मुंबईत येणारे 5 एन्ट्री पॉईंटचे रस्ते आणि शहरातील 27 फ्लायओवर्स यांची देखभाल आणि दुरुस्ती टोल कंपन्या यांच्याकडून होत नाही. त्यामुळे मुंबई पूर्णपणे टोलमुक्त करावी, अशी मागणी आमदार रईस शेख यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जानेवारी 2023 मध्ये पत्र लिहून केली होती.

हे ही वाचा 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Jalgaon : नऊ वर्षांची चिमुकली तीन दिवसांपासून रहस्यमयरित्या बेपत्ता, गावाबाहेर शाळेचे दप्तर आढळलं; चाळीसगावातील घटना
नऊ वर्षांची चिमुकली तीन दिवसांपासून रहस्यमयरित्या बेपत्ता, गावाबाहेर शाळेचे दप्तर आढळलं; चाळीसगावातील घटना
थेट मुंबई उच्च न्यायालयाच्या दारात एकानं स्वत:ला पेट्रोलनं पेटवून घेतलं, तब्बल 60 टक्के भाजल्याची भीती
थेट मुंबई उच्च न्यायालयाच्या दारात एकानं स्वत:ला पेट्रोलनं पेटवून घेतलं, तब्बल 60 टक्के भाजल्याची भीती
बिहारमध्ये दणकून आपटल्यानंतर प्रशांत किशोर पुन्हा चकवा देण्याच्या तयारीत? थेट दिल्ली गाठत कोणाशी केली 'मन की बात'??
बिहारमध्ये दणकून आपटल्यानंतर प्रशांत किशोर पुन्हा चकवा देण्याच्या तयारीत? थेट दिल्ली गाठत कोणाशी केली 'मन की बात'??
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, 19 तारखेला पंतप्रधान बदलणार; देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, विखे पाटलांचही सडकून टीका
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, 19 तारखेला पंतप्रधान बदलणार; देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, विखे पाटलांचही सडकून टीका

व्हिडीओ

Election Commission PC : राज्यात महानगर पालिका निवडणुका जाहीर, 15 जानेवारीला मतदान, 16 ला मतमोजणी
Muncipal Corporation Election : राज्याच्या मतदार यादीत कोणताही घोळ नाही, निवडणूक आयोगाची भूमिका
Municipal Corporation Election : आजपासून 29 महानगर पालिकांसाठी आचारसंहिता लागू- निवडणूक आयोग
Municipal Corporation Election : उमेदवारांना सहा महिन्यात जात वैधता प्रमाणपत्र सादर करावा लागणार
Municipal Corporation Election : मनपासाठी 15 जानेवारीला मतदार, तर 16 जानेवारीला मतमोजणी

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jalgaon : नऊ वर्षांची चिमुकली तीन दिवसांपासून रहस्यमयरित्या बेपत्ता, गावाबाहेर शाळेचे दप्तर आढळलं; चाळीसगावातील घटना
नऊ वर्षांची चिमुकली तीन दिवसांपासून रहस्यमयरित्या बेपत्ता, गावाबाहेर शाळेचे दप्तर आढळलं; चाळीसगावातील घटना
थेट मुंबई उच्च न्यायालयाच्या दारात एकानं स्वत:ला पेट्रोलनं पेटवून घेतलं, तब्बल 60 टक्के भाजल्याची भीती
थेट मुंबई उच्च न्यायालयाच्या दारात एकानं स्वत:ला पेट्रोलनं पेटवून घेतलं, तब्बल 60 टक्के भाजल्याची भीती
बिहारमध्ये दणकून आपटल्यानंतर प्रशांत किशोर पुन्हा चकवा देण्याच्या तयारीत? थेट दिल्ली गाठत कोणाशी केली 'मन की बात'??
बिहारमध्ये दणकून आपटल्यानंतर प्रशांत किशोर पुन्हा चकवा देण्याच्या तयारीत? थेट दिल्ली गाठत कोणाशी केली 'मन की बात'??
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, 19 तारखेला पंतप्रधान बदलणार; देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, विखे पाटलांचही सडकून टीका
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, 19 तारखेला पंतप्रधान बदलणार; देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, विखे पाटलांचही सडकून टीका
Who is Nitin Nabin: ज्यांचं कालपर्यंत नाव कोणाला माहीत नाही, ओळखही नाही तेच आता थेट भाजपचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष! नितिन नबीन नेमके आहेत तरी कोण?
ज्यांचं कालपर्यंत नाव कोणाला माहीत नाही, ओळखही नाही तेच आता थेट भाजपचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष! नितिन नबीन नेमके आहेत तरी कोण?
Kolhapur Municipal Corporation: आचारसंहिता लागण्यापूर्वीच कोल्हापूरच्या केएमटी कर्मचाऱ्यांना घेतलं कायम सेवेत; एकनाथ शिंदेंकडून प्रस्तावावर सही
कोल्हापूर : आचारसंहिता लागण्यापूर्वीच केएमटी कर्मचाऱ्यांना घेतलं कायम सेवेत; एकनाथ शिंदेंची प्रस्तावावर सही
Video: महिलेचा हिजाब काढला, नितीश कुमारांच्या व्हिडिओने नवा वाद; विरोधकांचा संताप, काँग्रेसने मागितला राजीनामा
Video: महिलेचा हिजाब काढला, नितीश कुमारांच्या व्हिडिओने नवा वाद; विरोधकांचा संताप, काँग्रेसने मागितला राजीनामा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 डिसेंबर 2025 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 डिसेंबर 2025 | सोमवार
Embed widget