एक्स्प्लोर

मोठी बातमी : ठाकरे गटाचे नेते निवडणुकीत आपल्याला मदत करतील, शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांचा दावा

Santosh Bangar Speech : ठाकरे गटाचे पदाधिकारी देखील आपल्याला मदत करतील, असा दावा शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांनी केला आहे. यावरून आता राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.

नांदेड : सध्या सर्वत्र लोकसभा निवडणुकीची (Lok Sabha Election 2024) धामधूम पाहायला मिळत आहे. सर्व पक्ष प्रचारामध्ये गुंतले आहेत. नेत्यांकडून आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरु आहेत. अशात शिवसेना (Shiv Sena) शिंदे गटाचे (Shinde Group) आमदार संतोष बांगर (Santosh Bangar) यांनी पंतप्रधानांच्या कामाचं कौतुक करत ठाकरे गटाचे पदाधिकारी देखील आपल्याला मदत करतील, असा दावा केला आहे. यावरून आता राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. संतोष बांगर यांनी यावेळी राहुल गांधींवर टीका केली आहे. 

संतोष बांगरांची राहुल गांधींवर टीका

हादगाव येथील संवाद मिळत बोलताना आमदार संतोष बांगर यांनी हातवारे करून राहुल गांधीवर अप्रत्यक्षरित्या टीका केली आहे. शिंदे गटाच्या वतीने आज संवाद मिळण्याचे आयोजन हादगाव येथे येथे करण्यात आले होते. यावेळी देशाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासारखे सक्षम नेतृत्व लाभला आहे त्यांचे विरोधात माणूस आहे का असं म्हणत बांगर यांनी शरीराचे हाताचे हावभाव करत अप्रत्यक्षरीत्या राहुल गांधी यांच्यावर टीका केली आहे.

'सुभाष वानखडे आपल्याला मदत करतील'

संतोष बांगर यांनी यावेळी अजब दावा केला आहे. शिवसेना ठाकरे गटाचे ठाकरे गट (Thackeray Group) माजी खासदार सुभाष वानखडे (Subhash Wankhede) आपल्याला मदत करतील, असा दावा बांगर यांनी केला आहे. माजी खासदार सुभाष वानखडे, माजी आमदार जयप्रकाश मुंदडा आपलंच काम करतील. ठाकरे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्याबद्दल आमदार बागर यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. हिंगोली, वसमत, कळमनुरी आणि हदगाव विधानसभेतून 50 -50 हजाराची लीड देणार असंही बांगर यांनी म्हटलं आहे. 

नागेश पाटील अष्टीकरांवर गंभीर आरोप

नोकरी लावतो म्हणून अनेक लोकांकडून पैसे घेतले, असं म्हणत नागेश पाटील अष्टीकरांवर नाव न घेता आमदार बांगर यांनी गंभीर आरोप केले आहेत. दोन तीनशे लोकांपासून पैसे घेतले. ग्रामसेवक करतो 5 लाख, आरोग्य सेवा करतो 10 लाख, तलाठी करतो 20 लाख, आता फक्त कलेक्टर करायचं बाकी आहे. दंडावर थाप देण्यासाठी मसल लागतात. नागेश पाटील आष्टीकर डोम्या नाग आहेत. नागोबाच्या नादी लागू नका, असं म्हणत बांगर यांनी नाव न घेता नागेश पाटलांवर टीका केली आहे. 

संतोष बांगरांच्या दाव्याने चर्चांना उधाण

हिंगोलीतून येऊन दंड थापटत होता, तुला दंड कसा थापटतात माहित आहे का, असा सवालही त्यांनी विचारला आहे. माजी खासदार सुभाष वानखडे यांच्या आशीर्वाद आपल्यासोबत आहेत. त्याचं डिपॉझिट जप्त झाल्याशिवाय राहणार नाही. महत्त्वाचं म्हणजे सुभाष वानखडे सध्या शिवसेान ठाकरे गटात आहेत. त्यामुळेच बांगर यांनी केलेल्या या दाव्यानंतर चर्चांना उधाण आलं आहे. 

कळमनुरी, वसमत, हिंगोली आणि  हादगाव या विधानसभेतून 50-50 हजाराच्या वर लीड देणार,  2024 च्या विधानसभेला आपल्याला बाबुराव कदम उमेदवार पाहिजे. तिकीट आपलाच आहे, उमेदवार आपलाच आहे. नरेंद्र मोदीचं काम पाहिलं की अंगावर शहारे उभे राहतात पण तिकडून माणूस नाही, असं म्हणत बांगरचे शरीर आणि हाताचे हातवारे करत राहुल गांधी यांच्या अप्रत्यक्षरित्या निशाणा साधला आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

स्मशानभूमीवर अनेकांनी संसार थाटले, अतिक्रमण त्वरित हटवा; DCDC बैठकीत भाजप खासदार आक्रमक
स्मशानभूमीवर अनेकांनी संसार थाटले, अतिक्रमण त्वरित हटवा; DCDC बैठकीत भाजप खासदार आक्रमक
कोथरुड परीसरात तिघांकडून तरुणावर हल्ला, प्रकृती चिंताजनक, हल्ल्याचं कारण अस्पष्ट 
कोथरुड परीसरात तिघांकडून तरुणावर हल्ला, प्रकृती चिंताजनक, हल्ल्याचं कारण अस्पष्ट 
भूमिका बदलाच्या टीकेवर भाजपकडून राज ठाकरेंवर पलटवार; आशिष शेलारांचा मैत्रीपूर्ण सल्ला
भूमिका बदलाच्या टीकेवर भाजपकडून राज ठाकरेंवर पलटवार; आशिष शेलारांचा मैत्रीपूर्ण सल्ला
40 लाख रुपयांत MPSC चा पेपर, परीक्षेच्या दोन दिवस आधी हाती; पुण्यात कॉल रेकॉर्डींग व्हायरल, बोर्डाचं स्पष्टीकरण
40 लाख रुपयांत MPSC चा पेपर, परीक्षेच्या दोन दिवस आधी हाती; पुण्यात कॉल रेकॉर्डींग व्हायरल, बोर्डाचं स्पष्टीकरण
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Somnath Suryawanshi Mother|मला न्याय मिळाला नाही मी इथेच जीव देते, सोमनाथ सूर्यवंशींच्या आईचा आक्रोशManoj jarange Health : अशक्तपणा, पोटदूखी, पाच दिवसाच्या उपोषणानंतर जरांगे रुग्णालयात दाखलPlane book for Yatra Kolhapur : भादवणकरांचा नाद खुळा, गावच्या यात्रेला थेट विमान बूक, मुंबईतून रवानाPune Police on Sam David | सॅमचा बॉलिवूड ते आंतरराष्ट्रीय सायबर टोळीचा प्रवास, पोलिसांकडून पर्दाफाश

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
स्मशानभूमीवर अनेकांनी संसार थाटले, अतिक्रमण त्वरित हटवा; DCDC बैठकीत भाजप खासदार आक्रमक
स्मशानभूमीवर अनेकांनी संसार थाटले, अतिक्रमण त्वरित हटवा; DCDC बैठकीत भाजप खासदार आक्रमक
कोथरुड परीसरात तिघांकडून तरुणावर हल्ला, प्रकृती चिंताजनक, हल्ल्याचं कारण अस्पष्ट 
कोथरुड परीसरात तिघांकडून तरुणावर हल्ला, प्रकृती चिंताजनक, हल्ल्याचं कारण अस्पष्ट 
भूमिका बदलाच्या टीकेवर भाजपकडून राज ठाकरेंवर पलटवार; आशिष शेलारांचा मैत्रीपूर्ण सल्ला
भूमिका बदलाच्या टीकेवर भाजपकडून राज ठाकरेंवर पलटवार; आशिष शेलारांचा मैत्रीपूर्ण सल्ला
40 लाख रुपयांत MPSC चा पेपर, परीक्षेच्या दोन दिवस आधी हाती; पुण्यात कॉल रेकॉर्डींग व्हायरल, बोर्डाचं स्पष्टीकरण
40 लाख रुपयांत MPSC चा पेपर, परीक्षेच्या दोन दिवस आधी हाती; पुण्यात कॉल रेकॉर्डींग व्हायरल, बोर्डाचं स्पष्टीकरण
माहिती तंत्रज्ञान विभागातर्फे 4066 नवे आधार किट जिल्हाधिकाऱ्यांना देणार; तुमच्या जिल्ह्यात किती?
माहिती तंत्रज्ञान विभागातर्फे 4066 नवे आधार किट जिल्हाधिकाऱ्यांना देणार; तुमच्या जिल्ह्यात किती?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 जानेवारी 2025 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 जानेवारी 2025 | गुरुवार
'सैराट'मधील लंगड्याची फुल्ल हवा, तानाजीचा लूक नवा; गळ्यात सोनं, हाती घड्याळ, सोबतीला मोनालिसा
'सैराट'मधील लंगड्याची फुल्ल हवा, तानाजीचा लूक नवा; गळ्यात सोनं, हाती घड्याळ, सोबतीला मोनालिसा
सुरेश धसांनी ज्यूस पाजला, मनोज जरांगेंचं अंतरावालीतील उपोषण स्थगित; आता मोर्चा मुंबईकडे
सुरेश धसांनी ज्यूस पाजला, मनोज जरांगेंचं अंतरावालीतील उपोषण स्थगित; आता मोर्चा मुंबईकडे
Embed widget