एक्स्प्लोर

Rajshri Patil : विरोधकांना मतदान केलं तरी चालेल, पण मतदान करा; शिंदेंच्या उमेदवाराचे मतदारांना आवाहन

Yavatmal Washim Lok Sabha Election : आपल्याला मतदारांचा मोठा प्रतिसाद मिळत असून आपला विजय निश्चित असल्याचं यवतमाळ वाशिम लोकसभेच्या महायुतीच्या उमेदवार राजश्री पाटील यांनी म्हटलंय.

यवतमाळ : एकीकडे भूमिपुत्र आणि बाहेरचा उमेदवार असं चित्र विरोधकांकडून निर्माण केलं जात असताना दुसरीकडे यवतमाळ वाशिमच्या (Yavatmal Washim Lok Sabha Election) महायुतीच्या उमेदवार राजश्री पाटील (Rajshri Patil) यांनी मतदारांना मतदान करण्याचं आवाहन केलं आहे. विरोधकांना मतदान केलं तरी चालेल पण मतदान करा असं आवाहन शिंदेंच्या उमेदवार असलेल्या राजश्री पाटलांनी केलंय. 

मतदान हे राष्ट्रीय कार्य आहे, नागरिकांनी बाहेर पडून  मतदान करावं अस आवाहन महयुतीच्या उमेदवार   राजश्री पाटील  यांनी केले आहे. मतदानाचा  टक्का वाढवण्यासाठी मतदारांनी समोर यावं,  प्रशासनाने  मोठ्या  सुविधा मतदार केंद्रावर  उपलब्ध केल्या आहे,   विरोधकांना  मतदान केल तरी चालेल मात्र मतदान करा असंही त्या म्हणाल्या. मतदारसंघात प्रचार करताना नागरिकामध्ये चांगला प्रतिसाद  मिळत आहे, त्यामुळे महायुतीच्या माध्यमातून माझा विजय पक्का आहे असा दावा त्यांनी केला. 

आपल्याला मतदारांकडून चांगला प्रतिसाद मिळतोय, दुसऱ्या टप्प्यात लोकांचा महायुतीकडे  कल असल्याचं दिसतंय. गेल्या  10 वर्षांच्या काळात केंद्रातील सरकारने चांगला विकास काम केली. मात्र विरोधक खोटा प्रचार करून अफवा  पसरवत आहेत असा आरोप राजश्री पाटील यांनी केला. 

राजश्री पाटील म्हणाल्या की, "राज्याचे मुख्यमंत्री  थेट जनतेत जातात,  शेतकरी कुटुंबातील  मुलगा  मुख्यमंत्री  बनला  ही विरोधकांची पोटदुखी आहे. मुख्यमंत्र्यांचा  अपमान करण्याचं काम  विरोधक करत आहेत. महाविकास आघाडीचे  प्रवक्ते  महिलांच्या बाबतीत  खालच्या पातळीत टीका करत आहेत, हे लोकांना पटत नाही." 

राजश्री पाटील या सुशिक्षित उमेदवार आहोत, भावना  गवळी यांनी गेल्या  25 वर्षात चांगला विकास  केला आहे अस मत शिवसेना  नेत्या मनीषा कायंदे  यांनी व्यक्त केलं. 

मुख्यमंत्री  एकनाथ शिंदे हे  यवतमाळ वाशीम लोकसभा मतदारसंघात  आले, वाशीममध्ये  मोटार सायकल  रॅलीत  सहभागी झाले. मुख्यमंत्र्यांनी सामान्य माणसाप्रमाणे हातात माईक घेऊन  प्रचार केला आणि वाशीमच्या  जनतेनने त्यांना भरभरून पाठिंबा दिला

मुख्यमंत्र्यांनी जिल्ह्यातील प्रश्न सोडवण्यासाठी  सतत  प्रयत्न सुरु केले आहे . युतीच्या  उमेदवारासाठी  मुख्यमंत्र्यांनी  मोठी ताकत लावली आहे. अब किबार 400 पार हे वाक्य घेऊन नरेंद्र मोदी यांना पुन्हा  पंतप्रधान  करण्यासाठी महायुतीचे  कार्यकर्ते  कामाला  लागले असल्याचं चित्र आहे.  

यवतमाळ वाशीम लोकसभेच्या उमेदवारासाठी मुख्यमंत्र्यांनी प्रतिष्टा पणाला लावल्याचं दिसतंय. 

मतदारांनी ही निवडणूक स्वतःच्या हाती घेतली, संजय देशमुखांचा दावा 

महाविकास आघाडीचे उमेदवार संजय देशमुख म्हणाले की, "मी आजपर्यंत तीनदा अपक्ष निवडणूक लढलो. त्यावेळेस जो प्रतिसाद मिळाला नाही त्यापेक्षाही जास्त प्रतिसाद या वेळेस मला या लोकसभेच्या निवडणुकीत मिळत आहे. माझ्यासोबत सर्वसामान्य जनता आहे. त्यामुळे घाबरण्याचे काही कारण नाही. विरोधी उमेदवार हा बाहेरचा उमेदवार आहे असं कधीच म्हटले नाही.उलट जनताच म्हणत आहे की तुम्ही भूमीपुत्र आणि त्या बाहेरच्या उमेदवार आहेत, त्यामुळे तुम्हाला मतदान करणार. मतदारांनी, जनतेने ही निवडणूक स्वतःच्या हाती घेतलेली आहे. मोठ्या प्रमाणात उत्साहाचं वातावरण आहे. शेतकरी, शेतमजूर, बेरोजगारी या प्रश्नावर आपण काम करणार."

ही बातमी वाचा:

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Virat Kohli IPL 2024 : प्लेऑफमध्ये कोहलीच्या बॅटला लागतो गंज, पाहा आकडेवारी
Virat Kohli IPL 2024 : प्लेऑफमध्ये कोहलीच्या बॅटला लागतो गंज, पाहा आकडेवारी
भारतातील टॉप 10 शहरे; राहणीमानासाठी मुंबई तिसऱ्या स्थानावर, पुण्याचा कितवा नंबर?
भारतातील टॉप 10 शहरे; राहणीमानासाठी मुंबई तिसऱ्या स्थानावर, पुण्याचा कितवा नंबर?
अनाधिकृत 16 पब, 6 बार अन् 10 रुफटॉप सील, पुण्यातील पोर्शे कार अपघातानंतर प्रशासनाची धडक कारवाई 
अनाधिकृत 16 पब, 6 बार अन् 10 रुफटॉप सील, पुण्यातील पोर्शे कार अपघातानंतर प्रशासनाची धडक कारवाई 
भर दुष्काळात मराठवाड्यात आश्वासनांचा पाऊस, मुख्ममंत्री शिंदे आले आणि पुन्हा 14 हजार कोटींच्या घोषणा करून गेले
भर दुष्काळात मराठवाड्यात आश्वासनांचा पाऊस, मुख्ममंत्री शिंदे आले आणि पुन्हा 14 हजार कोटींच्या घोषणा करून गेले
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Ujani Boat Accident : दोन गावांवर दु:खाचा डोंगर..उजनी दुर्घटनेनं महाराष्ट्र हळहळा.. ABP MAJHAZero Hour Dombivli Blast : डोंबिवली MIDC मध्ये भीषण स्फोट, अपघाताला कोण जबाबदार?Zero Hour Water Crisis : 1500 लोकसंख्येच्या गावात एकच हँडपंप, पाणी टंचाईचा प्रश्न कसा सुटेल?Zero Hour Full Water Crisis : ना पिण्याचं पाणी, ना जनावरांचा चारा; दुष्काळग्रस्त भागाला दिलासा कधी?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Virat Kohli IPL 2024 : प्लेऑफमध्ये कोहलीच्या बॅटला लागतो गंज, पाहा आकडेवारी
Virat Kohli IPL 2024 : प्लेऑफमध्ये कोहलीच्या बॅटला लागतो गंज, पाहा आकडेवारी
भारतातील टॉप 10 शहरे; राहणीमानासाठी मुंबई तिसऱ्या स्थानावर, पुण्याचा कितवा नंबर?
भारतातील टॉप 10 शहरे; राहणीमानासाठी मुंबई तिसऱ्या स्थानावर, पुण्याचा कितवा नंबर?
अनाधिकृत 16 पब, 6 बार अन् 10 रुफटॉप सील, पुण्यातील पोर्शे कार अपघातानंतर प्रशासनाची धडक कारवाई 
अनाधिकृत 16 पब, 6 बार अन् 10 रुफटॉप सील, पुण्यातील पोर्शे कार अपघातानंतर प्रशासनाची धडक कारवाई 
भर दुष्काळात मराठवाड्यात आश्वासनांचा पाऊस, मुख्ममंत्री शिंदे आले आणि पुन्हा 14 हजार कोटींच्या घोषणा करून गेले
भर दुष्काळात मराठवाड्यात आश्वासनांचा पाऊस, मुख्ममंत्री शिंदे आले आणि पुन्हा 14 हजार कोटींच्या घोषणा करून गेले
मी माझी स्वत:ची टीम सुरु करतोय, धोनीच्या पोस्टचा नेमका अर्थ काय?
मी माझी स्वत:ची टीम सुरु करतोय, धोनीच्या पोस्टचा नेमका अर्थ काय?
''बिल्डरच्या मुलाला वाचवण्याचा प्रयत्न करणारा आमदार कोणत्या पवारांचा?''; नानांचा सवाल, थेट पत्रच
''बिल्डरच्या मुलाला वाचवण्याचा प्रयत्न करणारा आमदार कोणत्या पवारांचा?''; नानांचा सवाल, थेट पत्रच
मॅक्सवेलला रिटेन करणार का? आरसीबी 4 चार खेळाडूंचा करेल विचार
मॅक्सवेलला रिटेन करणार का? आरसीबी 4 चार खेळाडूंचा करेल विचार
Pune Car Accident Accused Rap Song : पश्चाताप नाहीच, उलट पैशांचा माज, बिल्डर पुत्रानं म्हटला रॅप
पश्चाताप नाहीच, उलट पैशांचा माज, दोघांना चिरडल्यानंतर बिल्डर पुत्रानं म्हटला रॅप
Embed widget