(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Sanjay Raut on Eknath Shinde: संजय राऊतांकडून एकनाथ शिंदेंच्या दावोसमधील 'त्या' भेटीची खिल्ली; म्हणाले, षण्मुखानंदबाहेर मला 'या' देशाचे पंतप्रधान भेटले...!
Sanjay Raut on Eknath Shinde: संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknanth Shinde) यांच्या दावोस देशाच्या भेटीबद्दल बोलताना त्यांची खिल्ली उडवली आहे.
Sanjay Raut on Eknath Shinde: ''आजचा अत्यंत पवित्र दिवस आहे. आज शिवसेनाप्रमुख वाढदिवस आहे. ते आज आपल्यात असते तर 97 वर्षाचे असते. पण युगपुरुषांना वयाने मोजायचे नसते, तपाने मोजायचे असते. त्यांच्या कार्याकाने मोजायचे असते. आजचा दिवशी नेताजी सुभाषचंद्र बोस यांचाही वाढदिवस आहे. हे दोन महान सेनापती या देशात निर्माण झाले'', असं ठाकरे गटाचे नेते आणि आणि खासदार संजय राऊत यांनी प्रतिपादन केले. शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांची आज 97 वी जयंती आहे. यानिमित्ताने षण्मुखानंद सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.
Sanjay Raut on Eknath Shinde: मुख्यमंत्री शिंदे यांच्या दावोस देशाच्या भेटीची राऊतांनी उडवली खिल्ली
यावेळी संबोधित करताना संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दावोस भेटीबद्दल बोलताना त्यांची खिल्ली उडवली. ते म्हणाले की, ''राज्याच्या राजकारणात खूप गमतीजमती होत असतात. आपले मुख्यमंत्री दावोस नावाच्या देशात गेले होते. तुम्हाला आम्हाला माहित नाही दावोस कुठे आहे, आपल्याला दापोली माहीत आहे. दावोसमध्ये महाराष्ट्रामध्ये गुतंवणुकीसाठी एक कार्यालय बनवलं होतं, तिथे आपले मुख्यमंत्री बसले होते. तिथे अचानक दोन-तीन गोरे लोक आले आणि हे (मुख्यमंत्री शिंदे) गडबडले.. आता त्यांच्याशी बोलायचं काय. मग तिथं कोणीतरी दुभाष्याने सांगितलं, हे लक्झमबर्ग (Luxembourg) नावाच्या देशाचे पंतप्रधान आहेत. त्यावेळी लक्झमबर्ग देशाचे पंतप्रधान मुख्यमंत्र्यांना म्हणाले की, अरे.. तुम्ही इथे? ते म्हणाले.. हो आम्ही इथे. किती खोके देऊ येताय आमच्या पक्षात.'', त्यांनी असं म्हणताच षण्मुखानंद सभागृहात एकच हशा पिकला. इतकंच बोलून राऊत थांबले नाही तर ते पुढे म्हणाले, ''सगळेच त्यांच्या पक्षात चालले आहेत, मग लक्झमबर्गचे पंतप्रधानही येणार. मात्र ते म्हणाले नाही..नाही.. मी तर मोदींचा माणूस आहे. मग मुख्यमंत्री म्हणाले, अच्छा तुम्ही मोदींचे माणूस आहात, आम्हीही मोदींचे माणूस आहोत. मग त्यांनी सेल्फी काढला. यानंतर लक्झमबर्गचे पंतप्रधान मुख्यमंत्रींना म्हणाले, हा फोटो मोदींना पाठवा आणि त्यांना सांगा त्यांचा माणूस भेटला होता.'' ते म्हणाले, हे होऊ शकतं, सध्या देशात आणि राज्यात काहीच अशक्य नाही.
Sanjay Raut on Eknath Shinde: चार देशांचे पंतप्रधान उद्धव ठाकरेंचं भाषण ऐकायला आले...
संजय राऊत म्हणाले, ''आता षण्मुखानंद हॉलच्या इथे माझी गाडी आत आली. तेव्हा चार गोरे लोक दिसले मला अचानक.. मी गाडीतून उतरलो.. आमचा बंड्या होता. मी त्याला विचारलं कोण घुसत आहे, आपल्या हॉलमध्ये? मी उतरलो आणि विचारलं.. अरे काय.. तो म्हणतो मी पोलंडचा पंतप्रधान आहे. आणखी एक म्हणाला.. मी डेन्मार्कचा पंतप्रधान आहे. तिसरा म्हणतो.. मी बेल्जीयमचा पंतप्रधान आहे. चौथा म्हणतो मी लिओ वराडकर.. मी मूळचा इथलाच आहे.. पण मी आयलँडचा पंतप्रधान आहे. मग मी विचारलं कशाला आलात इथं? मग ते म्हणाले आम्ही उद्धव ठाकरेंची माणसं आहोत, आम्ही त्यांचं भाषण ऐकायला आलो आहोत, असं म्हणत राऊत यांनी जोरदार टोलेबाजी केली.