एक्स्प्लोर

शिवसेना-भाजपमधील नेमका वाद काय? एकनाथ शिंदेंची मुख्यमंत्र्यांसोबत बैठक; सरनाईकांनी सांगितला बैठकीचा वृत्तांत

शिवसेना शिंदे गटाच्या मंत्र्यांनी आज मुंबईत झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीला बहिष्कार घातला. शिवसेनेकडून केवळ एकनाथ शिंदे हेच मंत्रिमंडळाच्या बैठकीला उपस्थित होते.

मुंबई : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये (Election) भाजपने शिंदे गटातील, तसेच शिंदेंच्या (Shivsena) आमदारांविरुद्ध विधानसभा लढवलेल्या नेत्यांना आपल्या पक्षात घेतल्याने महायुतीत भडका उडाल्याचं दिसून येत आहे. विशेष म्हणजे आजच मंत्री दादा भुसेंविरुद्ध निवडणूक ढललेल्या अद्वैत हिरे आणि संजय शिरसाटांविरुद्ध निवडणूक लढलेल्या राजू खरेंचा भाजपात प्रवेश झाला. त्यामुळे, महायुतीमधील भाजप-शिवसेनेतील वाद आणखी चिघळण्याची शक्यता वर्तवली जातह होती. मात्र, शिवसेना नेते तथा मंत्री प्रताप सरनाईक (Pratap sarnaik) यांनी या वादावर भूमिका मांडली आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीला आज शिवसेना मंत्र्‍यांनी दांडी मारल्याने महायुतीमधील वाद चव्हाट्यावर आला असून आता दोन्ही पक्षांकडून सारवासारव केली जात आहे. 

शिवसेना शिंदे गटाच्या मंत्र्यांनी आज मुंबईत झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीला बहिष्कार घातला. शिवसेनेकडून केवळ एकनाथ शिंदे हेच मंत्रिमंडळाच्या बैठकीला उपस्थित होते. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीचा धर्म न पाळता भाजपकडून करण्यात येणाऱ्या फोडाफोडीमुळे शिवसेनेचे मंत्री नाराज असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीला शिवसेनेचे मंत्री गैरहजर राहिले. तसेच, निधीवाटप आणि इतरही मुद्द्यांमुळे मंत्री नाराज होते. त्यामुळे मंत्र्‍यांनी आज एकनाथ शिंदेंसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन आपली भूमिका मांडली. या बैठकीत नेमकं काय झालं याची माहिती प्रताप सरनाईक यांनी दिली आहे. 

कुटुंबात वाद विवाद होत राहतात मनातली भावना व्यक्त करायची असते. आम्ही आमच्या भावना मुख्यमंत्र्यांकडे मांडल्या आहेत. निवडणुका सुरू आहेत, पक्ष प्रवेश सुरू आहेत. त्यामुळे थोडीशी नाराजी होती. जी नाराजी आहे याबाबत चर्चा झाली आहे, कुणीही महायुतीमधील नेते, पदाधिकारी, नगरसेवक एकमेकांच्या पक्षात घेणार नाहीत अशी चर्चा झाली. महायुतीमधील एकमेकांचे नेते, आमदार, नगरसेवक एकमेकांच्या पक्षात घ्यायचे नाहीत असं तिन्ही पक्षानी ठरवलं आहे. उद्यापासुन याची अमलबजावणी होईल, असेही प्रताप सरनाईक यांनी सांगितले. 

हिरे, पाचू येत-जात असतात

दरम्यान, आज भाजपात झालेल्या दोन पक्षप्रवेशावरही सरनाईक यांनी भाष्य केलं. कोण अद्वय हिरे? राज्यात असे हिरे, पाचू आहेत जे इकडे तिकडे जात असतात, असे म्हणत भाजपात प्रवेश केलेल्या अद्वैत हिंरेंना अधिक महत्त्व नसल्याचं त्यांनी सूचवलं आहे. 

मुख्यमंत्री रविंद्र चव्हाण यांना बोलणार

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवेळी महायुतीत वाद होऊ नये म्हणून आमची बैठक झाल्याची माहिती शिवसेनेतील मंत्र्यांनी दिली. रविंद्र चव्हाण यांच्यासोबत मी बोलणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना मंत्र्यांच्या बैठकीत सांगितलं. तर शिवसेनेच्या मंत्र्यांना एकनाथ शिंदे बोलतील असंही बैठकीत ठरलं आहे. यापुढे महायुतीतील पक्षांमधून एकमेकांच्या पक्षात प्रवेश घेतले जाणार नाही, असंही मुख्यमंत्र्‍यांच्या बैठकीत ठरल्याची सूत्रांची माहिती आहे. 

हेही वाचा

मुख्यमंत्र्यांसोबतच्या कॅबिनेटला दांडी, शिवसेना मंत्र्यांची मोठी नाराजी; महायुतीत तणाव, शिंदेगटाच्या नाराजी 6 कारणे

ENBA 2020,2021 पुरस्कार विजेता, अरुण साधू पाठ्यवृत्ती धारक, शोध पत्रकार.  मागील सहा वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत.... 
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Congress Rally Against SIR: व्होट चोर, गद्दी छोड! 'मतचोरीच्या' विरोधात काँग्रेसचा आज दिल्लीत रामलीला मैदानात एल्गार; राहुल गांधींसह प्रमुख नेते उपस्थित राहणार
व्होट चोर, गद्दी छोड! 'मतचोरीच्या' विरोधात काँग्रेसचा आज दिल्लीत रामलीला मैदानात एल्गार; राहुल गांधींसह प्रमुख नेते उपस्थित राहणार
Maharashtra Winter Session: हिवाळी अधिवेशनात महत्त्वाचा कायदा मंजूर, शेतकऱ्यांना नेमका काय फायदा होणार?
हिवाळी अधिवेशनात महत्त्वाचा कायदा मंजूर, शेतकऱ्यांना नेमका काय फायदा होणार?
Video : मेस्सीचा जलवा, राहुल गांधींना अर्जेंटिनाची जर्सी भेट दिली, विजयी कप देण्यासाठी मेस्सीनं हात पुढे करताच राहुल तत्काळ मागे सरले अन् लहान लेकरांना पुढे या म्हटलं!
Video : मेस्सीचा जलवा, राहुल गांधींना अर्जेंटिनाची जर्सी भेट दिली, विजयी कप देण्यासाठी मेस्सीनं हात पुढे करताच राहुल तत्काळ मागे सरले अन् लहान लेकरांना पुढे या म्हटलं!
Keral Local Body Election: डाव्यांच्या अभेद्य बालेकिल्ल्यात अन् शशी थरुरांच्या हक्काच्या मतदारसंघात भाजपच शिरकाव; केरळमध्ये पहिल्यांदाच महापौर होण्याची चिन्हे!
डाव्यांच्या अभेद्य बालेकिल्ल्यात अन् शशी थरुरांच्या हक्काच्या मतदारसंघात भाजपच शिरकाव; केरळमध्ये पहिल्यांदाच महापौर होण्याची चिन्हे!
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Majha Mahakatta : भारतीय संस्कारांचा अभिमान, शिक्षण क्षेत्रात काम, Yash Birla 'माझा महाकट्ट्यावर'
Kalyan Dombivali Rapido captain : कल्याणमध्ये रॅपिडो चालकाकडून तरुणीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न
Eknath Shinde On CIDCO : नवी मुंबईत सर्वसामान्यांसाठी घर घेणं झालं स्वस्त, सिडकोच्या घरांमध्ये सूट
Dombivli Pollution :  गुलाबी रस्ता आणि डोंबिवलीकर रागाने लाले लाल Special Report
Rural Area Students Studies : अभ्यासाचा भोंगा, मोबाईलला ठेंगा, सकाळ-संध्याकाळ फक्त अभ्यास Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Congress Rally Against SIR: व्होट चोर, गद्दी छोड! 'मतचोरीच्या' विरोधात काँग्रेसचा आज दिल्लीत रामलीला मैदानात एल्गार; राहुल गांधींसह प्रमुख नेते उपस्थित राहणार
व्होट चोर, गद्दी छोड! 'मतचोरीच्या' विरोधात काँग्रेसचा आज दिल्लीत रामलीला मैदानात एल्गार; राहुल गांधींसह प्रमुख नेते उपस्थित राहणार
Maharashtra Winter Session: हिवाळी अधिवेशनात महत्त्वाचा कायदा मंजूर, शेतकऱ्यांना नेमका काय फायदा होणार?
हिवाळी अधिवेशनात महत्त्वाचा कायदा मंजूर, शेतकऱ्यांना नेमका काय फायदा होणार?
Video : मेस्सीचा जलवा, राहुल गांधींना अर्जेंटिनाची जर्सी भेट दिली, विजयी कप देण्यासाठी मेस्सीनं हात पुढे करताच राहुल तत्काळ मागे सरले अन् लहान लेकरांना पुढे या म्हटलं!
Video : मेस्सीचा जलवा, राहुल गांधींना अर्जेंटिनाची जर्सी भेट दिली, विजयी कप देण्यासाठी मेस्सीनं हात पुढे करताच राहुल तत्काळ मागे सरले अन् लहान लेकरांना पुढे या म्हटलं!
Keral Local Body Election: डाव्यांच्या अभेद्य बालेकिल्ल्यात अन् शशी थरुरांच्या हक्काच्या मतदारसंघात भाजपच शिरकाव; केरळमध्ये पहिल्यांदाच महापौर होण्याची चिन्हे!
डाव्यांच्या अभेद्य बालेकिल्ल्यात अन् शशी थरुरांच्या हक्काच्या मतदारसंघात भाजपच शिरकाव; केरळमध्ये पहिल्यांदाच महापौर होण्याची चिन्हे!
Horoscope Today 15 December 2025 : आजचा रविवार 'या' 5 राशींसाठी भाग्यशाली! सूर्यदेवाच्या कृपेने मनातील इच्छा होतील पूर्ण, 12 राशींचे आजचे राशीभविष्य
आजचा रविवार 'या' 5 राशींसाठी भाग्यशाली! सूर्यदेवाच्या कृपेने मनातील इच्छा होतील पूर्ण, 12 राशींचे आजचे राशीभविष्य
बिबटे आणि मनुष्यातील संघर्ष संपवण्यासाठी वनविभागाचं महत्वाचं पाऊल, जुन्नरमध्ये आत्तापर्यंत 68 बिबटे पकडले, नेमक्या काय आहेत उपाययोजना
बिबटे आणि मनुष्यातील संघर्ष संपवण्यासाठी वनविभागाचं महत्वाचं पाऊल, जुन्नरमध्ये आत्तापर्यंत 68 बिबटे पकडले, नेमक्या काय आहेत उपाययोजना
Dharur News : ओबीसी आंदोलक ॲड. मंगेश ससाने यांच्या गाडीवर हल्ला; अज्ञातांकडून दगडफेक, माजलगाव ते धारूर प्रवासादरम्यान घडली घटना
ओबीसी आंदोलक ॲड. मंगेश ससाने यांच्या गाडीवर हल्ला; अज्ञातांकडून दगडफेक, माजलगाव ते धारूर प्रवासादरम्यान घडली घटना
Tilak Varma : ते दोघे सोडून सर्वजण कोणत्याही क्रमावर फलंदाजी करण्यास तयार, टीमसाठी नेमकं काय महत्त्वाचं? तिलक वर्मा म्हणाला...
Tilak Varma : मी 3,4,5,6 कोणत्याही स्थानावर फलंदाजीला तयार, टीमसाठी काय महत्त्वाचं? तिलक वर्मानं थेट सांगितलं....
Embed widget