रमेश तेंडुलकरांच्या लिखाणाचे रेकॉर्ड, सचिनच्या जागतिक विक्रमांना मोडित काढेल : शरद पवार
Sharad Pawar on Ramesh Tendulkar, Dadar : रमेश तेंडुलकर यांनी अथांग लिखाण केलं. सचिनचा जागतिक रेकॉर्ड मोडेल एवढा त्यांचं लिखाण आहे. रमेश तेंडुलकर यांनी शेवटचा कालखंड के सी कॉलेजमध्ये व्यथित केला.
Sharad Pawar on Ramesh Tendulkar, Dadar : "रमेश तेंडुलकर यांनी अथांग लिखाण केलं. सचिनचा जागतिक रेकॉर्ड मोडेल एवढा त्यांचं लिखाण आहे. रमेश तेंडुलकर यांनी शेवटचा कालखंड के सी कॉलेजमध्ये व्यथित केला. मराठी संशोधन मंडळाच्या संकटाच्या कालखंडात संचालकपदाची जबाबदारी रमेश तेंडुलकर यांनी स्वीकारली. मोठी कामगिरी त्यांनी संस्थेच्या कठिण काळात केली. आज त्यांचा कालखंड समर्थपने आपल्या समोरआजच्या कार्यक्रमात ठेवला", असे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार म्हणाले. मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय, दादर आयोजित रमेश तेंडुलकर यांच्या 25 व्या स्मृतिदिनानिमित्त मराठी संशोधन पत्रिका नितीन तेंडुलकर यांच्या पुस्तकांचे प्रकाशन राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थित पार पडला. यावेळी ते बोलत होते.
सचिन तेंडुलकर म्हणाला, आई -बाबा बसने मला भेटायला यायचे. गाडी ठेवतो बोललो तरीही ते बसने ते मला भेटायला यायचे. मी शाळेत क्रिकेट खेळायला सुरवात केली, तेव्हा आचरेकर सरांना मी बोललो सर घरी जेवायला या. तेव्हा सर मला बोलले की जेव्हा तू शतक करशील तेव्हा मी तुझ्या घरी जेवायला येईन. पण तेव्हा मी ती रात्र जागा राहिलो. मीच नाही तर बाबा पण जागे होते. दुसऱ्या दिवशी मी MIG ला सामना खेळलो तेव्हा तिथं शतक केलं.
आमचं चवथ्या मजल्यावर घर होत तेव्हा लिफ्ट नव्हती. तेव्हा घरात सोफ्यावर कोणी ना कोणी बसलेलं असायच त्यांना बाबा स्वतः पाणी द्यायचे. ती बसलेली मानस ही पोस्टमन, वाचमन माळी असायचे. बाबा प्रेमाने समजवून सांगायचे केव्हाही रागावून सांगायचे नाहीत. एक चित्र आमच्या घरात आहे, त्या चित्रात माती ही शिवाजी पार्कची वापरली आहे. नितीन कामाला लागला होता, तेव्हा त्याने शूज दिले होते. मी खूप हट्टाने ते शूज घेतले होते ते माझे पहिले शूज होते, असंही सचिनने सांगितले.
माझ्या आजूबाजूला एवढे वरिष्ठ बसले आहेत. त्यावरून वाटत नाही की, मी सल्ला द्यावा पण माझ्या बाबांनी दिलेला सल्ला तुम्हाला देईन. मला 100% टक्के घरातून पाठिंबा होता, घरात वातावरण निर्माण करण महत्वाचं असतं. बाबांचा अनुभव मी घेतला आहे ते केव्हाही चिडले नाहीत. ते मला चांगल्या मूड मध्ये कस ठेवता येईल याच ते बघायचे, असंही सचिन म्हणाला.
इतर महत्वाच्या बातम्या