Sharad Pawar On Party Symbol : लोकसभेला तुतारी फुंकली, विधानसभेला पुन्हा घड्याळ येणार? शरद पवारांनी थेट सांगितलं...
Sharad Pawar vs Ajit Pawar : यंदाची लोकसभा निवडणुकही अजित पवारांनी राष्ट्रवादीच्या घड्याळावर आणि शरद पवारांनी नवं चिन्ह असलेल्या तुतारीवर लढवली, पण आता विधानसभेचं काय? विधानसभेला शरद पवारांकडे पुन्हा घड्याळ येणार का? यावर स्वतः शरद पवारांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
Sharad Pawar On Party Symbol : मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी थोरल्या पवारांची साथ सोडली आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात (NCP) उभी फूट पडली. परत मागचं पुढे म्हणतात, त्याप्रमाणेच जे-जे शिवसेनेत (Shiv Sena) फूट पडल्यावर घडलं ते-ते सगळं कमी अधिक प्रमाणात राष्ट्रवादीतील फुटीनंतर घडलं. दोन गट, आमदार-खासदारांपासून ते थेट कार्यकर्त्यांपर्यंत सर्व विभागलं गेलं. पक्षाच्या अस्तित्वाची लढाई थेट कोर्टात पोहोचली आणि ज्यांनी पक्ष स्थापन केला, त्या शरद पवार (Sharad Pawar) यांच्या हातून पक्ष आणि त्यासोबतच पक्षाची ओळख असलेलं चिन्हही गेलं. त्यानंतर शरद पवार गटानं नव्यानं कात टाकत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी - शरदचंद्र पवार असं त्यांच्या पक्षाचं नाव ठेवलं. तर, तुतारी पुंकणारा मनुष्य पक्षाचं चिन्ह म्हणून घोषित केलं. यंदाची लोकसभा निवडणुकही अजित पवारांनी राष्ट्रवादीच्या घड्याळावर आणि शरद पवारांनी नवं चिन्ह असलेल्या तुतारीवर लढवली, पण आता विधानसभेचं काय? विधानसभेला शरद पवारांकडे पुन्हा घड्याळ येणार का? यावर स्वतः शरद पवारांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष - शरदचंद्र पवार पक्षाते अध्यक्ष शरद पवार यांनीतुतारीवर आम्ही 10 जागा लढवल्यात, पण विधान यावर मोठं वक्तव्य केलं आहे. शरद पवार म्हणाले की, "आज सांगता येत नाही. लोकसभेचे निकाल कसे येताता, त्यावर ठरेल. पण आता सगळे म्हणतात, आता तुतारीच बरी. तुतारीला लोकांचा प्रतिसाद चांगला मिळतोय. पण, याचाही गांभीर्यानं विचार करावा लागेल. कारण सभेच्या वेळी 288 मतदारसंघांचा विचार करावा लागेल. काय सोयीचं आहे, हे पाहावं लागेल."
महाराष्ट्रातल्या सर्व टप्प्यातलं मतदान नुकतचं पार पडलंय. या निवडणुकीत प्रचारामध्ये कोणते मुद्दे चर्चेत आले. महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यातील आरोप-प्रत्यारोप, निवडणुकीचं वातावरण या आणि अशा अनेक मुद्यांवर पत्रकार प्रशांत कदम यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची मुलाखत घेतली. या मुलाखतीत बोलताना शरद पवारांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं आहे.
नव्या चिन्हामुळं लोकांच्या मनात संभ्रम? शरद पवार म्हणतात...
वर्षानुंवर्ष तुमची किंवा पक्षाची ओळख घड्याळ असल्यामुळे मतदारांच्या मनात काही संभ्रम निर्माण झालेला असू शकतो? यावर बोलताना शरद पवार म्हणाले की, थोडाफार संभ्रम झाल्याचं पाहायला मिळालं. काही जणांना विचारलं कुणाला मत देणार? तर त्यांनी सांगितलं की, शरद पवारांना देणार म्हणजे कुणाला तर घड्याळाला, असं काही लोकांकडून ऐकायला मिळालं. पण अनेक ठिकाणी तुतारी होती, हेदेखील दिसलं.
लोकसभा एकत्र लढवली, विधानसभाही एकत्रच लढवणार?
लोकसभेप्रमाणेच विधानसभाही महाविकास आघाडी एकत्र लढवणार? याबाबत बोलताना शरद पवार म्हणाले की, "विधानसभेलाही महाविकास आघाडीनं एकत्रच लढावं अशी माझी इच्छा आहे. प्रामाणिक प्रयत्नही तसाच राहील. विधानसभेला 288 जागा आहेत, त्यामुळे एकमेकांना समजून घेणं सोपं जाईल. लोकसभेला 48 जागाच होत्या. माझा पक्ष आज लहान असला तरी जनमाणसांत रुजलेला पक्ष आहे... असं असतानाही आम्ही लहान जागा घेतल्यात. आम्ही जास्त जागांची अपेक्षा केली नाही. जादा जागा घेण्याची आणि त्या जिंकून आणण्याची कुवत आमच्यात होती, पण आपण तिघंजण एकत्र यायचं, त्यामुळे या तिघांमधील सामंजस्य राखलं गेलं पाहिजे. हे सूत्र आम्ही सर्वांनी पाळलं."
दरम्यान, महाराष्ट्रातल्या सर्व टप्प्यातलं मतदान नुकतचं पार पडलंय. या निवडणुकीत प्रचारामध्ये कोणते मुद्दे चर्चेत आले. महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यातील आरोप-प्रत्यारोप, निवडणुकीचं वातावरण या आणि अशा अनेक मुद्यांवर पत्रकार प्रशांत कदम यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची मुलाखत घेतली. या मुलाखतीत बोलताना शरद पवारांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
विधानसभा निवडणुकीत बारामतीमध्ये अजितदादांविरोधात घरातील व्यक्तीला उभं करणार का? शरद पवार म्हणाले...