Junnar Assembly constituency : इंदापूरनंतर जुन्नरमध्येही शरद पवारांचे धक्कातंत्र? अतुल बेनकेंना घेरण्यासाठी निष्ठावंत शिलेदाराला मैदानात उतरवणार?
Junnar Assembly constituency : इंदापूरनंतर आता शरद पवारांनी जुन्नरमध्ये लक्ष घातल्याची चर्चा आहे. सोडून गेलेले आमदार अतुल बेनके यांच्या विरोधात निष्ठावंत शिलेदार मैदानात उतरवणार असल्याचे बोलले जाते.
Junnar Assembly constituency : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जुलै 2023 मध्ये महायुतीमध्ये जात शरद पवारांच्या विरोधात जाण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर पहिल्यांदा निवडणूक लोकसभेची झाली. लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मोठं यश मिळवलं. लोकसभेच्या 10 जागा लढवत शरद पवारांनी 8 जागांवर निर्वावाद विजय मिळवला. लोकसभा निवडणुकीत मोठं यश मिळवल्यानंतर शरद पवार आता विधानसभेसाठी मैदानात उतरवले आहेत. अजित पवारांच्या आमदारांविरोधात निवडणूक लढण्यासाठी शरद पवारांनी अनेक मोहरे मैदानात उतरवले आहेत. दरम्यान, काही ठिकाणी विधानसभेसाठी उमेदवार आयात करत असताना शरद पवारांनी आता जुन्नरमध्ये अजित पवारांचे आमदार अतुल बेनके यांच्याविरोधात निष्ठावंत चेहरा मैदानात उतरवणार असल्याची चर्चा आहे.
अतुल बेनकेंविरोधात माजी जिल्हा परिषद सदस्याला मैदानात उतरवण्याची शक्यता
शरद पवारांनी नवी खेळी केली तर जुन्नरच्या राजकारणात नवा ट्विस्ट निर्माण झालाय. आमदार अतुल बेनकेंना घेरण्यासाठी शरद पवार नव्या शिलेदाराल मैदानात उतरवण्याची शक्यता आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून जुन्नर विधानसभा मतदारसंघातून माजी जिल्हा परिषद सदस्य मोहित ढमाले यांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मोहित ढमाले जुन्नर विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे समन्वयक म्हणून काम पाहत आहेत. मोहित ढमाले 2017 ते 2022 या काळात जिल्हा परिषद सदस्य म्हणूनही काम पाहिले आहे.
राष्ट्रवादीत फुट पडल्यानंतर मोहित ढमालेंनी दिली होती शरद पवारांची साथ
मोहित ढमाले यांनी राष्ट्रवादीतील फुटीनंतर ठामपणे शरद पवार यांची साथ दिली होती. लोकसभा निवडणुकीत अमोल कोल्हे यांना जुन्नर तालुक्यातून मोठे मताधिक्य मिळवून देण्यात ढमाले यांची भूमिका महत्त्वाची ठरली असल्याचे बोलले जाते. मोहित ढमाले पक्षाकडे विधानसभेच्या उमेदवारीची मागणी यांनी केली आहे. विधानसभा उमेदवारीच्या रुपाने शरद पवार हे मोहित ढमाले यांना निष्ठेचे फळ देण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील एका सामान्य शिक्षकाचा मुलगा म्हणून मोहित ढमाले यांनी ओळखले जाते.
इंदापूरमध्ये आमदार दत्तात्रय भरणेंना घेरण्यासाठी शरद पवारांच्या माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांना राष्ट्रवादीत प्रवेश देण्याचा निर्णय घेतलाय. तर दुसरीकडे हसन मुश्रीफ यांच्याविरोधातही भाजपमध्ये असलेल्या समरजित घाटगेंना मैदनात उतरवण्याची तयारी केली आहे. लोकसभा निवडणुकीनंतर शरद पवारांचा आत्मविश्वास देखील द्विगुणित झाल्याचे बोलले जाते.
इतर महत्त्वाच्या बातम्या