Mumbai Hit And Run : खासदार चंद्रकांत हंडोरेंच्या मुलाच्या कारची दुचाकीस्वाराला धडक, पळून गेलेल्या गणेश हांडोरेला बेड्या
Ganesh Handore Hit And Run : अपघात झाल्यानंतर गणेश हंडोरे त्या ठिकाणाहून पळून गेला होता. त्याला आता पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
मुंबई : शहरात आणखी एक हिट अँड रनची घटना समोर आली असून काँग्रेस खासदार चंद्रकांत हंडोरे यांच्या मुलाच्या कारने एका दुचाकीस्वाराला धडक दिल्याची घटना घडली. गणेश हंडोरे याने चेंबूर येथील आचार्य कॉलेज जवळ गोपाळ आरोटे या दुचाकीस्वाराला धडक दिली आणि तिथून पळ काढला. या प्रकरणी पोलिसांनी गणेश हंडोरेला अटक केली आहे.
काँग्रेस खासदार चंद्रकांत हंडोरे यांचे पुत्र गणेश हंडोरे याने शुक्रवारी रात्री एक दुचाकीस्वाराला धडक दिली. गणेश हा ज्यूस पिण्यासाठी गोवंडीच्या दिशेने गेला होता. मात्र परत येताना चेंबूर येथील आचार्य कॉलेज जवळ त्याने गोपाळ आरोटे या दुचाकीस्वाराला धडक दिली आणि तिथून पळ काढला.
या प्रकरणी गोवंडी पोलिसांनी गुन्हा दाखल करुन गणेशला अटक केली आहे. मात्र त्याची शुगर वाढल्याने त्याला जेजे रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तर जखमी गोपाळ आरोटेवर झेन रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या प्रकरणी गोवंडी पोलिस पुढील तपास करीत आहेत.
गणेश हंडोरेवर पोलिसांन BNS कलम 110, 125(a), (b),281 आणि मोटर व्हेइकल अॅक्ट कलम 134(a), (b), 184 अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
गणेश हंडोरे रुग्णालयात दाखल
गणेश हंडोरेला पोलिसांनी अटक केल्यानंतर त्यांची शुगर वाढल्याचं दिसून आलं. त्यामुळे त्याला रुग्णालयात भरती केलं असून जेजे रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
टेम्पोच्या धडकेत तरुणाचा मृत्यू
त्याचवेळी मुंबईत आणखी एक हिट अँड रनची घटना घडली असून त्यामध्ये एका 38 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे. हा अपघात कुणी केला याचा शोध पोलिस घेत आहेत. मुंबईतील चिंचपोकळी पुलावर रस्त्याने पायी जाणाऱ्या एका व्यक्तीला टेम्पोने धडक देऊन घटनास्थळावरून पळ काढला.
मयूर प्रदीप लाडीवाल (वय 38) याला जखमी अवस्थेत जवळच्या नायर रुग्णालयात दाखल करण्यात आले, उपचारादरम्यान मयूरचा मृत्यू झाला. मुंबईच्या आग्रीपाडा पोलिसांनी बीएनएस आणि मोटार वाहन कायद्याच्या कलम 281,125 (बी), 106(2) अन्वये अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध सुरू केला.
ही बातमी वाचा: