Sharad Pawar PC : शिवसेना नाव आणि चिन्ह शिंदे गटाला, निवडणूक आयोगाच्या निकालावर शरद पवार यांचं पहिल्यांदाच भाष्य
Sharad Pawar PC : शिंदे गटाला शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह देण्याच्या केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निकालावर राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) सर्वेसर्वा शरद पवार यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे.
Sharad Pawar PC : शिंदे गटाला शिवसेना (Shiv Sena) नाव आणि धनुष्यबाण चिन्ह देण्याच्या केंद्रीय निवडणूक आयोगाच्या (Election Commission) निकालावर राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. "राजकारणात मतभेद असतात, संघर्ष होतो. मात्र सत्तेचा गैरवापर करुन पक्ष आणि खूण हिसकावून घेणं असं कधीच झालं नाही. निवडणूक आयोगाचे निर्णय नेमकं कोण घेतं यात शंका आहे, असं शरद पवार म्हणाले. पिंपरी चिंचवडमध्ये (Pimpri Chinchwad) आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीच्या (Chinchwad Bypoll Election) प्रचारासाठी शरद पवार आज दाखल झाले आहेत.
केंद्रीय निवडणूक आयोगाने मागील आठवड्यात महाराष्ट्रातील सत्तासंघर्षात मोठा निकाल दिला. 17 फेब्रुवारी रोजी दिलेल्या निकालात शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह शिंदे गटाला मिळालं. निवडणूक आयोगाचा हा निकाल उद्धव ठाकरे यांच्यासाठी मोठा धक्का समजला जात आहे. त्यावर विविध पक्षाच्या नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या. परंतु शरद पवार यांनी आतापर्यंत कोणतंही वक्तव्य केलं नव्हतं. अखेर आज चिंचवडमधील पत्रकार परिषदेत त्यांनी पहिल्यांदाच निवडणूक आयोगाच्या निकालावर भाष्य केलं.
मीही काँग्रेसमधून बाहेर पडलो पण... शरद पवार
शरद पवार म्हणाले की, "राजकारणात मतभेद असतात, संघर्ष होतो. मात्र सत्तेचा गैरवापर करुन पक्ष आणि खूण हिसकावून घेणं असं कधीच झालं नाही. मीही काँग्रेसमधून बाहेर पडलो होतो, मात्र मी असं काही केलं नाही. निवडणूक आयोगाने आम्हाला सुचवलं. मग त्यांनी हात आणि आम्ही घड्याळ घेतलं. पण इथे वैशिष्ट्य निवडणूक आयोगाचे आहे की पक्षाचे नाव आणि खूण देऊन टाकलं. देशाच्या इतिहासात असं कधी घडलं नाही. अशावेळी जनता ही ज्या पक्षावर अन्याय झाला त्याच्या बाजूने जाते. सध्या मी राज्यात फिरतोय, त्यातून जनता उद्धव ठाकरेंच्या बाजूने आहे हे दिसतंय. याचे परिणाम येणाऱ्या निवडणुकांमध्ये दिसतील."
'निवडणूक आयोगाचे निर्णय नेमके कोण घेतं यात शंका'
शरद पवार यांनी यावेळी निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवरही बोट ठेवलं. निवडणूक आयोगाचे निर्णय नेमकं कोण घेतंय याची शंका आहे. निवडणूक आयोग कोणाच्या सांगण्याने ते बोलत आहेत असा प्रश्न निर्माण झाला आहे. यामागे कोणती तरी शक्ती आणि त्यांचं मार्गदर्शन दिसत आहे, असं शरद पवार म्हणाले.
VIDEO : Sharad Pawar on early morning oath : पहाटेच्या शपथविधीमुळे राष्ट्रपती राजवट उठली : शरद पवार