एक्स्प्लोर

छगन भुजबळांविरुद्ध शरद पवारांचा उमेदवार ठरला?, जयंत पाटलांसोबत कुणाल दराडेंची 20 मिनिटं चर्चा

माजी आमदार नरेंद्र दराडे यांचे चिरंजीव कुणाल दराडे यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची मुंबईत भेट घेतली

मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकांसाठी सर्वच नेते वरिष्ठ नेत्यांकडे जाऊन, पक्षातून तिकीट मिळावं यासाठी फिल्डींग लावत आहेत. सध्या शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये इच्छुक उमेदवारांची मोठी गर्दी असून दररोज शरद पवार यांच्या भेटीसाठी रांग लागल्याचे पाहायला मिळत आहे. त्यातच, आपल्याला सोडून अजित पवारांसोबत गेलेल्या राष्ट्रवादीतील वरिष्ठ नेत्यांविरुद्ध तगडा उमेदवार देण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून (NCP) सुरू आहे. शरद पवारांचे विश्वासू शिलेदार राहिलेल्या छगन भुजबळ यांनीही ऐनवेळी अजित पवारांची साथ देत मंत्रिपद स्वीकारले. त्यामुळे, शरद पवारांच्या (Sharad pawar) राष्ट्रवादीकडून त्यांच्याविरूद्धही शड़्डू ठोकण्यात येत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर आज कुणाल दराडे यांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांची भेट घेऊन येवला मतदारसंघासाठी उमेदवारी मागितली आहे. त्यामुळे, येवला मतदारसंघात कुणाल दराडेंना उमेदवारी भेटण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

माजी आमदार नरेंद्र दराडे यांचे चिरंजीव कुणाल दराडे यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची मुंबईत भेट घेतली. एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचे आमदार किशोर दराडे आणि त्यांचे पुतणे कुणाल दराडे आणि जयंत पाटील यांच्यात वीस मिनिटं आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने चर्चा झाली. कुणाल दराडे आगामी विधानसभा निवडणुकीत मंत्री छगन भुजबळ यांच्या विरोधात येवला मतदारसंघातून इच्छुक असल्याचे सूत्रांची माहिती आहे. याआधी देखील एकदा दराडे कुटुंबीयांनी जयंत पाटील यांची भेट घेतली होती. आता, ऐन निवडणुकांच्या तोंडावर भेट घेतल्याने येवला मतदारसंघातून त्यांची महाविकास आघाडीची उमेदवारी मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.  

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडे सध्या येवला विधानसभेची जागा आहे. राष्ट्रवादीतील फुटीनंतर अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडी ही विद्यमान जागा असणार आहे. तर, महाविकास आघाडी देखील ही जागा राष्ट्रवादीच्या कोट्यात जाईल. त्यामुळे, राष्ट्रवादीकडून या मतदारसंघात कोण असेल, छगन भुजबळांविरुद्ध शरद पवारांचा उमेदवार कोण असेल याची सर्वांनाच उत्सुकता आहे. त्यातच, आज कुणाल दराडे यांनी भेट घेतल्याने दराडे विरुद्ध भुजबळ असा सामना रंगणार असल्याचे दिसून येते. कारण, महाविकास आघाडीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला ही जागा मिळाल्यास कुणाल दराडे तुतारी हातात घेण्याची दाट शक्यता आहे. 

जरांगे इफेक्ट झाल्यास आव्हान

दरम्यान, मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन ओबीसी आणि मराठा आमनेसामने आले आहेत. त्यातच, मनोज जरांगे पाटील यांनी छगन भुजबलांना आव्हान दिले आहे. तसेच, आगामी विधानसभा निवडणुकीत जरांगे यांच्या आंदोलनाचा परिणाम येवला मतदारसंघात झाल्यास कुणाल दराडे यांची उमेदवारी छगन भुजबळांसाठी आव्हानात्मक ठरू शकते. 

हेही वाचा

''एकनाथ शिंदेंना पुढं करुन कुठल्यातरी चाणक्याने जरांगे पाटलांचा बळी घेतलाय''

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Prashant Kishore : बिहारी राजकारणात आणखी एक भिडू; प्रशांत किशोरांची अखेर राजकारणात एन्ट्री, कोणत्या आश्वासनांची खैरात?
बिहारी राजकारणात आणखी एक भिडू; प्रशांत किशोरांची अखेर राजकारणात एन्ट्री, कोणत्या आश्वासनांची खैरात?
पाठचा भाऊ अन् बापाच्या अपघाताचं दु:ख पाठीवर असतानाही सरफराज खानचं वादळ; झंझावाती द्विशतक, मुंबईची धावसंख्या 525 पार!
पाठचा भाऊ अन् बापाच्या अपघाताचं दु:ख पाठीवर असतानाही सरफराज खानचं वादळ; झंझावाती द्विशतक, मुंबईची धावसंख्या 525 पार!
Govinda : यापुढे मी डान्स करू शकणार का? पायावरील सर्जरीनंतर गोविंदाचा डॉक्टरांना पहिला प्रश्न
यापुढे मी डान्स करू शकणार का? पायावरील सर्जरीनंतर गोविंदाचा डॉक्टरांना पहिला प्रश्न
4,500 रुपयांत पितळाचे दोन हंडे घेतले, त्यावर एकनाथ शिंदेंचे नाव टाकले; लाडक्या बहिणीच्या प्रेमाने मुख्यमंत्री भावूक
4,500 रुपयांत पितळाचे दोन हंडे घेतले, त्यावर एकनाथ शिंदेंचे नाव टाकले; लाडक्या बहिणीच्या प्रेमाने मुख्यमंत्री भावूक
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Shivneri Sundari hostesses : शिवनेरी बसमध्ये 'शिवनेरी सुंदरी, एसटी कर्मचारी संघटेनकडून टीकाTop 50 : टॉप 50 : दिवसभरातील बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा : 4 PM : 2 ऑक्टोबर 2024 : ABP MajhaSai Baba Idol : साईबाबांसाठी महाराष्ट्र एकवटला; बावनकुळे, थोरात म्हणाले...Mahayuti Seat Sharing : विधानसभेच्या आणखी 10 जागांसाठी अजितदादांचा शाहांच्या मागे तगादा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Prashant Kishore : बिहारी राजकारणात आणखी एक भिडू; प्रशांत किशोरांची अखेर राजकारणात एन्ट्री, कोणत्या आश्वासनांची खैरात?
बिहारी राजकारणात आणखी एक भिडू; प्रशांत किशोरांची अखेर राजकारणात एन्ट्री, कोणत्या आश्वासनांची खैरात?
पाठचा भाऊ अन् बापाच्या अपघाताचं दु:ख पाठीवर असतानाही सरफराज खानचं वादळ; झंझावाती द्विशतक, मुंबईची धावसंख्या 525 पार!
पाठचा भाऊ अन् बापाच्या अपघाताचं दु:ख पाठीवर असतानाही सरफराज खानचं वादळ; झंझावाती द्विशतक, मुंबईची धावसंख्या 525 पार!
Govinda : यापुढे मी डान्स करू शकणार का? पायावरील सर्जरीनंतर गोविंदाचा डॉक्टरांना पहिला प्रश्न
यापुढे मी डान्स करू शकणार का? पायावरील सर्जरीनंतर गोविंदाचा डॉक्टरांना पहिला प्रश्न
4,500 रुपयांत पितळाचे दोन हंडे घेतले, त्यावर एकनाथ शिंदेंचे नाव टाकले; लाडक्या बहिणीच्या प्रेमाने मुख्यमंत्री भावूक
4,500 रुपयांत पितळाचे दोन हंडे घेतले, त्यावर एकनाथ शिंदेंचे नाव टाकले; लाडक्या बहिणीच्या प्रेमाने मुख्यमंत्री भावूक
Bihar Flood : बिहारमधील प्रलयकारी पुरासमोर हेलिकॉप्टरही हतबल! ब्लेड तुटल्याने थेट पाण्यात हार्ड लँडिंग'
बिहारमधील प्रलयकारी पुरासमोर हेलिकॉप्टरही हतबल! ब्लेड तुटल्याने थेट पाण्यात हार्ड लँडिंग'
Prakash Ambedkar : नथुराम गोडसेने महात्मा गांधींवर गोळ्या का झाडल्या? प्रकाश आंबेडकरांनी सांगितलं कारण
नथुराम गोडसेने महात्मा गांधींवर गोळ्या का झाडल्या? प्रकाश आंबेडकरांनी सांगितलं कारण
Chandrakant Patil on Prakash Abitkar : चंद्रकांतदादांकडून राधानगरीमधून प्रकाश आबिटकरांच्या उमेदवारीची घोषणा; मंत्रिपदावर काय म्हणाले?
चंद्रकांतदादांकडून राधानगरीमधून प्रकाश आबिटकरांच्या उमेदवारीची घोषणा; मंत्रिपदावर काय म्हणाले?
Gold Rate : जगात सर्वात स्वस्त सोनं कोणत्या देशात मिळतं?
जगात सर्वात स्वस्त सोनं कोणत्या देशात मिळतं?
Embed widget