एक्स्प्लोर

CAA ची अधिसूचना काढताच शरद पवार संतापले, मोदी सरकारवर हल्लाबोल करत , म्हणाले

Sharad Pawar on CAA : केंद्रीय गृहमंत्रालयाने आज (दि.11) सीएएच्या अंमलबजावणीसाठी अधिसूचना काढली आहे. दरम्यान सीएएच्या मुद्द्यावरुन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.

Sharad Pawar on CAA : केंद्रीय गृहमंत्रालयाने आज (दि.11) सीएएच्या अंमलबजावणीसाठी अधिसूचना काढली आहे. दरम्यान सीएएच्या मुद्द्यावरुन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. "निवडणूक आयोग येत्या तीन चार दिवसांमध्ये निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करणार आहे. निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्याची वेळ आली असताना अशाप्रकारचा निर्णय घेऊन मोदी सरकारने संसदीय लोकशाही पद्धतीवर हा सूड आहे. ज्याचा आम्ही निषेध करतो", असं शरद पवार म्हणाले. ते बारामती येथे बोलत होते. 

संस्थांची प्रतिष्ठा राज्यकर्ते ठेवत नाहीत

शरद पवार म्हणाले, नवीन संसदेत लोकसभा आणि राज्यसभा एकत्र येऊ नये अशी व्यवस्था मोदींनी केली. याआधी आम्ही सगळे जाऊन गॅलरीत जाऊन बसायचो. या संस्थांची प्रतिष्ठा राज्यकर्ते ठेवत नाहीत. आज देशाचे संविधान वाचवायचे आहे. चांगले प्रतिनिधी निवडून दिले पाहिजेत. लोकांना बदल हवा आहे पण बदल असलेली विचारधारा त्यांना हवा आहे, असंही पवार यांनी नमूद केलं. 

वय झालं असे सांगत आहेत, वयाची चिंता मी करत नाही. वयाच्या 26 व्या वर्षी मला निवडून पाठवले. मी नुकताच कॉलेजमधून बाहेर पडलो. पण माझी निवडणूक शिक्षित लोकांनी हातात घेतली. तेव्हापासून आजपर्यंत तुम्ही एकही दिवस मला सुट्टी दिली नाही. साल गड्याला सुट्टी देता पण मला तुम्ही दिली नाही, असे अनुभव शरद पवार यांनी यावेळी बोलताना सांगितले. 

शिक्षण, कृषी क्षेत्रात कामं केलं

माझा एक स्वभाव आहे चांगले लोक सोबत घ्यायचे आणि त्यांच्यावर जबाबदारी टाकायची.  प्रश्न आला मार्ग काढायचा. दुसऱ्यावर जबाबदारी द्यायचं परिणाम आजचे चित्र आहेत. संसदेत सुप्रिया 11 ते 6 बसलेली असते. मी 11 ते 6 बसत नाही. संसदेला आज गंभीरपणे घेण्याची गरज आहे. सुप्रिया सखोल अभ्यास करते आणि प्रश्न मांडते, असेही पवार यांनी नमूद केले. 

संसद आणि संविधान याची प्रतिष्ठा राखण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले पाहिजेत

वकिलांनी देशाच्या क्रायसिसमध्ये चांगली आणि महत्वाची भूमिका पार पाडली. Crisisच्या काळात देशाला दिशा दिली आहे. संसद आणि संविधान याची प्रतिष्ठा राखण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले पाहिजेत. देशाच्या दृष्टीने मी पक्षाचा विचार करीत नाही. उपाध्याय यांनी प्रभाव करणारे निर्णय घेतले.Cji यांना सरकारने काढले याच्या विरोधात आवाज उठवला पाहिजे. Cji यांना काढायचा आणि प्रधानमंत्री आणि मंत्री आणि विरोधी पक्षनेते यांना घेऊन निर्णय घेतला. राष्ट्रीय गरजेची स्थिती निर्माण झाली आहे त्या दृष्टीने पावले टाका, असेही पवार यांनी सांगितले. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Pune Car Accident Accused Rap Song : पश्चाताप नाहीच, उलट पैशांचा माज, बिल्डर पुत्रानं म्हटला रॅप
पश्चाताप नाहीच, उलट पैशांचा माज, दोघांना चिरडल्यानंतर बिल्डर पुत्रानं म्हटला रॅप
Pune Car Accident Ketaki Chitale :  पुणे अपघात प्रकरणावर केतकी चितळेचा संताप; पोलिसांचा तो प्लान...
पुणे अपघात प्रकरणावर केतकी चितळेचा संताप; पोलिसांचा तो प्लान...
नाशिकपाठोपाठ नगरमध्ये ठेवींचा अपहार उघड, तब्बल पाच कोटींची फसवणूक, ठेवीदारांचे धाबे दणाणले
नाशिकपाठोपाठ नगरमध्ये ठेवींचा अपहार उघड, तब्बल पाच कोटींची फसवणूक, ठेवीदारांचे धाबे दणाणले
माजोरड्या मुलाचा संतापजनक रॅप, कुठलाही पश्चाताप नाही; व्हिडिओ व्हायरल होताच नेटीझन्स भडकले
माजोरड्या मुलाचा संतापजनक रॅप, कुठलाही पश्चाताप नाही; व्हिडिओ व्हायरल होताच नेटीझन्स भडकले
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Maharashtra Superfast News : महाराष्ट्रातील सुपरफास्ट बातम्या एका क्लिकवर : 07 PM : 23 May 2024TOP 50 : टॉप 50 बातम्यांचा वेगवान आढावा : 06 PM : टॉप 50 न्यूज : 23 May 2024 : ABP MajhaTOP 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 25 न्यूज : 06 PM : 23 May 2024: ABP MajhaABP Majha Headlines : 06 PM : 23 May 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Car Accident Accused Rap Song : पश्चाताप नाहीच, उलट पैशांचा माज, बिल्डर पुत्रानं म्हटला रॅप
पश्चाताप नाहीच, उलट पैशांचा माज, दोघांना चिरडल्यानंतर बिल्डर पुत्रानं म्हटला रॅप
Pune Car Accident Ketaki Chitale :  पुणे अपघात प्रकरणावर केतकी चितळेचा संताप; पोलिसांचा तो प्लान...
पुणे अपघात प्रकरणावर केतकी चितळेचा संताप; पोलिसांचा तो प्लान...
नाशिकपाठोपाठ नगरमध्ये ठेवींचा अपहार उघड, तब्बल पाच कोटींची फसवणूक, ठेवीदारांचे धाबे दणाणले
नाशिकपाठोपाठ नगरमध्ये ठेवींचा अपहार उघड, तब्बल पाच कोटींची फसवणूक, ठेवीदारांचे धाबे दणाणले
माजोरड्या मुलाचा संतापजनक रॅप, कुठलाही पश्चाताप नाही; व्हिडिओ व्हायरल होताच नेटीझन्स भडकले
माजोरड्या मुलाचा संतापजनक रॅप, कुठलाही पश्चाताप नाही; व्हिडिओ व्हायरल होताच नेटीझन्स भडकले
Nashik News : बंधाऱ्यात पोहण्यासाठी गेलेल्या दोन चुलत भावंडांचा बुडून मृत्यू, एकाच आठवड्यातील तिसऱ्या घटनेनं नाशिक हादरलं
बंधाऱ्यात पोहण्यासाठी गेलेल्या दोन चुलत भावंडांचा बुडून मृत्यू, एकाच आठवड्यातील तिसऱ्या घटनेनं नाशिक हादरलं
बुमराहकडे बर्फाच्या खेळपट्टीवरही भेदक मारा करण्याची क्षमता, ब्रेट लीकडून कौतुकाची थाप
बुमराहकडे बर्फाच्या खेळपट्टीवरही भेदक मारा करण्याची क्षमता, ब्रेट लीकडून कौतुकाची थाप
Laapataa Ladies Animal Movie : किरण रावच्या 'लापता लेडिज'ने संदीप वांगा रेड्डीच्या 'अॅनिमल'ला पछाडले
किरण रावच्या 'लापता लेडिज'ने संदीप वांगा रेड्डीच्या 'अॅनिमल'ला पछाडले
आख्ख्यं गाव उपाशी, दोन दिवसापासून चूल पेटली नाही, उजनी बोट दुर्घटनेनंतर झरे गाव स्तब्ध
आख्ख्यं गाव उपाशी, दोन दिवसापासून चूल पेटली नाही, उजनी बोट दुर्घटनेनंतर झरे गाव स्तब्ध
Embed widget