(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Sharad Pawar : सुप्रिया सुळे मुख्यमंत्रिपदाचा चेहरा असू शकतात का? शरद पवार यांनी संसदेचा दाखला देत सगळं स्पष्ट करुन सांगितलं...
Sharad Pawar on Supriya Sule : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी सुप्रिया सुळे यांच्या मुख्यमंत्रिपदाबाबतच्या चर्चांवर भाष्य केलं आहे.
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात सुरु असलेल्या मुख्यमंत्रिपदाबाबतच्या चर्चांवर भाष्य केलं. सुप्रिया सुळे या मुख्यमंत्रिपदाचा चेहरा असू शकतात का? असा प्रश्न शरद पवार यांना बीबीसी मराठीला दिलेल्या मुलाखतीमध्ये विचारण्यात आला होता. या प्रश्नाला उत्तर देताना शरद पवार यांनी सुप्रिया सुळे यांचं प्राधान्य संसदेला असल्याचं सांगितलं. शरद पवार म्हणाले, माझ्या माहितीनुसार सुप्रिया सुळे यांचं संसदेचं सदस्य म्हणून काम करण्याला प्राधान्य आहे. ससंदेत काम करण्याबाबत त्यांना आस्था आहे, संसदेतील उपस्थिती 95 टक्क्यांपेक्षा अधिक आहे. सुप्रिया सुळे या सभागृहाचं कामकाज 11 वाजता सुरु झाल्यापासून ते संपेपर्यंत त्यांची उपस्थिती आहे. सुप्रिया सुळे यांचं रँकिंग संसदेचा सदस्य म्हणून अधिक आहे, त्याच्यात त्यांचं लक्ष आहे, असं शरद पवार म्हणाले. राज्यातील सत्तेची स्थळं आहेत त्याबद्दल फार आस्था सुप्रिया सुळे यांना आहे, असं वाटत नसल्याचं शरद पवार यांनी स्पष्ट केलं.
राज्यातील सरकार घालवणं हे प्राधान्य
शरद पवार यांनी याच मुलाखतीत आगामी विधानसभा निवडणुकीबाबत देखील भाष्य केलं. महाराष्ट्राच्या विधानसभेत लोकसभेचा निर्णय लक्षात घेऊन आज सत्ताधारी पक्ष दिल्लीतील किंवा राज्यातील इथल्या निवडणुका कशा जिंकता येतील यासाठी कामाला लागलेल्या आहेत.आता राज्यातील सरकारचे जास्त दिवस राहिलेले नाहीत. लोकसभेचा निकाल लक्षात घेऊन असेल नसेल तेवढी राज्याची संपत्ती निवडणूक हातात घेण्यासाठी आणि जिंकण्यासाठी सत्ता वापरायची असे प्रयत्न सुरु आहेत, असं शरद पवार म्हणाले.
आता आम्हाला परिवर्तन पाहिजे, बदल करायचा आहे. आज महाराष्ट्रात प्रश्न बदलाचा, परिवर्तनाचा आहे, कुणी नेतृत्त्व करायचा हा प्रश्न निवडणूक झाल्यानंतर करता येईल, आता तो महत्त्वाचा नाही. कोण मुख्यमंत्री होईल हा विषय आमच्यासमोर नाही. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना करोनाचं संकट होतं. पूर्ण देशात, देशाबाहेर संकट होतं. केंद्रानं बंधनं घातली होती, पंतप्रधानांनी थाळ्या वाजवून घराबाहेर पडू नका, असं सांगितलं होतं. महाराष्ट्रात उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना करोनातून सुटका होण्यासाठी राष्ट्रीय धोरण जे ठरवलं होतं त्या नुसार काम केलं. करोनाच्या संकटातून लोकांना वाचवण्यासाठी प्रयत्न केले गेले. अनेक ठिकाणी लोकांचे मृत्यू झाले, तशी परिस्थिती महाराष्ट्रात झाली नाही. राज्यातील संपूर्ण यंत्रणा या कामासाठी कशी लावता येईल याची भूमिका उद्धव ठाकरेंनी घेतली. संकटाच्या काळात त्यांनी जे धैर्य आणि जे प्रशासन दाखवलं त्याचं स्वागत केलं पाहिजे, असं शरद पवार यांनी म्हटलं.
इतर बातम्या :