Shahajibapu Patil : आम्हाला सन्मानपूर्वक जागा मिळतील, विधानसभेला महायुतीचे 175 उमेदवार निवडून येणार, शहाजीबापूंना कॉन्फिडन्स
Shahajibapu Patil, सोलापूर : महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक काही महिन्यांवर येऊन ठेपली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील सर्वच राजकीय पक्षांनी तयारीला सुरुवात केली आहे. ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज मेळाव्यातून निवडणुकीचं रणशिंग फुंकलय. तर दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनीही राज्यभरातील मतदारसंघांचा आढावा घेण्यास सुरुवात केली आहे.
Shahajibapu Patil, सोलापूर : महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक काही महिन्यांवर येऊन ठेपली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील सर्वच राजकीय पक्षांनी तयारीला सुरुवात केली आहे. ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज मेळाव्यातून निवडणुकीचं रणशिंग फुंकलय. तर दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनीही राज्यभरातील मतदारसंघांचा आढावा घेण्यास सुरुवात केली आहे. याशिवाय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी स्वबळावर विधानसभा निवडणूक लढण्याचा निर्धार केलाय. दरम्यान, विधानसभा निवडणुकीत शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार शहाजीबापू पाटील (Shahajibapu Patil) यांनी भाष्य केलं आहे. ते एका वृत्तवाहिनीशी बोलत होते.
शहाजीबापू पाटील काय काय म्हणाले?
शहाजीबापू पाटील (Shahajibapu Patil) म्हणाले, आम्हाला विधानसभेला सन्मानपूर्वक जागा मिळतील. जागा वाढवण्यासाठी आमचे नेते आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रयत्न करणार आहेत. त्यांना पश्चिम महाराष्ट्र असो विदर्भ असो किंवा मुंबई आणि मराठवाडा असो त्यांना सन्मानपूर्वक जागा मिळतील, असा आम्हाला विश्वास आहे. विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या 175 जागा निश्चितपणाने निवडून येतील. लोकसभेची परिस्थिती वेगळी झाली. आताची परिस्थिती वेगळी आहे. बदलेल्या वातावरणात निश्चितपणाने महायुतीला यश येईल.
संजय राऊतांनी फेक न्यूज टाकायला चालू केली
पुढे बोलताना शहाजीबापू (Shahajibapu Patil) म्हणाले, मार्कड यांची कागदपत्र बनावट असतील, तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी. कोणत्याही लोकप्रतिनीधीची हिच मागणी राहिल. माझीही हिच मागणी आहे. संजय राऊत काहीही बोलतात. संजय राऊतांनी फेक न्यूज टाकायला चालू केली. महाराष्ट्रातील वातावरण गढूळ बनवायचं आणि स्वत:ची राजकीय पोळी भाजून घ्यायची, हाच यांचा डाव आहे. महाराष्ट्रातील जनता या डावाला बळी पडणार नाही, असा आम्हाला विश्वास वाटतो.
अलमट्टीची दार उघडण्यासाठी आपल्याला कर्नाटक सरकारला विनंती करावी लागते
गेल्या अनेक वर्षांपासून आपण पाहातोय की, कृष्णा नदीला पूर येतो. पंचगंगा नदीलाही पूर येतो. वारणा नदीचीही तिच परिस्थिती आहे. अलमट्टीची दार उघडण्यासाठी आपल्याला कर्नाटक सरकारला विनंती करावी लागते. जर हे पाणी पावसाळ्यात टेंभू, म्हैसाळ सारख्या योजनांद्वारे जिल्ह्यातील अनेक तालुक्यांचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न मिटेल. मी शासनेला याबाबत पत्रव्यवहार केलाय. शासन याबाबत निर्णय घेणार आहे, असंही शहाजीबापू पाटील (Shahajibapu Patil) यांनी सांगितलं.
इतर महत्वाच्या बातम्या
Pravin Darekar on Uddhav Thackeray : विधानसभेला मोदीजींची गरज नाही, तुम्हाला फडणवीस शिंदे हेच पुरेसे आहेत; भाजप नेत्याचे उद्धव ठाकरेंना प्रत्त्युत्तर