(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Sayaji Shinde : सयाजी शिंदेंनी अजित पवारांची राष्ट्रवादी का निवडली? सांगितलं राज'कारण'
Sayaji Shinde, मुंबई : अभिनेते सयाजी शिंदे यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केलाय. यानंतर त्यांनी राजकारणात येण्याची कारणे सांगितली आहेत.
Sayaji Shinde, मुंबई : अभिनेते सयाजी शिंदे (Sayaji Shinde) यांनी आज (दि.11) मुंबईत अजित पवारांच्या राष्ट्रवादीत (NCP Ajit Pawar) प्रवेश केलाय. दरम्यान, पक्ष प्रवेश करताच उपमुख्यमंत्री अजित पवारांनी त्यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवली आहे. सयाजी शिंदे पक्षाचे स्टार प्रचारक म्हणून जबाबदारी दिलेली आहे. दरम्यान, सयाजी शिंदे यांनी राजकारणात येण्यासाठी अजित पवारांची राष्ट्रवादी कशामुळे निवडली? पुढची दिशा कशी असेल ? याबाबत भाष्य केलं आहे.
सिस्टीममध्ये जाऊन काम कराव लागेल - सयाजी शिंदे
सयाजी शिंदे म्हणाले, सिनेमात काम केलं आहे. नेते व्हीलन म्हणून काम केलं आहे. आता नव्या भूमिकेत आलो आहे. मला लक्षात आल की सिस्टीममध्ये जाऊन काम कराव लागेल म्हणून प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. यावर्षी 22 लाख बिया वाटल्या आहेत. आता काय हटायच नाही,जे व्हायच ते होऊ देत. त्यामुळे प्रवेश करत आहे. पाचशे सहाशे फिल्म केल्या आहेत त्यामुळे आता काही अडचण नाही. त्यामुळे राजकारणात येऊन काही मिळवायच नाही. चांगल काम करायचं आहे. त्यामुळे प्रवेश करत आहे.
मुंबई येथून विशेष पत्रकार परिषदेचे थेट प्रक्षेपण https://t.co/RI6FqCxkbQ
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) October 11, 2024
माझा काही स्वार्थ नाही, मला राजकारणातून काही कमवायचं नाही
पुढे बोलताना सयाजी शिंदे म्हणाले, हातावर पोट असणाऱ्या लोकांना पाहातो. लाडकी बहीण योजनेतून लोकांना मिळणारे समाधान पाहतो. असं वाटतं की यांचे काही निर्णय चांगले होत आहेत. मी ठरवलं आता काय जायचं. आता काय हटायचं नाही. पक्षातील लोकांकडून मी चांगले धडे घेईल. चांगला अभ्यास करेन. विचार करेन. अजितदादांबद्दल मला नेहमीच आदर आहे. मला तुम्ही सन्मान दिला. मला फार आनंद वाटला. यापुढे जी माझ्या डोक्यात काम आहेत. ती व्हायला पाहिजे. पुढच्या पाच वर्षात नक्कीच होतील, असं मला वाटतं. बाकी माझा काही स्वार्थ नाही. मला राजकारणातून काही कमवायचं नाही. आयुष्यात सगळ करुन झालं आहे. पाचशे ते सहाशे सिनमे केले आहेत. माझ्याकडे पाहिल्यानंतर लोकांना आनंद होतं आहे. यापेक्षा जास्त काय पाहिजे, असंही सयाजी शिंदे यांनी स्पष्ट केलं.
ज्येष्ठ अभिनेते श्री. सयाजी शिंदे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेशाचा कार्यक्रम संपन्न झाला. मी श्री. सयाजी शिंदे यांचं मनापासून स्वागत करतो. मनोरंजन सृष्टीसह सामाजिक आणि पर्यावरण क्षेत्रात त्यांनी बजावलेली भूमिका अतुलनीय आहे. त्यांच्या प्रवेशानं पक्षाला अधिक बळकटी येईल… pic.twitter.com/oXWmCLDMsl
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) October 11, 2024
इतर महत्त्वाच्या बातम्या
Sayaji Shinde : मोठी बातमी : अभिनेते सयाजी शिंदे यांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश!