Sanjay Raut : वंदे मातरमला विरोध करणाऱ्याला आमदार केलं, कुठं आहे गब्बर? कुठं आहेत देवेंद्र फडणवीस? संजय राऊतांचा सवाल
Sanjay Raut : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत भाजपवर हल्लाबोल केला.
मुंबई : संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मुंबईत पत्रकार परिषदेला संबोधित केलं. यावेळी त्यांनी महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक, भाजपचा त्याग, मविआचं जागा वाटप, सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी आणि विधानपरिषदेवरील आमदार नियुक्तीच्या मुद्यांवर भाष्य केलं. महाराष्ट्रातील निवडणुकीच्या तारखा या पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांच्या सोयीची असल्याचं राऊत म्हणाले. तर, राज्यपाल नामनिर्देशित आमदारांमध्ये वंदे मातरमला विरोध करणाऱ्याला संधी दिल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला.
महाराष्ट्रात निवडणूक जाहीर झालीय आता पंतप्रधान, गृहमंत्र्यांच्या सोयीच्या तारखा घेतल्या जातात. मतदारांच्या किंवा राज्याच्या सोयीच्या तारखा आता नसतात, असं संजय राऊत म्हणाले. घाई घाईत या निवडणुका घेतल्या आहेत. 23 ला मतमोजणी आहे, 26 तारखेपर्यंत मुदत आहे. इतर राज्यात तसं झालं नाही, हरियाणा , जम्मू काश्मीरसोबत निवडणूक घेता आली असती. आता 26 तारखेला येणारं नवं सरकार महाविकाआघाडीचंच असेल यात शंका नाही, सरकार आम्हीच स्थापन करणार, असं संजय राऊत यांनी सांगितलं.
राज्य सरकारच्या कामाबद्दल बोलताना संजय राऊत पुढं म्हणाले की कोरडा पाऊस पडतोय, ढग गडगडलेत, पाणी कुठं आहे. टोलमाफी जाहीर केलीय, त्या कंपन्यांना शेकडो कोटींचा परतावा द्यावा लागेल, त्यातील 50 टक्के, शिंदे, भाजप आणि अजित पवारांच्या पक्षाकडे जाणार आहेत, असा दावा देखील संजय राऊत यांनी केला.
इद्रिस नायकवडींच्या नियुक्तीवरुन हल्लाबोल.
विधानपरिषद आमदार नियुक्ती संदर्भात हायकोर्टात याचिका असताना घाई घाईनं आचारसंहिता जाहीर होण्यापूर्वी शपथविधी करण्यात आला. आमदारांची नियुक्ती घटनाबाह्य आहे. ठाकरे सरकारनं पाठलेली यादी राजभवनात प्रलंबित होती. राज्यपालांनी
या नियुक्त्या करताना कोणती विशेष माहिती घेतली, असा सवाल देखील राऊत यांनी केला.
अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या कोट्यातून इद्रिस नायकवडी यांना संधी देण्यात आली, यावरुन राऊतांनी भाजपवर हल्लाबोल केला. विधानपरिषदेच्या त्या 7 जणांमध्ये राजकीय कार्यकर्ते, धर्मगुरु आहेत, इद्रिस नायकवडी यांचा इतिहास काय आहे? वंदे मातरमला त्यांनी विरोध केला, सांगली महापालिकेत वंदे मातरमला विरोध करणाऱ्याला आमदार केलं. कुठं आहे हिंदूंचा गब्बर- ढब्बर, कुठं आहेत देवेंद्र फडणवीस, असा सवाल संजय राऊत यांनी विचारला आहे.
वंदे मातरमला विरोध करणाऱ्या एका व्यक्तीला राज्यपाल नियुक्त आमदार करता, त्याच्या मांडीला मांडी लावून बसता, भंपक लोकं आहात आहात, असा हल्लाबोल देखील त्यांनी केला. हिंदुत्ववादी संघटनेच्या नायकवडी यांनी कार्यालयावर हल्ला केला होता, तुमची काय नियत आणि नीती आहे हे सर्वांना समजलं आहे. इतर सहा जणांच्या कुंडल्या काढू शकतं. वंदे मातरमला विरोध केलेल्या व्यक्तीला आमदार केलं आता तुम्हाला हिंदुत्व आणि राष्ट्रभक्तीवर पिपाण्या वाजवायचे अधिकार नाहीत, इंद्रिस नायकवडींचं नाव मागं घेण्याची मागणी करा, असंही संजय राऊत म्हणाले.
संजय राऊत लाईव्ह :
इतर बातम्या :