(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Sanjay Raut on Devendra Fadnavis : खऱ्या राष्ट्रवादीच्या प्रचाराची तुतारी देवेंद्र फडणवीसांनी साताऱ्यात फुंकली : संजय राऊत
Sanjay Raut on Devendra Fadnavis : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis)रविवारी (दि.25) साताऱ्यात दाखल झाले होते. सातारा येथील जलमंदिर पॅलेसमध्ये तुतारीच्या गगनभेदी ललकारात त्यांचे स्वागत करण्यात आले.
Sanjay Raut on Devendra Fadnvis : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis)रविवारी (दि.25) साताऱ्यात दाखल झाले होते. सातारा येथील जलमंदिर पॅलेसमध्ये तुतारीच्या गगनभेदी ललकारात त्यांचे स्वागत करण्यात आले. त्याबद्दल देवेंद्र फडणवीस यांनी खासदार उदयनराजे यांचे ट्वीटरवरुन आभार मानले होते. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार (NCP Sharad Pawar) यांच्या पक्षाला तुतारी हे चिन्ह मिळाल्यानंतर सध्या या चिन्हाचा जोरदार प्रचार करण्यात येत आहे. दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांच्या स्वागताला तुतारी वाजवण्यात आल्याने ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आज (दि.26) ट्वीटरवरुन भाष्य केलंय.
संजय राऊत यांचे ट्वीट चर्चेत
देवेंद्र फडणवीसांनी व्हिडीओ ट्वीट करताच संजय राऊत यांनी ते शेअर केले आहे. यावर संजय राऊत म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेस(खरी)च्या प्रचाराची तुतारी देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सातारा येथे फुंकली. हा एक अपूर्व योगायोग!लवकरच ते अशा प्रकारे शिवसेनेची मशाल घेऊनही राज्यात फिरतील. ही तर श्रींची इच्छा! फडणवीस यांनी माहविकास आघाडीच्या विजयाची तुतारी फुंकल्या बद्दल त्यांचे आभार,असे ट्वीट संजय राऊत यांनी केले आहे.
छत्रपती शिवाजी महाराज की जय 🚩
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) February 25, 2024
निनाद तुतारीचा..!
सातारा येथील जलमंदिर पॅलेसमध्ये तुतारीच्या गगनभेदी ललकारात जेव्हा स्वागत करण्यात आले…
या उत्साहवर्धक स्वागतासाठी खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले जी यांचे मनापासून आभार! 🚩@Chh_Udayanraje#Maharashtra #Satara #Tutari pic.twitter.com/1mFAkDqp1j
संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल सुरुच
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांचा भाजपवर हल्लाबोल सुरुच आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या दाव्याला संजय राऊत यांनी रविवारी (दि.25) चोख प्रत्युत्तर दिले. दुसरे पक्ष संपवणे सोपे नाही. आपल्या देशात लोकशाही आहे. बावनकुळे म्हणतात पक्ष संपवा. मात्र, तुमचा पक्ष 2024 मध्ये राहतोय का ते बघा. 2024 मध्ये भारतीय जनता पक्ष राहणार नाही. संपूर्ण देश काँग्रेसमय झालेला दिसेल. भाजपच्या 303 खासदारांपैकी केवळ 103 खासदार भाजपचे आहेत. इतर खासदार दुसऱ्या पक्षातून आयात केलेले नेते आहेत. या नेत्यांनी पुढे भाजप सोडण्याचा निर्णय घेतला. तर भाजपमुक्त देश होईल, असे संजय राऊत यांनी नमूद केले.
राष्ट्रवादी काँग्रेस(खरी) च्या प्रचाराची तुतारी देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सातारा येथे फुंकली..हा एक अपूर्व योगायोग!लवकरच ते अशा प्रकारे शिवसेनेची मशाल घेऊनही राज्यात फिरतील.
— Sanjay Raut (@rautsanjay61) February 26, 2024
ही तर श्रींची इच्छा!
फडणवीस यांनी माहविकास आघाडीच्या विजयाची तुतारी फुंकल्या बद्दल त्यांचे आभार!…
मोदी-शाहांना देशातील लोकशाही संपवायची आहे
संजय राऊत पुढे बोलताना म्हणाले, मोदी आणि शाहांना देशातील लोकशाही संपुष्टात आणायची आहे. त्यांची पिलावळ संविधान मानायला तयार नाही. बावनकुळे जे म्हणत आहेत ते लोकशाही त्यांच्या बापाच्या त्यांनी आणलेली आहे का काही वर्षांपूर्वी हेच जेपी नड्डा भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष त्यांनी सुद्धा अशाच प्रकारचा वक्तव्य केलं होतं, तो म्हणजे भाजप. आज त्याच जे पी नड्डांना आणि त्यांच्या पक्षाला निवडणुकांसाठी दुसरे पक्ष फोडावे लागत आहेत, असा दावाही संजय राऊत यांनी यावेळी बोलताना केला.
इतर महत्वाच्या बातम्या
'फडणवीसांना अडचणीत आणण्यासाठी जरांगेंना 100 जन्म घ्यावे लागतील'; नितेश राणेंचा पलटवार