एक्स्प्लोर

हरल्यावर मिशा काढू म्हणणाऱ्यांसाठी इकडून न्हावी पाठवू का? संजय राऊतांचा संतोष बांगरांवर निशाणा

Sanjay Raut : कळमनुरी कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत 17 पैकी फक्त 5 जागांवर बांगर यांना विजय मिळवता आला आहे.

Sanjay Raut On Santosh Bangar : हिंगोली जिल्ह्यातील (Hingoli District) कळमनुरी कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीमध्ये (Kalamnuri Market Committee Election) 17 पैकी 17 जागा आमच्याच पॅनलच्या निवडून येणार असून, तसे न झाल्यास माझी मिशी काढून देतो, असं वक्तव्य शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर (Santosh Bangar)  यांनी केलं होतं. मात्र 17 पैकी फक्त 5 जागांवर बांगर यांना विजय मिळवता आला आहे. त्यामुळे यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी यावरून संतोष बांगर यांच्यावर निशाणा साधला आहे. हरल्यावर मिशा काढू म्हणणाऱ्यांसाठी इकडून न्हावी पाठवू का? असा खोचक टोला राऊत यांनी लगावला आहे. 

काय म्हणाले संजय राऊत? 

कृषी उत्पन्न बाजार समितीचे निकाल भाजप आणि सरकारच्या पूर्णपणे विरोधात आहे. काही भाग वगळला तर शिवसेनेसह (ठाकरे गट) महाविकास आघाडीला मोठ्याप्रमाणावर यश मिळाले आहे. शेतकऱ्यांच्या मतदारसंघातून जिथे शेतकरी मतदान करतो त्याठिकाणी म्हणजेच बाजार समितीत शिवसेना आतापर्यंत कधी लढत नव्हती. पण तिथे शिवसेनेचे (ठाकरे गट) पॅनल मोठमोठ्या ताकदीने निवडून आले आहेत. काही गद्दार आमदारांनी घोषणा केल्या होत्या की, आम्ही हरलो तर मिशा काढून टाकू, त्यामुळे आता मिशा काढल्या आहेत का पाहा. नाहीतर आम्ही येथून न्हावी पाठवतो तुमची हजामत करायला, अशा शब्दांत राऊत यांनी संतोष बांगर यांच्यावर टीका केली आहे. 

संतोष बांगरांच्या बालेकिल्ल्यात महाविकास आघाडीचा दणदणीत विजय

संतोष बांगर यांचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या कळमनुरी कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक बांगर यांच्यामुळे प्रतिष्ठेची बनली होती. त्यातच 17 पैकी 17 जागा आपल्याच ताब्यात येणार असल्याचा दावा बांगर यांनी केल्याने या निवडणुकीला अधिकच महत्व प्राप्त झाले होते. दरम्यान सोमवारी (1 मे) रोजी निकाल जाहीर झाला आणि कळमनुरी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत आमदार संतोष बांगर यांच्या पॅनलला 17 पैकी फक्त 5 जागांवर विजय मिळवता आला. तर महविकास आघाडीने 12 जागांवर दणदणीत विजय मिळवला. त्यामुळे बांगर यांनी मिशा काढण्याचा केलेल्या वक्तव्याचं व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. तर विरोधकांकडून देखील यावरून टीका केली जात आहे. तर बांगर आता आपल्या मिशा काढतील का? असा प्रश्न देखील विरोधकांकडून विचारला जात आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या: 

Hingoli News : बांगर यांनी मिशी काढून यावं, आम्ही खांद्यावर बसवून मिरवणूक काढू; संतोष बांगर यांच्या व्हायरल व्हिडीओनंतर ठाकरे गटाचं आव्हान

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Devendra Fadnavis : नवी मुंबई, नागपूर आणि शिर्डी विमानतळांची कामे गतीने मुदतीत पूर्ण करा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
नवी मुंबई, नागपूर आणि शिर्डी विमानतळांची कामे गतीने मुदतीत पूर्ण करा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
अजित पवारांनीही राजीनामा दिला होता, धनंजय मुंडे राजीनामा देत नाहीत तोपर्यंत लढायला हवं, अंजली दमानियांचा हल्लाबोल  
अजित पवारांनीही राजीनामा दिला होता, धनंजय मुंडे राजीनामा देत नाहीत तोपर्यंत लढायला हवं, अंजली दमानियांचा हल्लाबोल  
धनंजय मुंडेंच्या भेटीनंतर अजित पवारांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट; पण राजीनाम्याच्या चर्चेला मुंडेंकडून पूर्णविराम
धनंजय मुंडेंच्या भेटीनंतर अजित पवारांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट; पण राजीनाम्याच्या चर्चेला मुंडेंकडून पूर्णविराम
अंजली दमानियांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट; फडणवीसांकडे प्रमुख 5 मागण्या, वाल्मिक कराडची कुंडलीच काढली
अंजली दमानियांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट; फडणवीसांकडे प्रमुख 5 मागण्या, वाल्मिक कराडची कुंडलीच काढली
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 7AM TOP Headlines 07 AM 07 January 2025 सकाळी ७ च्या हेडलाईन्सMajha Gaon Majha Jilha at 630AM 07 January 2025 माझं गाव, माझा जिल्हासकाळी ६ वाजताच्या 100 हेडलाईन्स- Top 100 headlines at 6AM 07 January 2025  06AM SuperfastCRZ Scam Special Report | मुंबईत कोट्यवधींचा सीआरझेड घोटाळा, भूमी अभिलेखच्या नकाशांमध्ये फेरफार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Devendra Fadnavis : नवी मुंबई, नागपूर आणि शिर्डी विमानतळांची कामे गतीने मुदतीत पूर्ण करा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
नवी मुंबई, नागपूर आणि शिर्डी विमानतळांची कामे गतीने मुदतीत पूर्ण करा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
अजित पवारांनीही राजीनामा दिला होता, धनंजय मुंडे राजीनामा देत नाहीत तोपर्यंत लढायला हवं, अंजली दमानियांचा हल्लाबोल  
अजित पवारांनीही राजीनामा दिला होता, धनंजय मुंडे राजीनामा देत नाहीत तोपर्यंत लढायला हवं, अंजली दमानियांचा हल्लाबोल  
धनंजय मुंडेंच्या भेटीनंतर अजित पवारांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट; पण राजीनाम्याच्या चर्चेला मुंडेंकडून पूर्णविराम
धनंजय मुंडेंच्या भेटीनंतर अजित पवारांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट; पण राजीनाम्याच्या चर्चेला मुंडेंकडून पूर्णविराम
अंजली दमानियांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट; फडणवीसांकडे प्रमुख 5 मागण्या, वाल्मिक कराडची कुंडलीच काढली
अंजली दमानियांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट; फडणवीसांकडे प्रमुख 5 मागण्या, वाल्मिक कराडची कुंडलीच काढली
संशयाची सुई धनंजय मुंडेंकडे आहे; अजित पवारांच्या भेटीनंतर संतापले जितेंद्र आव्हाड, बीड प्रकरणावरुन घेरलं
संशयाची सुई धनंजय मुंडेंकडे आहे; अजित पवारांच्या भेटीनंतर संतापले जितेंद्र आव्हाड, बीड प्रकरणावरुन घेरलं
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 जानेवारी 2024 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 जानेवारी 2024 | सोमवार
पुण्यात भाजप युवा मोर्चा सचिवाच्या बॅगमध्ये पिस्तूल आणि 28 काडतुसे, प्रवासादरम्यान एअरपोर्टवर अटक!
पुण्यात भाजप युवा मोर्चा सचिवाच्या बॅगमध्ये पिस्तूल आणि 28 काडतुसे, प्रवासादरम्यान एअरपोर्टवर अटक!
Suresh Dhas Full PC : जोपर्यंत तपास संपत नाही तोपर्यंत धनंजय मुंडेंनी पदावर राहू नये
Suresh Dhas Full PC : जोपर्यंत तपास संपत नाही तोपर्यंत धनंजय मुंडेंनी पदावर राहू नये
Embed widget