एक्स्प्लोर

Hingoli News : बांगर यांनी मिशी काढून यावं, आम्ही खांद्यावर बसवून मिरवणूक काढू; संतोष बांगर यांच्या व्हायरल व्हिडीओनंतर ठाकरे गटाचं आव्हान

Hingoli News : "संतोष बांगर यांनी मिशी काढून यावं, आम्ही त्यांना खांद्यावर बसवून मिरवणूक काढू," असं आव्हान हिंगोलीतील ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख विनायक भिसे यांनी दिलं आहे.

Hingoli News : "संतोष बांगर यांनी मिशी काढून यावं, आम्ही त्यांना खांद्यावर बसवून मिरवणूक काढू," असं आव्हान हिंगोलीतील (Hingoli) ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख विनायक भिसे यांनी दिलं आहे. हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीमध्ये (Kalamnuri Krushi Utpanna Bazar Samiti Election) 17 पैकी 17 जागा आमच्याच निवडून येतील, नाही आल्यास माझी मिशी काढून देतो, असं वक्तव्य आमदार बांगर यांनी केलं होतं. त्यावर आता ठाकरे गटाकडून प्रतिआव्हान देण्यात आलं आहे.

संतोष बांगर यांच्या पॅनलचा सुपडासाफ

कळमनुरी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीचा निकाल काल (1 मे) हाती आला. बाजार समितीच्या निवडणुकीत आमदार संतोष बांगर (Santosh Bangar) यांच्या पॅनलचा सुपडासाफ झाला आहे. संतोष बांगर यांच्या पॅनलला फक्त पाच जागांवर विजय मिळवता आला आहे तर महविकास आघाडी (Maha Vikas Aghadi) 12 जागांवर दणदणीत विजयी झाली आहे. आमदार संतोष बांगर यांचा बालेकिल्ला असलेल्या कळमनुरी कृषी उत्पन्न बाजार समितीचा निकाल त्यांच्याविरोधात गेला. या विजयानंतर महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला.

खांद्यावर घेऊन मिरवणूक काढू, ठाकरे गटाकडून आमदार बांगर यांना प्रतिआव्हान

या निकालानंतर आमदार संतोष बांगर यांचा प्रचारादरम्यानचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये आमदार संतोष बांगर म्हणत आहेत की "कळमनुरी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत 17 पैकी 17 जागा निवडून येतील, नाही आल्यास माझी मिशी काढून देतो." यावर आता ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख विनायक भिसे यांनी बांगर यांना प्रतिआव्हान दिलं आहे. "तुम्ही मिशी काढून या, तुम्हाला खांद्यावर घेत मिरवणूक काढू. बांगर यांनी विधानसभेत निवडून येऊन दाखवावं आम्ही राजकारण सोडून देतो," असं विनायक भिसे यांनी म्हटलं आहे.

आता बांगर साहेब मिशी काढणार का? नेटकऱ्यांचा सवाल

आमदार संतोष बांगर यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. त्यामुळे 17 पैकी 17 जागा निवडून आल्या नाही तर मिशी काढून देतो असा निर्धार व्यक्त करणाऱ्या बांगर यांना सोशल मीडियावर देखील प्रश्न विचारले जात आहेत. आता बांगर साहेब मिशी काढणार का असा प्रश्न नेटकरी  या व्हायरल व्हिडीओनंतर विचारत आहेत. त्यामुळे बाजार समितीच्या निवडणुकीत धुव्वा उडाल्यानंतर आता आमदार संतोष बांगर मिशी काढणार का हे पाहणं महत्त्वाचं आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

BMC : पूर्व आणि पश्चिम द्रूतगती महामार्गांवर महापालिका राबवणार विशेष स्वच्छता मोहीम
BMC : पूर्व आणि पश्चिम द्रूतगती महामार्गांवर महापालिका राबवणार विशेष स्वच्छता मोहीम
US Vice-President JD Vance : वाण नाही पण गुण लागला! आता डोनाल्ड ट्रम्पनंतर उपराष्ट्राध्यक्ष ग्रीन कार्डवर बोलले, भारतीयांना होळीच्या रंगात 'बेरंग' होण्याची वेळ
वाण नाही पण गुण लागला! आता डोनाल्ड ट्रम्पनंतर उपराष्ट्राध्यक्ष ग्रीन कार्डवर बोलले, भारतीयांना होळीच्या रंगात 'बेरंग' होण्याची वेळ
Amir Khan Girlfriend : तिसऱ्या गर्लफ्रेन्डची ओळख करुन दिल्यानंतर मुलांची-कुटुंबीयांची प्रतिक्रिया काय? आमीर खान म्हणाला...
तिसऱ्या गर्लफ्रेन्डची ओळख करुन दिल्यानंतर मुलांची-कुटुंबीयांची प्रतिक्रिया काय? आमीर खान म्हणाला...
Russia-Ukraine war : रशिया युक्रेन युद्धविराम चर्चेवर व्लादिमीर पुतीन पहिल्यांदाच बोलले; डोनाल्ड ट्रम्प आणि मोदींचा उल्लेख करत काय म्हणाले?
रशिया युक्रेन युद्धविराम चर्चेवर व्लादिमीर पुतीन पहिल्यांदाच बोलले; डोनाल्ड ट्रम्प आणि मोदींचा उल्लेख करत काय म्हणाले?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 09 PM TOP Headlines 9PM 14 March 2025ABP Majha Marathi News Headlines 08 PM TOP Headlines 08 PM 14 March 2025Satish Bhosale Family : अटकेनंतर सतीश भोसले उर्फ खोक्याच्या कुटुंबाची पहिली प्रतिक्रियाABP Majha Marathi News Headlines 07 PM TOP Headlines 07 PM 14 March 2025

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
BMC : पूर्व आणि पश्चिम द्रूतगती महामार्गांवर महापालिका राबवणार विशेष स्वच्छता मोहीम
BMC : पूर्व आणि पश्चिम द्रूतगती महामार्गांवर महापालिका राबवणार विशेष स्वच्छता मोहीम
US Vice-President JD Vance : वाण नाही पण गुण लागला! आता डोनाल्ड ट्रम्पनंतर उपराष्ट्राध्यक्ष ग्रीन कार्डवर बोलले, भारतीयांना होळीच्या रंगात 'बेरंग' होण्याची वेळ
वाण नाही पण गुण लागला! आता डोनाल्ड ट्रम्पनंतर उपराष्ट्राध्यक्ष ग्रीन कार्डवर बोलले, भारतीयांना होळीच्या रंगात 'बेरंग' होण्याची वेळ
Amir Khan Girlfriend : तिसऱ्या गर्लफ्रेन्डची ओळख करुन दिल्यानंतर मुलांची-कुटुंबीयांची प्रतिक्रिया काय? आमीर खान म्हणाला...
तिसऱ्या गर्लफ्रेन्डची ओळख करुन दिल्यानंतर मुलांची-कुटुंबीयांची प्रतिक्रिया काय? आमीर खान म्हणाला...
Russia-Ukraine war : रशिया युक्रेन युद्धविराम चर्चेवर व्लादिमीर पुतीन पहिल्यांदाच बोलले; डोनाल्ड ट्रम्प आणि मोदींचा उल्लेख करत काय म्हणाले?
रशिया युक्रेन युद्धविराम चर्चेवर व्लादिमीर पुतीन पहिल्यांदाच बोलले; डोनाल्ड ट्रम्प आणि मोदींचा उल्लेख करत काय म्हणाले?
Video : विमानतळावरच बोईंग विमानाच्या इंजिनाने पेट घेतला अन् प्रवासी थेट पंख्यावर पळाले, व्हिडिओ पाहून अंगाचा थरकाप
Video : विमानतळावरच बोईंग विमानाच्या इंजिनाने पेट घेतला अन् प्रवासी थेट पंख्यावर पळाले, व्हिडिओ पाहून अंगाचा थरकाप
Satish Bhosale Beed: घर पेटवून दिलं, लहान मुलींना मारहाण; सतीश भोसले उर्फ खोक्या भाईच्या बहिणीकडून न्यायाची मागणी
घर पेटवून दिलं, लहान मुलींना मारहाण; सतीश भोसले उर्फ खोक्या भाईच्या बहिणीकडून न्यायाची मागणी
Satish Bhosale Beed: प्रयागराजवरुन मुसक्या आवळून कोर्टात आणलं, बीड पोलिसांनी खोक्याला 7 दिवस कोठडीत डांबण्यासाठी कोर्टात नेमकं काय सांगितलं?
प्रयागराजवरुन मुसक्या आवळून कोर्टात आणलं, बीड पोलिसांनी खोक्याला 7 दिवस कोठडीत डांबण्यासाठी कोर्टात नेमकं काय सांगितलं?
पोलीस मोस्ट वॉन्टेड गुन्हेगाराला पकडण्यासाठी जाताच हल्ला; एएसआयचा मृत्यू, गावकऱ्यांनी थेट आरोपीची सुटका केली! प्रेतावर पत्नी धाय मोकलून रडली
पोलीस मोस्ट वॉन्टेड गुन्हेगाराला पकडण्यासाठी जाताच हल्ला; एएसआयचा मृत्यू, गावकऱ्यांनी थेट आरोपीची सुटका केली! प्रेतावर पत्नी धाय मोकलून रडली
Embed widget