एक्स्प्लोर

Sangli Loksabha : संजयकाका पाटलांना मोठा धक्का, विशाल पाटलांनी भाजपचे 4 शिलेदार गळाला लावले

Sangli Loksabha : सांगली लोकसभेचे उमेदवार संजयकाका पाटील (Sanjaykaka Patil) यांना मोठा धक्का बसलाय. सांगलीत भाजपच्या चार नगरसेवकांनी पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा देत पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे

Sangli Loksabha : सांगली लोकसभेचे उमेदवार संजयकाका पाटील (Sanjaykaka Patil) यांना मोठा धक्का बसलाय. सांगलीत भाजपच्या चार नगरसेवकांनी पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा देत पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. इतकेच नाही तर चारही नगरसेवक काँग्रेसचे बंडखोर असलेल्या विशाल पाटलांच्या (Vishal Patil) प्रचारासाठी मैदानात उतरले आहेत. पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा देताच चारही नगरसेवकांनी विशाल पाटलांचा (Vishal Patil) जोरदार प्रचार सुरु केलाय. 

मिरजेतल्या भाजप नगरसेवकांमधील असणारी नाराजी उघड

 मिरजेतील भाजपच्या नगरसेवकांकडून विशाल पाटलांच्या प्रचारामध्ये सहभाग घेतल्याच्या कारणातून भाजपच्या शहर जिल्हाध्यक्षांकडून संबंधित चार नगरसेवकांच्यावर कारवाईचा प्रस्ताव प्रदेश कार्यालयाकडे पाठवण्यात आला होता.  मात्र, कारवाईच्या आधीच भाजपचे बंडखोर नगरसेवक संदीप आवटे, निरंजन आवटी, आनंदा देव माने आणि शिवाजी दुर्वे यांनी आपल्या भाजपच्या पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला.  त्याबरोबर भाजपमधील आणखी तीन नगरसेवकांचा छुपा पाठिंबा असल्याचा गौप्यस्फोट केला आहे. त्यामुळे भाजपचे विद्यमान खासदार आणि उमेदवार संजयकाका पाटील यांच्या बद्दल मिरजेतल्या भाजप नगरसेवकांमधील असणारी नाराजी उघडपणे आता समोर आली आहे.

विशाल पाटलांना लिफापा चिन्ह 

महाविकास आघाडीमध्ये सांगलीची जागा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला सुटल्यानंतर काँग्रेस नेते विशाल पाटील यांनी बंडखोरी करत अर्ज दाखल केलाय. त्यानंतर त्यांना लोकसभा निवडणुकीसाठी लिफापा हे चिन्ह बहाल करण्यात आलं आहे. विशाल पाटील गेल्या पाच वर्षांपासून सांगली लोकसभेसाठी तयारी करत होते. मात्र, महाविकास आघाडीतील अंतर्गत राजकारणामुळे त्यांचं तिकीट कापल्या गेलं असल्याची चर्चा आहे. 

विश्वजीत कदमांचा इशारा 

सांगलीत आमच्या तोंडचा घास पळवलाय. मित्रपक्षाला सांगा आम्ही महाविकास आघाडी म्हणून काँग्रेसची 100 टक्के मतं देऊ. मात्र, आता विधानसभेला आवाज काढायचा नाही. आता महाविकास आघाडीच्या उमेदवाराला मतदान होईल. पण विधानसभेला याचा वचपा काढण्यात येईल, असा इशाराच काँग्रेस नेते विश्वजीत कदम यांनी दिलाय. विश्वजीत कदम विशाल पाटलांच्या उमेदवारीसाठी आग्रही होती. मात्र, मित्रपक्षांकडूनच त्यांचा पत्ता कापण्यात आल्याने सांगलीतील काँग्रेसमध्ये नाराजीचा सूर आहे. 

सांगलीत तिरंगी लढत 

भाजपने संजयकाका पाटील यांना सांगलीतून उमेदवारी दिल्यानंतर ठाकरे गटाने अचानकपणे ट्रीपल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांना उमेदवारी जाहीर केली. तर आता काँग्रेसच्या विशाल पाटलांनी बंड करत उमेदवारी अर्ज दाखल केलाय. त्यामुळे सांगली लोकसभेत यंदा तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या 

''आम्ही काही साधू-संत नाही, तुम्ही द्या, आमच्याकडून घ्या, आणि वाजवून घ्या''; अजित पवारांचा वेगळाच स्वॅग

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Jayant Patil: जयंत पाटलांच्या साम्राज्याला तडे, मामाच्या मनमानीला कंटाळून भाचे भाजपच्या वाटेवर; शेकापमधील अंतर्गत धुसफूस चव्हाट्यावर!
जयंत पाटलांच्या साम्राज्याला तडे, मामाच्या मनमानीला कंटाळून भाचे भाजपच्या वाटेवर; शेकापमधील अंतर्गत धुसफूस चव्हाट्यावर!
लग्न चार दिवसांवर अन् पोटच्या लेकीला बापानं गोळ्या घालून ठार केलं, दोन दिवसांपूर्वीच व्हिडिओ शेअर करत मुलगी म्हणाली होती...
लग्न चार दिवसांवर अन् पोटच्या लेकीला बापानं गोळ्या घालून ठार केलं, दोन दिवसांपूर्वीच व्हिडिओ शेअर करत मुलगी म्हणाली होती...
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना जानेवारी महिन्याचे 1500 रुपये कधी मिळणार? आतापर्यंत किती रक्कम मिळाली?
मुख्यमंंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जानेवारीचा हप्ता कधी मिळणार? सातव्या हप्त्याचे 1500 रुपये कधी येणार?
Umraga Vidhansabha Pravin Swami: ठाकरे गटाचे उमरग्याचे आमदार प्रवीण स्वामींचं जात प्रमाणपत्र बनावट? आमदारकीवर टांगती तलवार
ठाकरे गटाच्या आमदाराचं जात प्रमाणपत्र बनावट? आमदारकी धोक्यात येण्याची शक्यता
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vidhanbhavan Buses : महायुतीच्या आमदारांची बैठक,विधानभवन परिसरात बसचा ताफाTop 80 at 8AM Superfast 15 January 2025 सकाळी ८ च्या ८० महत्वाच्या बातम्याMajha Gaon Majha Jilha at 730AM 15 January 2025 माझं गाव, माझा जिल्हाABP Majha Marathi News Headlines 8AM TOP Headlines 08 AM 15 January 2025 सकाळी 8 च्या हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jayant Patil: जयंत पाटलांच्या साम्राज्याला तडे, मामाच्या मनमानीला कंटाळून भाचे भाजपच्या वाटेवर; शेकापमधील अंतर्गत धुसफूस चव्हाट्यावर!
जयंत पाटलांच्या साम्राज्याला तडे, मामाच्या मनमानीला कंटाळून भाचे भाजपच्या वाटेवर; शेकापमधील अंतर्गत धुसफूस चव्हाट्यावर!
लग्न चार दिवसांवर अन् पोटच्या लेकीला बापानं गोळ्या घालून ठार केलं, दोन दिवसांपूर्वीच व्हिडिओ शेअर करत मुलगी म्हणाली होती...
लग्न चार दिवसांवर अन् पोटच्या लेकीला बापानं गोळ्या घालून ठार केलं, दोन दिवसांपूर्वीच व्हिडिओ शेअर करत मुलगी म्हणाली होती...
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना जानेवारी महिन्याचे 1500 रुपये कधी मिळणार? आतापर्यंत किती रक्कम मिळाली?
मुख्यमंंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जानेवारीचा हप्ता कधी मिळणार? सातव्या हप्त्याचे 1500 रुपये कधी येणार?
Umraga Vidhansabha Pravin Swami: ठाकरे गटाचे उमरग्याचे आमदार प्रवीण स्वामींचं जात प्रमाणपत्र बनावट? आमदारकीवर टांगती तलवार
ठाकरे गटाच्या आमदाराचं जात प्रमाणपत्र बनावट? आमदारकी धोक्यात येण्याची शक्यता
Dhananjay Munde: धनंजय मुंडेंना PM मोदींच्या बैठकीपासून दूर ठेवण्यासाठी परळीत पाठवलं? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
मोदी महायुतीच्या आमदारांना भेटणार, पण धनंजय मुंडेंना बैठकीपासून दूर ठेवण्यासाठी परळीत पाठवलं?
PSU Banks : केंद्र सरकार पैसा उभा करण्यासाठी 5 सार्वजनिक बँकांमधील भागिदारी विकणार? अपडेट येताच शेअरमध्ये तेजी
केंद्र सरकार पैसा उभा करण्यासाठी 5 सार्वजनिक बँकांमधील भागिदारी विकणार? अपडेट येताच शेअरमध्ये तेजी
अरबी समुद्रात चक्राकार वारे, उत्तर महाराष्ट्र, विदर्भात अवकाळी  पावसाची शक्यता , वाचा IMD चा अंदाज
अरबी समुद्रात चक्राकार वारे, उत्तर महाराष्ट्र, विदर्भात अवकाळी  पावसाची शक्यता , वाचा IMD चा अंदाज
Bhaskar Jadhav : शिवसेनेची काँग्रेस झाली, भास्कर जाधवांची खदखद बाहेर; सेनेत धुसफूस, ठाकरे काय निर्णय घेणार? 
शिवसेनेची काँग्रेस झाली, भास्कर जाधवांची खदखद बाहेर; सेनेत धुसफूस, ठाकरे काय निर्णय घेणार? 
Embed widget