एक्स्प्लोर

अखेर चंद्रहार पाटलांनी तलवार म्यानातून उपसली; म्हणाले विशाल पाटील भाजपची बी टीम, पाकीट घेऊन...

Sangli Lok Sabha Election: विशाल पाटील  हे भाजपची टीम बी आहे. त्यांना भाजपकडून पाकिट घेऊन पाकिट या चिन्हावर विशाल पाटील अपक्ष  निवडणूक (Sangli Lok Sabha Election) लढवत आहेत. 

सांगली : उमेदवारी न मिळाल्यानं अपक्ष लढत असलेले उमेदवार विशाल पाटील (Vishal Patil)  यांनी चंद्रहार पाटलांवर (Chandrahar Patil)  टीका केलीय. संजयकाकांनी डावपेच करून स्वतःच्या विरोधात  खोटा पैलवान उभा केलाय; पण संजय काकांना पाडू शकणारा खरा पैलवान आता निवडणुकीत उतरलाय अशी प्रतिक्रिया विशाल पाटील यांनी दिलीय. तर बाकीचे सगळे उमेदवार गौण आहेत, असंही विशाल पाटील म्हणालेत. तसंच त्यांच्या याच टीकेला चंद्रहार पाटलांनी प्रत्युत्तर दिले आहे. विशाल पाटील  हे भाजपची टीम बी आहे. त्यांना भाजपकडून पाकिट घेऊन पाकिट या चिन्हावर विशाल पाटील अपक्ष  निवडणूक (Sangli Lok Sabha Election) लढवत आहेत. 

चंद्रहार पाटील म्हणाले, विशाल पाटील हे भाजपची टीम बी आहे. भाजपकडून पाकिट घेऊन पाकिट या चिन्हावर विशाल पाटील अपक्ष  निवडणूक लढवत आहेत.  महाविकास आघाडीचा अधिकृत उमेदवार मी आहे. महाविकस आघाडीतून तुम्ही बाहेर पडले आहे. आपण अपक्ष उमेदवार आहे, आपण बंडखोरी केले हे अजुन त्यांच्या लक्षात आले. माझी निवडणूक एकतर्फी आहे. 

विशाल पाटील भाजपची बी टीम : चंद्रहार पाटील

विशाल पाटील ना मातीतला ना राजकारणातील पैलवान आहे. विशाल पाटील जर स्वतःला पैलवान म्हणून घेत असतील तर आम्ही पैलवानांनी आणि कुस्ती क्षेत्राने काय करावे?  मविआमध्ये बंडखोरी केल्यामुळे काँग्रेस विशाल पाटलांवर कारवाई करणार आहे. सत्ता असताना संजय पाटलांनी आणि  विशाल पाटलांनी काय विकास केलाय हे सर्वांना माहीत आहे.या दोघांची कामगिरी पाहता ही निवडणूक एकतर्फी आहे असे मी मानतो. 

लिफाफ्याच्या माध्यमातून जनता आहेर देणार : विशाल पाटील

काँग्रेसच्या बंडखोर उमेदवार विशाल पाटलांनी आपला प्रचार सुरू केलाय आणि प्रचाराच्या शुभारंभ प्रसंगी भाजपाचे विद्यमान खासदार संजयकाका पाटलांच्यावर तोफ डागली आहे. दुसऱ्यांच्या कामाचा नारळ फोडण्याचा काम संजयकाका पाटलांनी केल्याचा आरोप विशाल पाटलांनी केलाय. त्याचबरोबर काँग्रेस पक्षाकडून आपल्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई होणार नाही,कारण आपण काँग्रेस पक्षाच्या कोणत्याही आदेशाचे उल्लंघन केलेलं नाही.  किंबहुना काय करायचं,काय करू नये याचे देखील आदेश पक्षाकडून आले नाही,त्यामुळे आपल्यावर कारवाईचा प्रश्नच नाही,असं देखील ठाम विश्वास विशाल पाटलांनी व्यक्त केले आहे. त्याच बरोबर आपला चिन्ह लिफाफा असून लिफाफ्याच्या माध्यमातून जनता आपल्याला मतांचा आहेर नक्कीच देईल असा देखील विश्वास विशाल पाटलांनी यावेळी व्यक्त केला आहे.

हे ही वाचा :

अमरावतीत बच्चू कडू विरुद्ध राणा वाद पेटला! नौटंकी केली नसून यापुढे सोडणार नाही, बच्चू कडूंचा पलटवार

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
Virat Kohli Video : फ्लाईंग किस, ह्रदयावर हात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
फ्लाईंग किस, ह्रदयावर हात, क्या बात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Team India Victory Parade : विश्वविजेत्यांची विजयी मिरवणूक, हजारोंच्या संख्येने चाहत्यांची गर्दीAshish Shelar And Rohit Pawar : रोहित पवारांसाठी आशिष शेलार धावले; 'हिटमॅन'ला थांबवलं अन् फोटो काढलाRohit Sharma Meet Family : विजयानंतर रोहित शर्मा आईवडीलांना पहिल्यांदा भेटतो तेव्हा...Ajit Pawar Special Report : बजेटवरुन टीका; अजितदादांचं सडेतोड उत्तर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
Virat Kohli Video : फ्लाईंग किस, ह्रदयावर हात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
फ्लाईंग किस, ह्रदयावर हात, क्या बात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
मुंबईत विक्रमी गर्दी,मोठा उत्साह; फडणवीसांकडून टीम इंडियाचं स्वागत, क्रिकेट फॅन्सना विनंती
मुंबईत विक्रमी गर्दी,मोठा उत्साह; फडणवीसांकडून टीम इंडियाचं स्वागत, क्रिकेट फॅन्सना विनंती
ओढ्यात करंट उतरल्याने 24 म्हशींचा मृत्यू ; सोलापूरच्या ग्रामस्थांमध्ये हळहळ, पशुपालकाचं मोठं नुकसान
ओढ्यात करंट उतरल्याने 24 म्हशींचा मृत्यू ; सोलापूरच्या ग्रामस्थांमध्ये हळहळ, पशुपालकाचं मोठं नुकसान
शिंदे सरकारने पेटारा उघडला, विश्वविजेत्या खेळाडूंसाठी मोठं बक्षीस जाहीर!
शिंदे सरकारने पेटारा उघडला, विश्वविजेत्या खेळाडूंसाठी मोठं बक्षीस जाहीर!
पुणेकरांना गुडन्यूज! लाडक्या बहिणींसाठी केवळ 100 रुपयांत बँक खातं उघडा; डीसीसीचा महत्त्वपूर्ण निर्णय
पुणेकरांना गुडन्यूज! लाडक्या बहिणींसाठी केवळ 100 रुपयांत बँक खातं उघडा; डीसीसीचा महत्त्वपूर्ण निर्णय
Embed widget