अमरावतीत बच्चू कडू विरुद्ध राणा वाद पेटला! नौटंकी केली नसून यापुढे सोडणार नाही, बच्चू कडूंचा पलटवार
महायुतीच्या लोकांना सत्तेची मस्ती आली आहे. सत्ता असल्याने कायदा यांच्या हातात आहे. कायद्याचा गैरवापर करत आहे, असे आमदार बच्चू कडू म्हणाले.
अमरावती : अमरावतीत प्रहारचे आमदार बच्चू कडू (Bacchu Kadu) विरुद्ध रवी राणा (Ravi Rana) यांच्यात वाद पेटला आहे. बच्चू कडू विनाकारण नौटंकी करतात,असा आरोप रवी राणांनी केला आहे. रवी राणांच्या या आरोपानंतर बच्चू कडू हे कमालीचे आक्रमक झाले असून त्यांनी पलटवार केला आहे. महायुतीच्या लोकांना सत्तेची मस्ती आली आहे. नौटंकी केली नसून यापुढे सोडणार नाही असे म्हणत बच्चू कडूंनी पलटवार केला आहे.
बच्चू कडू म्हणाले, नवनीत राणांना पराभव समोर दिसत आहे. आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला आहे. सभेचे ठिकाण आम्ही बुक केले होते. निवडणुका आहेत म्हणून आम्ही थांबलोय. थांबणे हा आमचा मूळ स्वभाव नाही. सभेचं ठिकाणा आम्ही बूक केलं होतं. आम्ही तोंड उघडले तर अनेकांची अडचण होईल. हिंदू मुस्लीम दंगल होईल ही आम्हाला भिती होती. निवडणुकीच्या तोंडावर दंगल होईल म्हणून आम्ही माघार घेत आहे. महायुतीच्या लोकांना सत्तेची मस्ती आली आहे. सत्ता असल्याने कायदा यांच्या हातात आहे. कायद्याचा गैरवापर करत आहे. कायद्याचा गैरवापर करता तर कशाला निवडणूक घेता?
अमरावतीत सध्या मोठ्या प्रमाणावर जुगार सुरू : बच्चू कडू
बच्चू कडू म्हणाले, अमरावतीत सध्या मोठ्या प्रमाणावर जुगार सुरु आहेत. हनुमान जयंतीला जाहिरत दिली आहे. रॅलीला उपस्थित राहणाऱ्यांना हजार रुपये दिले जाईल, असे लिहिले होते. हा बाजार मांडला आहे. खरे हिंदूत्ववादी असाल तर बाजाराला थांबवा. राज्याचा सत्यानाश केला. धर्माचा इतक्या खालच्या पातळीवरचा वापर अमरावती एवढा कोणत्याच मतदारसंघात झालेला नाही.कोणी बोलत नाही. लोकशाहीचा खून झाला आहे. प्रशासन गप्प बसले आहे. यांचा पराभव होणारच आहे.
आज अमित शाहांच्या सभेकडे सर्वांच लक्ष
अमरावतीत महायुतीच्या उमेदवार नवनीत राणांच्या प्रचारासाठी आज अमित शाहांची सभा होणार आहे. सकाळी 11 वाजता सायन्स कोर मैदानावर अमित शाहांची अमरावतीत सभा होणार आहे. याआधी अपक्ष निवडणूक लढवणाऱ्या नवनीत राणांनी भाजपकडून अमरावतीत तिकीट देण्यात आलंय. त्यांनंतर नाराज झालेल्या बच्चू कडूंनी इथून प्रहारचा उमेदवार दिलाय. यानंतर आजच्या सभास्थळावरूनही गोंधळ झालाय. बच्चू कडूंनी आजच्या तारखेनं सायन्स कोर मैदान बुक केलं होतं. मात्र अमित शाहांच्या सभेमुळे बच्चू कडूंना परवानगी नाकारण्यात आलीय. यावरून वाद झालाय. त्यामुळे आजच्या या अमित शाहांच्या सभेकडे सर्वांच लक्ष लागलंय.
हे ही वाचा :
Bacchu Kadu Vs Navneet Rana : मला अटक करण्याचा राणा दाम्पत्याचा सुनियोजित कट; आमदार बच्चू कडूंचा गंभीर आरोप