Maharashtra Parivartan Mahashakti : परिवर्तन महाशक्तीकडून स्वाभिमानी शेतकरी संघटना शिरोळ अन् मिरजमध्ये उमेदवार देणार; ऊस परिषदेत उमेदवार ठरणार?
शिरोळ मतदारसंघांमध्ये साखर पट्ट्याचं राजकारण महत्त्वाचां आहे. त्यामुळे या पट्ट्यात स्वाभिमानीची ताकद निर्णायक आहे. त्यामुळे आता स्वाभिमानीचा उमेदवार रिंगणात असल्याने कोणाला फटका बसणार याची चर्चा आहे.
Maharashtra Parivartan Mahashakti : राज्यात महायुती आणि महाविकास आघाडीसमोर तिसरा पर्याय निर्माण केलेल्या परिवर्तन महाशक्तीने (Maharashtra Parivartan Mahashakti Candidate List 2024) आज (21 ऑक्टोबर) उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ विधानसभा आणि सांगली जिल्ह्यातील मिरज विधानसभा मतदारसंघातून स्वाभिमानी शेतकरी संघटना (swabhimani shetkari sanghatana) आपला उमेदवार देणार आहे. या संदर्भातील घोषणा आज परिवर्तन महाशक्तीच्या पत्रकार परिषदेत करण्यात आली. हे दोन मतदारसंघ राजू शेट्टी (Raju Shetti) यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेला देण्यात आले आहेत. त्यामुळे शिरोळमधील लढत तिरंगी होणार की चौरंगी होणार याची उत्सुकता रंगली आहे. स्वाभिमानी ऊस परिषद 25 ऑक्टोबर रोजी होणार आहे. या परिषदेत उमेदवार ठरणार का? याचीही उत्सुकता आहे.
शिरोळमध्ये आणि मिरजमध्ये आणखी एक उमेदवार वाढला
दुसरीकडे मिरजमधून सांगलीचे पालकमंत्री सुरेश खाडे यांना भाजपच्या पहिल्या यादीमध्ये उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे त्या ठिकाणी महाविकास आघाडीचे उमेदवार कोण असणार याची चर्चा रंगली असतानाच स्वाभिमानीचा सुद्धा उमेदवार असणार आहे. त्यामुळे एक प्रकारे शिरोळमध्ये आणि मिरजमध्ये आणखी एक उमेदवार वाढल्याने लढती तिरंगी किंवा चौरंगी होण्याची चिन्हे आहेत. दरम्यान, शिरोळमध्ये शिवसेना शिवसेना शिंदे गटाकडून राजेंद्र पाटील यड्रावकर असतील असे बोलले जात आहे. मात्र, त्यांच्या शाहू आघाडी या पक्षाला निवडणूक आयोगाकडून मान्यता मिळाली आहे. त्यामुळे ते त्यांच्या पक्षाकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरवणार की शिवसेना शिंदे गटाकडून लढणार याबाबत अजून स्पष्टता आलेली नाही. त्यामुळे ते जरी त्यांच्या पक्षाकडून लढले, तरी त्यांना शिंदे गटाकडून पाठिंबा दिला जाईल असं बोललं जात आहे.
शिरोळमध्ये तिरंगी लढत होणार?
दुसरीकडे, शिवसेना ठाकरे गटाकडून या मतदारसंघांवर दावा करण्यात आला असून या ठिकाणी माजी आमदार उल्हास पाटील इच्छुक आहेत. त्यांच्या उमेदवारीचे सुतोवाच करण्यात आले आहेत. मात्र, काँग्रेसकडून सुद्धा या मतदारसंघावर दावा करण्यात आला आहे. त्यामुळे या मतदारसंघातून महाविकास आघाडीचा उमेदवार निश्चित झालेला नाही. काँग्रेसकडून या मतदारसंघांमध्ये गणपतराव पाटील इच्छुक आहेत. काँग्रेसच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती कोल्हापूरमध्ये पार पडल्या. त्यावेळी गणपतराव पाटील यांनी सुद्धा मुलाखत दिली आहे. त्यामुळे मतदारसंघ कोणाच्या वाट्याला जातो यावर तेथील उमेदवार निश्चित होणार आहे. शिरोळ मतदारसंघांमध्ये साखर पट्ट्याचं राजकारण महत्त्वाचां आहे. त्यामुळे या पट्ट्यात स्वाभिमानीची ताकद सुद्धा निर्णायक आहे. त्यामुळे आता स्वाभिमानीचा उमेदवार रिंगणात असल्याने कोणाला फटका बसणार याची चर्चा आहे. स्वाभिमानीने परिवर्तन महाशक्तीच्या जागा वाटपामध्ये मतदारसंघ जरी आपल्याकडे घेतला असला, तरी उमेदवार मात्र निश्चित केलेला नाही. राजू शेट्टी कार्यकर्त्यांशी चर्चा करून त्या ठिकाणी उमेदवार निश्चित करणार आहेत. त्यामुळे पुढील एक ते दोन दिवसांमध्ये मिरज आणि शिरोळमधून उमेदवार जाहीर केला जाईल अशी चर्चा आहे.
"परिवर्तन महाशक्ती" महाराष्ट्र राज्य विधानसभा 2024 अधिकृत उमेदवारांची यादी
उमेदवाराचे नाव
ओमप्रकाश उर्फ बच्चू बा. कडू
मतदार संघ
42- अचलपूर
प्रहार जनशक्ती पक्ष
अनिल छबिलदास चौधरी
11 - रावेर यावल
प्रहार जनशक्ती पक्ष
गणेश रमेश निंबाळकर
118 - चांदवड
प्रहार जनशक्ती पक्ष
सुभाष साबणे
90 - देगलूर बिलोली (SC)
प्रहार जनशक्ती पक्ष
अंकुश सखाराम कदम
150 - ऐरोली
महाराष्ट्र स्वराज्य पक्ष
माधव दादाराव देवसरकर
84 - हदगाव हिमायतनगर
महाराष्ट्र स्वराज्य पक्ष
गोविंदराव सयाजीराव भवर
94 - हिंगोली
महाराष्ट्र राज्य समिती
वामनराव चटप
70 - राजुरा
स्वतंत्र भारत पक्ष
इतर महत्वाच्या बातम्या