(Source: Poll of Polls)
आता फक्त उत्तर प्रदेशवर लक्ष; अखिलेश यादव, आझम खान यांनी खासदारकीचा दिला राजीनामा
Akhilesh Yadav Resigns Lok Sabha: समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी खासदारकीचा राजीनामा दिला आहे. 2019 मध्ये आझमगडमधून लोकसभा निवडणूक जिंकून ते संसदेत पोहोचले होते.
Akhilesh Yadav Resigns Lok Sabha: समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी खासदारकीचा राजीनामा दिला आहे. 2019 मध्ये आझमगडमधून लोकसभा निवडणूक जिंकून ते संसदेत पोहोचले होते. यासोबतच समाजवादी पक्षाचे (Samajwadi Party) नेते आझम खान (Azam Khan) यांनीही मंगळवारी संसद सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत अखिलेश यादव (Akhilesh Yadav) यांनी करहल मतदारसंघातून पहिल्यांदाच नशीब आजमावले होते. आता त्यांनी लोकसभा (Lok Sabha) सदस्यत्वाचा राजीनामा देऊन विधानसभेत विरोधी पक्षाची भूमिका बजावण्याचा निर्णय घेतला आहे.
उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत (Uttar Pradesh Assembly Elections) अखिलेश यादव यांनी करहल मतदारसंघात त्यांच्या प्रतिस्पर्धी उमेदवाराचा 67 हजार 504 मतांनी पराभव केला. अखिलेश यांच्या विरोधात भाजपने केंद्रीय मंत्री एसपी बघेल यांना करहल मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली होती. त्यांना 80 हजार 692 मते मिळाली. करहल ही जागा समाजवादी पक्षाचा बालेकिल्ला मानली जाते.
Samajwadi Party (SP) chief Akhilesh Yadav to resign from Lok Sabha membership today: Sources
— ANI (@ANI) March 22, 2022
In the recently held Uttar Pradesh elections, he was elected as an MLA from the Karhal seat. pic.twitter.com/6ARrBpG9Ga
1993 पासून समाजवादी पक्ष करहल मतदारसंघ जिंकत आला आहे. मात्र 2002 मध्ये येथे भाजपने बाजी मारली होती. दरम्यान, यावेळी अखिलेश यादव यांच्या नेतृत्वाखाली समाजवादी पक्षाने विधानसभा निवडणूक लढवली. याचबरोबर योगी आदित्यनाथ यांना आवाहन देण्यासाठी सपाने जयंत चौधरी यांच्या राष्ट्रीय लोक दल, ओम प्रकाश राजभर यांच्या सुहेलदव भारतीय समाज पक्षासोबत युती केली होती.
इतर महत्वाच्या बातम्या:
- Hiranandani Group Raid : हिरानंदानी समूह IT च्या रडारवर; मुंबई, बंगळुरुसह देशभरातल्या 24 ठिकाणाच्या मालमत्तांवर छापेमारी
- गोव्यात भाजप सरकारच्या शपथविधीला पंतप्रधान मोदी राहणार उपस्थित!
- Coronavirus Cases Today : देशात गेल्या 24 तासांत 1581 नवीन रुग्णांची नोंद, कोरोनाबाधितांनी ओलांडला 4 कोटी 30 लाखांचा टप्पा