(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Coronavirus Cases Today : देशात गेल्या 24 तासांत 1581 नवीन रुग्णांची नोंद, कोरोनाबाधितांनी ओलांडला 4 कोटी 30 लाखांचा टप्पा
Coronavirus Cases Today in India : भारतात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 1,581 नवीन रुग्ण आढळले आहेत. देशातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 4 कोटी 30 लाख 10 हजार 971 झाली आहे.
Coronavirus Cases Today in India : देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 1,581 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. यानंतर, देशातील कोरोना विषाणूची लागण झालेल्यांची संख्या 4 कोटी 30 लाख 10 हजार 971 वर पोहोचली आहे. तसेच, देशातील सक्रिय कोरोनाबाधितांची संख्या 23,913 झाली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, देशात गेल्या 24 तासांत 33 कोरोना रुग्णांनी आपला जीव गमवाला आहेत. आतापर्यंत भारतातील एकूण कोरोनामृतांची संख्या 5 लाख 16 हजार 543 झाली आहे.
आतापर्यंत 181 कोटींहून अधिक डोस देण्यात आले
देशव्यापी लसीकरण मोहिमेअंतर्गत आतापर्यंत कोरोना प्रतिबंधात्मक लसींचे 181 कोटींहून अधिक डोस देण्यात आले आहेत. सोमवारी दिवसभरात 30 लाख 58 हजार 879 डोस देण्यात आले, त्यानंतर आतापर्यंत एकुण 181 कोटी 56 लाख 01 हजार 944 डोस कोरोना लसीचे डोस देण्यात आले आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, आरोग्य कर्मचारी, कोरोना योद्धा आणि इतर आजारांनी ग्रस्त असलेल्या 60 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांना 2 कोटींहून अधिक (2 कोटी 14 लाख 64 हजार 682) प्रतिबंधात्मक लसी देण्यात आल्या आहेत.
18 वर्षांपेक्षा जास्त वयोगटासाठी बूस्टर डोस
जगातील अनेक भागांमध्ये कोरोनाच्या संसर्गाच्या रुग्णांमध्ये झालेली वाढ आणि आंतरराष्ट्रीय प्रवासात येणाऱ्या समस्या पाहता, सरकार 18 वर्षांवरील सर्वाना कोरोना लसीचा बूस्टर डोस देण्याच्या विचारात आहे. सूत्रांनी सोमवारी ही माहिती दिली आहे. सध्या आरोग्य कर्मचारी, आघाडीचे कर्मचारी आणि 60 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्यांना कोरोना लसीचे बूस्टर डोस दिले जात आहेत.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- Plane Crash in China : चीनमधील विमान अपघातानंतर भारत सर्तक, डीजीसीएचा बोईंग विमानांवर पाळत ठेवण्याचा निर्णय
- Petrol Diesel Price : खिशाला कात्री! पेट्रोल-डिझेल महागलं, 137 दिवसांनंतर इंधन दरवाढ, जाणून घ्या तुमच्या शहरातील नवे दर
- Viral Video : रात्री 12 वाजता नोएडाच्या रस्त्यावर धावत होता मुलगा, नेटकरी करतायत सलाम, कारण ऐकून व्हाल थक्क
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha