एक्स्प्लोर

Hiranandani Group Raid : हिरानंदानी समूह IT च्या रडारवर; मुंबई, बंगळुरुसह देशभरातल्या 24 ठिकाणाच्या मालमत्तांवर छापेमारी

Hiranandani Group Raid : हिरानंदानी समुहाच्या मुंबई, बंगळुरु, चेन्नईसह देशभरातल्या 24 ठिकाणांच्या मालमत्तांवर आयकर विभागाची छापेमारी केली आहे. तर मुंबईतील कुर्ल्यामधील बिल्डर ईडीच्या रडारवर आहे.

Hiranandani Group Raid : हिरानंदानी समूहाच्या मालमत्तांवर आयकर खात्यानं (IT Raid) आज छापे टाकले आहेत. मुंबई (Mumbai), बंगळुरू (Bengaluru), चेन्नई (Chennai) शहरांत 24 ठिकाणी आयकर पथकाकडून तपासणी सुरू आहे. हिरानंदानी समूहाच्या देशभरातील मालमत्तांवर आयकर खात्यानं एकाच वेळी मोठ्या प्रमाणात छापे टाकले आहेत. परदेशी मालमत्तेसंदर्भात ही छापेमारी असल्याचं कळतंय मात्र याबाबत हिरानंदानी समुहाकडून कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार देण्यात आला आहे. 

दुसरीकडे मुंबईत ईडीनंही छापेमारी केली आहे. बडे बांधकाम व्यावसायिक ईडीच्या रडारवर असल्याची माहिती मिळत आहे. एवढंच नाहीतर, बांधकाम व्यावसायिकाचं राजकीय कनेक्शनही ईडी तपासणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. मुंबईसोबतच ठाण्यातही ईडी छापेमारी करण्याची शक्यता असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. 

दरम्यान, मुंबई, ठाण्यासह अनेक ठिकाणी ईडी छापे टाकण्याच्या तयारीत आहे. पँडोरा पेपर्स प्रकरणी मोठा बांधकाम व्यावसायिक ईडीच्या रडारवर आहे. या बांधकाम व्यावसायिकाचं राजकीय कनेक्शनही ईडी तपासणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. 

महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांना कुर्ल्यातील गोवावाला कंपाउंड प्रॉपर्टी संदर्भात अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचं समोर आल्यानंतर ईडीनं अटक केली होती. गेल्या 23 फेब्रुवारीला नवाब मलिक यांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर पंधरा दिवस कोठडी  मिळाल्यानंतर चौकशी करण्यात आली. त्यासंदर्भात आज कुर्ल्यातील गोवावाला कंपाउंड याठिकाणी ईडीचे काही अधिकारी आलं आणि त्यांनी या संदर्भात चौकशीला सुरुवात केली आहे. नवाब मलिक यांना अटक केल्यानंतर त्यांच्या संदर्भात काही तक्रारीसुद्धा आल्या होत्या आणि त्या अनुषंगाने आज त्याची चौकशी करण्यासाठी ईडीचे अधिकारी सीआरपीएफच्या  गोवावला कंपाउंडला आले असल्याची माहिती मिळत आहे. त्याचप्रमाणे हिरानंदानी समूहावर करण्यात आलेल्या आयकर विभागाच्या कारवाईचंही कनेक्शन नवाब मलिक यांच्याशी असल्याची माहिती मिळत आहे. 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

ED Enquiry in Mumbai : मुंबईत ईडीचे छापासत्र; मलिकांच्या प्रकरणाशी संबंधित कारवाई, नामांकित बिल्डर रडारवर

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह | ABP Majha

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Bhaubeej 2024 Wishes : भाऊबीजेनिमित्त लाडक्या भाऊरायाला द्या 'या' खास शुभेच्छा; वाढवा नात्यातील गोडवा, पाठवा 'हे' हटके शुभेच्छा संदेश
भाऊबीजेनिमित्त लाडक्या भाऊरायाला द्या 'या' खास शुभेच्छा; वाढवा नात्यातील गोडवा, पाठवा 'हे' हटके शुभेच्छा संदेश
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 नोव्हेंबर 2024 |शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 नोव्हेंबर 2024 |शनिवार
जयश्रीताई, तुमच्या स्वार्थी कृतीमध्ये कोल्हापूरच्या जनतेची व शिवसैनिकांची काय चूक होती? शिवसेना ठाकरे गटाचा बोचरा सवाल
जयश्रीताई, तुमच्या स्वार्थी कृतीमध्ये कोल्हापूरच्या जनतेची व शिवसैनिकांची काय चूक होती? शिवसेना ठाकरे गटाचा बोचरा सवाल
Jat Vidhan Sabha : विनंती करूनही बंडखोर थांबेनात, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची गोपीचंद पडळकरांसाठी जतमध्ये सभा होणार!
विनंती करूनही बंडखोर थांबेनात, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची गोपीचंद पडळकरांसाठी जतमध्ये सभा होणार!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Top 25 : टॉप 25 न्यूज : 11 PM : 2 नोव्हेंबर 2024 : ABP MajhaMahim Vidhansabha Election Special Report : माहीमचा किल्ला, मतभेदाचे तडे?ABP Majha Headlines :  10  PM :   2 नोव्हेंबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सTop 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 9 PM : 2 नोव्हेंबर 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bhaubeej 2024 Wishes : भाऊबीजेनिमित्त लाडक्या भाऊरायाला द्या 'या' खास शुभेच्छा; वाढवा नात्यातील गोडवा, पाठवा 'हे' हटके शुभेच्छा संदेश
भाऊबीजेनिमित्त लाडक्या भाऊरायाला द्या 'या' खास शुभेच्छा; वाढवा नात्यातील गोडवा, पाठवा 'हे' हटके शुभेच्छा संदेश
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 नोव्हेंबर 2024 |शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 नोव्हेंबर 2024 |शनिवार
जयश्रीताई, तुमच्या स्वार्थी कृतीमध्ये कोल्हापूरच्या जनतेची व शिवसैनिकांची काय चूक होती? शिवसेना ठाकरे गटाचा बोचरा सवाल
जयश्रीताई, तुमच्या स्वार्थी कृतीमध्ये कोल्हापूरच्या जनतेची व शिवसैनिकांची काय चूक होती? शिवसेना ठाकरे गटाचा बोचरा सवाल
Jat Vidhan Sabha : विनंती करूनही बंडखोर थांबेनात, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची गोपीचंद पडळकरांसाठी जतमध्ये सभा होणार!
विनंती करूनही बंडखोर थांबेनात, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची गोपीचंद पडळकरांसाठी जतमध्ये सभा होणार!
Satej Patil Vs Eknath Shinde : बंटी पाटलांची आता वाजवायची घंटी ते आता कशी वाजवली घंटी ते कोल्हापूर उत्तरपर्यंत! सतेज पाटील आणि सीएम शिंदेंमध्ये वाद कसा वाढला?
बंटी पाटलांची आता वाजवायची घंटी ते आता कशी वाजवली घंटी ते कोल्हापूर उत्तरपर्यंत! सतेज पाटील आणि सीएम शिंदेंमध्ये वाद कसा वाढला?
रावसाहेब दानवे म्हणतात, अब्दुल सत्तार 'औरंगजेब' अन् मी 'शिवाजी'; आता अजितदादांच्या नेत्याने दानवेंची थेट अक्कलच काढली; म्हणाले...
रावसाहेब दानवे म्हणतात, अब्दुल सत्तार 'औरंगजेब' अन् मी 'शिवाजी'; आता अजितदादांच्या नेत्याने दानवेंची थेट अक्कलच काढली; म्हणाले...
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: भाजपच्या गोटातून मोठी बातमी; श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघातील उमेदवार बदलणार?
भाजपच्या गोटातून मोठी बातमी; श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघातील उमेदवार बदलणार?
Chhatrapati Sambhajinagar Crime: ऐन दिवाळीत हॉटेलमध्ये बेदम मारहाण करत राडा, जेलमधून सुटताच कुख्यात गुंडाची दहशत, CCTV समोर
ऐन दिवाळीत हॉटेलमध्ये बेदम मारहाण करत राडा, जेलमधून सुटताच कुख्यात गुंडाची दहशत, CCTV समोर
Embed widget