एक्स्प्लोर

Tanaji Sawant Maharashtra Cabinet Expansion: नागपूरहून काल बॅग घेऊन निघाले, तानाजी सावंत कुठे गेले?, नाराजीच्या चर्चांवरही मोठी माहिती समोर

Tanaji Sawant Maharashtra Cabinet Expansion: तानाजी सावंत काल शपथविधी सुरु असताना राजभवनाकडे फिरकले देखील नाही.

Tanaji Sawant Maharashtra Cabinet Expansion: राज्यातील महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार (Maharashtra Cabinet Expansion) काल (15 डिसेंबर) नागपूरमधील राजभवन येथे संपन्न झाला. महायुती सरकारमध्ये एकूण 39 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर शिवसेना शिंदे गटातील काही आमदार नाराज असल्याची चर्चा आहे. यातीलच एक नाव म्हणजे शिवसेना शिंदे गटाचे परांडा विधानसभा मतदारसंघाचे आमदार तानाजी सावंत (Tanaji Sawant). तानाजी सावंत यांना मंत्रीमंडळात संधी मिळाली नसल्यानं ते नाराज असल्याचं सांगण्यात येत आहे. 

तानाजी सावंत काल शपथविधी सुरु असताना राजभवनाकडे फिरकले देखील नाही. काल तानाजी सावंत हे नागपूरच्या रेडिसन्स ब्लू हॉटेलमधून बॅग पॅक करुन निघून गेले होते. आजपासून अधिवेशन असल्याने सर्व आमदारा नागपुरात असताना तानाजी सावंत माघारी परतले होते. त्यामुळे त्यांच्या नाराजीच्या चर्चांनी जोर धरला होता. मात्र याचदरम्यान एक महत्वाची माहिती समोर आली आहे. तब्येत ठीक नसल्याने तानाजी सावंत पुण्याला परतल्याची माहिती त्यांच्या कार्यालयाने दिली. 

तानाजी सावंत नागपूरहून अचनाक का परतले?

तब्येत ठीक नसल्याने परतल्याची तानाजी सावंत यांच्या ऑफिसने माहिती दिली. कोलेस्ट्रॉल वाढल्याने डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला दिल्याचे सांगितले आहे. तसेच आपण नाराज नसल्याचे तानाजी सावंत यांच्याकडून सांगण्यात येत आहे. सध्या तानाजी सावंत पुण्यात असल्याची माहिती मिळत आहे.

धाराशिव जिल्ह्याला मंत्रि‍पदाने दिली हुलकावणी-

देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारात धाराशिव जिल्ह्याला मंत्रिपदाने हुलकावणी दिली आहे. शिंदे सरकारमधील शिवसेनेचे माजी मंत्री तानाजी सावंत यांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट झाला. तसेच माजी राज्यमंत्री आणि भाजप नेते राणाजगजीतसिंह पाटील यांना मंत्रिपदाची अपेक्षा होती. मात्र मंत्रिमंडळ विस्तारात त्यांचाही नंबर लागला नाही. त्यामुळे धाराशिव जिल्हा मंत्रीपदापासून वंचित राहिला. शिंदे सरकारमध्ये माजी मंत्री तानाजी सावंत यांच्याकडे जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी होती. आता धाराशिव जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी कोणाकडे जाणार याकडे लक्ष लागले आहे.

आजपासून हिवाळी अधिवेशनाला सुरुवात-

विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन आजपासून नागपुरात सुरू होत आहे. हिवाळी अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता आहे. मात्र अवघ्या सात दिवसांच्या या अधिवेशनात किती प्रश्न मार्गी लागणार हा प्रश्नच आहे. मंत्रिमंडळाचा विस्तार काल झाला, मात्र खातेवाटप झालेलं नाही. खातेवाटपाला आणखी दोन दिवस लागण्याची शक्यता आहे. हिवाळी अधिवेशनात प्रश्नोत्तराच्या तासाला सरकारने कात्री लावलीय. मंत्र्यांनी नुकतीच शपथ घेतली असल्याने प्रश्नोत्तराचा तास नाही. आज पहिल्याच दिवशी सरकारतर्फे पुरवणी मागण्या मांडल्या जाणार आहेत. राज्यपाल अभिभाषण आणि आर्थिक धोरणांवर या अधिवेशनात चर्चा होईल. हिवाळी अधिवेशनात 20 विधेयकं मांडली जातील. सकाळी 11 वाजता कामकाज सुरू होईल. शपथविधी राहिलेल्या काही आमदारांना आज सुरूवातीला शपथ दिली जाईल. त्यानंतर नव्या मंत्र्यांचा परिचय होईल. आज ईव्हीएम मुद्द्यावरून विरोधक आक्रमक होणार आहेत. तसंच परभणीतलं हिंसक आंदोलन, त्यानंतर पोलिसांचं कोंबिंग ऑपरेशन यावरूनही सरकारला विरोधक जाब विचारणार आहेत.

संबंधित बातमी:

मंत्रिपद न मिळाल्याने शिवसेनेच्या आमदारांची आदळआपट; एकनाथ शिंदे नाराज, कठोर निर्णय घेण्याच्या तयारीत!

Covers Business, Environment and climate change, Health, Science & tech and Policies! Believes in strength of quill!
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

AI Impact Summit 2026: जगातील सर्वात मोठा एआय इव्हेंट राजधानी दिल्लीत, 300 हून अधिक कंपन्या प्रगत गॅझेट्स दाखवणार; शेती, शिक्षण आणि आरोग्यावर सर्वाधिक लक्ष, एन्ट्री पास कसा मिळवाल?
जगातील सर्वात मोठा एआय इव्हेंट राजधानी दिल्लीत, 300 हून अधिक कंपन्या प्रगत गॅझेट्स दाखवणार; शेती, शिक्षण आणि आरोग्यावर सर्वाधिक लक्ष, एन्ट्री पास कसा मिळवाल?
तिकडं सीएम ममता बॅनर्जींचा थेट सुप्रीम कोर्टात युक्तीवाद अन् इकडं निवडणूक आयोगाचा पश्चिम बंगालमध्ये सर्जिकल स्ट्राईक; एका दणक्यात 7 अधिकाऱ्यांना घरचा रस्ता दाखवला!
तिकडं सीएम ममता बॅनर्जींचा थेट सुप्रीम कोर्टात युक्तीवाद अन् इकडं निवडणूक आयोगाचा पश्चिम बंगालमध्ये सर्जिकल स्ट्राईक; एका दणक्यात 7 अधिकाऱ्यांना घरचा रस्ता दाखवला!
Harshvardhan Sapkal: अजित पवार खमके होते, त्यांच्या निधनानंतर मंत्रालयातील अधिकाऱ्यांनी केलेल्या कृत्याची फडणवीसांनी जबाबदारी घावी: हर्षवर्धन सपकाळ
अजित पवार खमके होते, त्यांच्या निधनानंतर मंत्रालयातील अधिकाऱ्यांनी केलेल्या कृत्याची फडणवीसांनी जबाबदारी घावी: हर्षवर्धन सपकाळ
Pune BJP Congress Rada: जखमी कार्यकर्त्यांची काळजी घ्या, कसलीही कसर ठेवू नका; पुण्यातील भाजपच्या राड्यानंतर हर्षवर्धन सपकाळांचा काँग्रेस कार्यकर्त्यांना फोन
जखमी कार्यकर्त्यांची काळजी घ्या, कसलीही कसर ठेवू नका; पुण्यातील भाजपच्या राड्यानंतर हर्षवर्धन सपकाळांचा काँग्रेस कार्यकर्त्यांना फोन

व्हिडीओ

Sukesh Chandrashekhar News : तुरुंगातूनच जॅकलिनला 'व्हॅलेंटाईन' गिफ्ट; सुकेश चंद्रशेखरकडून थेट आलिशान हेलिकॉप्टर भेट!
Satara Crime News: 'व्हॅलेंटाईन डे'ला शिक्षकाने विद्यार्थिनीला केलं प्रपोज; म्हणाला, मी तुला चार दिवस
Sanjay Raut on Ganesh Naik : गणेश नाईक यांनी शिवसेनेत यावं, संजय राऊतांची खुली ऑफर
Sanjay Raut PC : भाजपला काम-धंदा नाही, हिंदू-मुस्लीम दंगे भडकवतंय, राऊतांची आक्रमक पत्रकार परिषद
Ind Beat Pak T20 World Cup : महाशिवरात्रीला टीम इंडियाचा विजयाचा अभिषेक; पाकिस्तानवर दणदणीत विजय

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
AI Impact Summit 2026: जगातील सर्वात मोठा एआय इव्हेंट राजधानी दिल्लीत, 300 हून अधिक कंपन्या प्रगत गॅझेट्स दाखवणार; शेती, शिक्षण आणि आरोग्यावर सर्वाधिक लक्ष, एन्ट्री पास कसा मिळवाल?
जगातील सर्वात मोठा एआय इव्हेंट राजधानी दिल्लीत, 300 हून अधिक कंपन्या प्रगत गॅझेट्स दाखवणार; शेती, शिक्षण आणि आरोग्यावर सर्वाधिक लक्ष, एन्ट्री पास कसा मिळवाल?
तिकडं सीएम ममता बॅनर्जींचा थेट सुप्रीम कोर्टात युक्तीवाद अन् इकडं निवडणूक आयोगाचा पश्चिम बंगालमध्ये सर्जिकल स्ट्राईक; एका दणक्यात 7 अधिकाऱ्यांना घरचा रस्ता दाखवला!
तिकडं सीएम ममता बॅनर्जींचा थेट सुप्रीम कोर्टात युक्तीवाद अन् इकडं निवडणूक आयोगाचा पश्चिम बंगालमध्ये सर्जिकल स्ट्राईक; एका दणक्यात 7 अधिकाऱ्यांना घरचा रस्ता दाखवला!
Harshvardhan Sapkal: अजित पवार खमके होते, त्यांच्या निधनानंतर मंत्रालयातील अधिकाऱ्यांनी केलेल्या कृत्याची फडणवीसांनी जबाबदारी घावी: हर्षवर्धन सपकाळ
अजित पवार खमके होते, त्यांच्या निधनानंतर मंत्रालयातील अधिकाऱ्यांनी केलेल्या कृत्याची फडणवीसांनी जबाबदारी घावी: हर्षवर्धन सपकाळ
Pune BJP Congress Rada: जखमी कार्यकर्त्यांची काळजी घ्या, कसलीही कसर ठेवू नका; पुण्यातील भाजपच्या राड्यानंतर हर्षवर्धन सपकाळांचा काँग्रेस कार्यकर्त्यांना फोन
जखमी कार्यकर्त्यांची काळजी घ्या, कसलीही कसर ठेवू नका; पुण्यातील भाजपच्या राड्यानंतर हर्षवर्धन सपकाळांचा काँग्रेस कार्यकर्त्यांना फोन
फॉरेस्ट ऑफिसर नाहीत, नवी मुंबईचे डोंगर पोखरले तसे जंगल पोखरली जात आहेत; वनेच राहिलीच नाहीत तर वनमंत्री काय कामाचे?? निलेश राणेंनी गणेश नाईकांच्या खात्यातील कारभाराची कुंडलीच मांडली
फॉरेस्ट ऑफिसर नाहीत, नवी मुंबईचे डोंगर पोखरले तसे जंगल पोखरली जात आहेत; वनेच राहिलीच नाहीत तर वनमंत्री काय कामाचे?? निलेश राणेंनी गणेश नाईकांच्या खात्यातील कारभाराची कुंडलीच मांडली
कोल्हापूर झे़डपीत मोठा भाऊ कोण? भाजप-राष्ट्रवादीत जुंपली; जास्त जागा जिंकलेल्या मुश्रीफांनी अध्यक्षपदावर शड्डू ठोकताच महाडिकांनी एकूण मतांची बेरीज मांडत अध्यक्षपदाची केली मागणी
कोल्हापूर झे़डपीत मोठा भाऊ कोण? भाजप-राष्ट्रवादीत जुंपली; जास्त जागा जिंकलेल्या मुश्रीफांनी अध्यक्षपदावर शड्डू ठोकताच महाडिकांनी एकूण मतांची बेरीज मांडत अध्यक्षपदाची केली मागणी
Abdul Sattar at Shiv Mandir: अब्दुल सत्तारांनी शंकराच्या मंदिरात बाहेरुन दर्शन घ्यायला हवं होतं, खूपच वाटत असेल तर हिंदू धर्म स्वीकारावा: तुषार भोसले
अब्दुल सत्तारांनी शंकराच्या मंदिरात बाहेरुन दर्शन घ्यायला हवं होतं, खूपच वाटत असेल तर हिंदू धर्म स्वीकारावा: तुषार भोसले
Harshwardhan Sapkal on Tipu Sultan: हर्षवर्धन सपकाळांचा भाजपला सवाल, म्हणाले, 'सावरकरांनी शिवरायांच्या सज्जनपणाला विकृत म्हटलं, ते कसं चाललं?'
हर्षवर्धन सपकाळांचा भाजपला सवाल, म्हणाले, 'सावरकरांनी शिवरायांच्या सज्जनपणाला विकृत म्हटलं, ते कसं चाललं?'
Embed widget