Raj Thackeray: राज्याच्या सर्व भागांमध्ये सभा घेणार, औरंगाबादेत 'राज'गर्जना
Raj Thackeray Aurangabad Sabha: माझ्या पुढच्या सभा संपूर्ण मराठवाड्यात होणार. तसेच विदर्भात ही जाणार, कोकणात, उत्तर महाराष्ट्रात ही जाणार, पश्चिम महारष्ट्रात ही जाणार. : राज ठाकरे
Raj Thackeray Aurangabad Sabha: सभा होणार, नाही होणार. राज ठाकरे याने सभा घ्यावी नाही घ्यावी, सभेला परवानगी मिळणार नाही मिळणार. ही गोष्ट का केली मला अजूनपर्यंत ही गोष्ट समजली नाही. मी महाराष्ट्रात कुठूनही सभा घेतली असती, तरी तुम्ही दूरदर्शनवरून ही सभा पहिलीच असताना. खार तर मी दोनच सभा घेतली. मात्र या दोन सभांवरती किती बोलतायत आहेत. ज्यावेळी ठाण्यातील सभा झाली, तेव्हा दिलीप धोतरने मला फोन केला. त्यांनी सागितलं साहेब आपण संभाजीनगरला एक सभा घेऊया. त्याला मी बोलो सभा घेऊ, तारीख सांगतो. मात्र आता हा विषय फक्त संभाजीनगरपुरता मर्यादित नाही, माझ्या पुढच्या सभा संपूर्ण मराठवाड्यात होणार. तसेच विदर्भात ही जाणार, कोकणात, उत्तर महाराष्ट्रात ही जाणार, पश्चिम महारष्ट्रात ही जाणार. राज्याच्या सर्व भागांमध्ये सभा घेणार. या सभांना आडकाठी आणून काहीच होणार नाही. मी कुठेही बोललो तरी ते लोकांना कळणारच आहे, असं औरंगाबादेत मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर सभेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे म्हणाले आहेत. राज ठाकरे यांनी महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा देऊन आपल्या भाषणाच्या सुरुवात केली.
जो समाज इतिहास विसरला, त्याच्या पायाखालचा भूगोल सटकला
राज ठाकरे म्हणाले, ''संभाजीनगरमध्ये पिण्याचा पाण्याचा प्रश्न गंभीर आहे. मला या सगळ्या प्रश्नांची कल्पना आज.'' ते म्हणाले, ''1 मे साजरा करताना आपल्याला महाराष्ट्र समजून घेण्याची गरज आहे. जो जो समाज इतिहास विसरला, त्याच्या पायाखालचा भूगोल सटकला आहे. त्याच्या पायाखालची जमीन सटकली आहे. म्हणून थोडासा इतिहास आपल्याला समजून घेण्याची गरज आहे. आपण कोण आहोत. आपण महाराष्ट्राचे आहोत, आपण मराठी आहोत. या महाराष्ट्राने देशाला काय काय दिलं. मुळातच हा देश नाही, ही भूमी होती.''
अलाउद्दीन खिलजीच सैन्य येतंय, ही महाराष्ट्रातील पहिली फेक न्यूज
राज ठाकरे म्हणाले, ज्ञानेश्वर केले तेव्हा अलाउद्दीन खिलजी इथे आला आणि देवगिरीच्या किल्ल्यात शिरला, असं म्हणत असताना राज ठाकरे यांनी आपलं भाषण मध्येच थांबवली. यावेळी सभेत जमलेल्या लोकांना उद्देशून म्हणाले, काय गोंधळ सुरू आहे. जर कोणी गडबड करायला आलं असेल, तर त्याला तिथेच हाणा, असे आदेश त्यांनी जमलेल्या मनसे कार्यकर्त्यांना दिले. ते पुढे म्हणाले, युवा एका अलाउद्दीन खिलजीने एक लाख मनसे घेऊन येत आहे, असं सांगितलं. रामदेव यादव आमचा राजा बेसावध राहिला. आमच्या किल्ल्यात फितूरी झाली आणि एक लाख लोक येणार नव्हती. तर ती फक्त काही हजारच होती. हा इतिहास जेव्हा वाचतो तेव्हा कळतं. अलाउद्दीन खिलजीच सैन्य येतंय, ही महाराष्ट्रातील पहिली फेक न्यूज.